बंगाली गोडाचा पदार्थ चमचम (chamcham recipe in marathi)

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
Almere, Netherlands

#पूर्व
पूर्वेकडे बंगाल जास्त फेमस आहे त्याच्या विशिष्ठ खाद्यपदार्थ मुळे ..बंगाली पदार्थ सगळीकडे मिळतात ... तसाच चमचम हा पदार्थ लहानपणापासून आमच्या आवडीचा...आमच्या बेळगाव ला असताना घरातले मोठे नेहमी हा पदार्थ बेकरी मधून आणायचे....आज मी घरी बनवला आहे ...कसा झाला आहे तो बघुयात...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिन
४ जनासाठी
  1. १५० ग्राम पनीर
  2. 2 टेबलस्पूनमैदा
  3. 1 वाटीसाखर
  4. 7-8 कपपाणी
  5. 3-4वेलची
  6. स्टफिंग साठी
  7. 1 टीस्पूनतूप
  8. 1 कपदूध(गायीचे)
  9. 1/2 कपमिल्क पावडर
  10. 2 टेबलस्पूनकेसर मिश्रित दूध
  11. 3 टेबलस्पूनपिठी साखर
  12. देसिकेट्स कोकोनट
  13. सजावटी साठी लाल टुटी फ्रूट

कुकिंग सूचना

४५ मिन
  1. 1

    प्रथम चांगले पनीर करून घ्यावे..किंवा बाजारातले चांगले पनीर ही घेऊन त्याचे करू शकता...पनीर किसून चांगले ५ मिन हाताच्या पंज्यानी मळून घेणे...त्यात मैदा घालून मळणे...

  2. 2

    त्याचे लांबट गोलाकार गोळे करून घेणे...बाजूला एका पॅन मध्ये साखर आणि पाणी एकत्र करून उकळत ठेवणे...त्यात वेलची पूड घालवी..

  3. 3

    १० मिन उकळलेल्या साखरेच्या पाकात हे गोळे टाकून १५ मिन झाकण लावून उकळून घेणे..

  4. 4

    आता एकीकडे 🍳 गरम करून त्यात थोडे तूप घालून त्यात दूध घालावे..त्यात मिल्क पावडर घालून चांगले परतावे...तेल सुटेल इतपत...मग त्यात केसर मिश्रीत दूध घालून पिठी साखर घालावी...आणि छान परतून घ्यावे...

  5. 5

    हे स्टफींग आता त्या लांबट गोळ्याला मधोमध चिर देऊन त्यात घालून देसिकेटेड कोकोनट मध्ये घालून मधोमध लाल चेरीज लावाव्यात...सुंदर असे चमचम खाण्यासाठी तयार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
रोजी
Almere, Netherlands
"Cooking with love provides food for the soul.."
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes