तिरंगा उत्तपम (tiranga uttapam recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#ब्रेकफ़ास्ट
#तिरंगाउत्तपम
#उत्तपम
#तिरंगा
कूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे तिरंगा उत्तपा बनवला पौष्टिक असा हा नाश्ता चा प्रकार आहे.समोर 26 जानेवारीचा दिवस येत होता तेव्हा आपल्या डिशमधून आपली क्रिएटिव्हिटी दिसली पाहिजे आता अशी कोणती डिश बनवता येईल की त्यातून माझ्यातले देश प्रेम प्रकट करता येईल मी उत्तपम हा प्रकार घेतला मला तिरंग्यासाठी उत्तम वाटला कारण उत्तप्याला वरून बऱ्याच टोपीग आपण वापरतो तेव्हा ह्या टॉपिंग तीन रंगात वापरून तीन रंगाचा वापर करून तिरंग्याचा थीम डोक्यात ठेवून बनवले. आपल्या आजूबाजूला आपल्या रोजच्या वापरात निसर्गानेच आपल्याला असे कलर दिले आहे की ते आपल्या तिरंग्यात आपल्याला दिसतातच अगदी हे सगळे कलर नॅचरल आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून पूर्ण भारतभर उत्सव साजरा केला जातो. या दिवशी ध्वजाचे आरोहण केले जाते शाळेत असताना शाळेच्या गोष्टी आठवतात पण आता देश प्रेम दाखवण्यासाठी कुकिंग मधुनही आपण आपल्या देशाविषयी चा आदर आणि देश प्रेम दाखवू शकतो. तिरंग्याचे तीन कलर आपल्याला खूप प्रेरणा देतात १) केसरी रंग निस्वार्थ सेवा शौर्य देशभक्तीचे प्रतीक आहे २) पांढरा रंग सत्य आणि पवित्र याचे प्रतीक आहे 3) हिरवा रंग देशाची समृद्धी धनधान्याची भरभराटी यातून दर्शवली जाते तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे राष्ट्रध्वज आपला सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतिक आहे. देशा विषयी आदर व्यक्त केला पाहिजे . सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिट
4 व्यक्ति
  1. 2 कपबारीक तांदूळ
  2. 1 कपउकडा तांदूळ
  3. 1 कपउडीद डाळ
  4. 1/2 टेबलस्पूनमेथी दाना
  5. 1 कपभीजलेले जाड पोहे
  6. 1सिमला मिरची बारीक कट केलेली
  7. 1गाजर बारीक कट केलेले
  8. 1कांदा बारीक कट
  9. 2 टेबल्स्पूनकोथिंबीर बारीक कट केलेली
  10. 2 टेबल स्पूनटोमॅटो बिया काढून कट केलेला
  11. 2हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या
  12. कांद्याच्या पातीचे गोल काप
  13. मीठ चवीनुसार
  14. तेल उत्तप्पा वर टाकून शालो फ्राय करण्यासाठी

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम डाळ आणि तांदूळ धुन 7/8 तास
    भिजत घालून घेऊ

  2. 2

    भिजलेली डाळ तांदूळ वेगवेगळे मिक्सर मध्ये दळून घेऊ दळताना भिजलेले पोहे टाकून दळून घेऊ. बारीक पेस्ट तयार करून घेऊ. आता हे तयार बॅटर पाच-सहा तास फर्मेंट होऊ देऊ.

  3. 3

    फर्मेंट झाल्यावर तयार बॅटर मध्ये मीठ,साखर टाकून बॅटर व्यवस्थित चमच्याने हलून मिक्स करून घेऊ.
    मी अर्धे बॅटर वेगळे केलेले आहे त्यापासून इडली बनवणार आहे. असाही हा बॅटर एकदा बनवला तर बऱ्याचदा चालतो.

  4. 4

    आता सगळ्या भाज्या बारीक कट करून तयार करून घेऊ. गरम तव्यावर तेल टाकून छोट्या छोट्या साइज चे तीन उत्तपम टाकून घेऊन
    एका उत्तपावर शिमला मिरची,हिरवी मिरची,कोथिंबीर टाकून हिरव्या रंगाची टॉपिंग तयार करू

  5. 5

    दुसऱ्या उत्तपमवर गाजर, टोमॅटो टाकून ऑरेंज रंग तयार करून घेऊ
    तिसऱ्या उत्तपमवर कांदा टाकून पांढऱ्या रंगाची टॉपिंग तयार करून घेऊ.

  6. 6

    वरून प्लेट देऊन झाकून उत्तपम तयार करून घेऊ
    अशाप्रकारे उत्तप्पाचे टॉपिंग झाल्यावर दुसऱ्या साइड नेही शेकून घेऊ.

  7. 7

    अशाप्रकारे सगळे उत्तपम तयार करून. तिरंगा रंगाची प्लेटिंग तयार करून घेऊ.

  8. 8

    तयार आपले तिरंगा उत्तपम नारळाच्या चटणीबरोबर सर्व् करू.

  9. 9

    अशाप्रकारे तिरंग्याचे कलर लक्षात घेऊन तिरंगा उत्तपम तयार केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes