ब्रोकोली बदाम सुप (broccoli badam soup recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#GA4 #week20 #soup ब्रोकोली बदाम दोन्हीही हेल्दी पदार्थ वापरून केलेले सुप ही अर्थात हेल्दीच व पोटभरीचे होणारच ह्यात शंकांच नाही चला तर अशा हेल्दी सुपची मी केलेली रेसिपी बघुया

ब्रोकोली बदाम सुप (broccoli badam soup recipe in marathi)

#GA4 #week20 #soup ब्रोकोली बदाम दोन्हीही हेल्दी पदार्थ वापरून केलेले सुप ही अर्थात हेल्दीच व पोटभरीचे होणारच ह्यात शंकांच नाही चला तर अशा हेल्दी सुपची मी केलेली रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम ब्रोकोली
  2. 1उभा चिरलेला कांदा
  3. २-४ लसुण पाकळ्या
  4. २५-३० ग्रॅम बदाम
  5. 1 टेबलस्पुनबटर
  6. 1-2 टीस्पूनमैदा
  7. 1/4 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  8. चविनुसारमीठ
  9. आवश्यक वाटल्यास दुध घालु शकता व वरून क्रिमही

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    ब्रोकोली स्वच्छ धुवुन बारीक कापुन ठेवा कांदा उभा पातळ चिरून ठेवा लसुण पाकळ्या सोलुन ठेवा बदाम पाण्यात भिजवुन ठेवा१/२ तास

  2. 2

    ब्रोकोली कांदा लसुण पाण्यात शिजवुन घ्या१०-१२ मिनिटे बदामाची साल काढुन बदामाची पेस्ट करून घ्या

  3. 3

    शिजलेल्या ब्रोकोली कांदा लसुणाची मिक्सर मधुन पेस्ट करून घ्या

  4. 4

    पातेले गरम झाल्यावर त्यात बटर टाकुन परता व त्यात मैदा टाकुन परतुन भाजा

  5. 5

    नंतर भाजलेल्या मैद्यात तयार ब्रोकोली कांदा लसणाची पेस्ट व बदामाची पेस्ट टाकुन सतत ढवळत रहा आवश्यतेनुसार पाणी व मीठ टाका व सुपाला उकळी काढा आपले ब्रोकोली बदाम सुप रेडी

  6. 6

    गरमागरम ब्रोकोली सुप बाऊलमध्ये ओतुन त्यावर मिरपुड टाका व शिजलेला ब्रोकोलीचा पिस सुपच्या मध्ये ठेवा बाऊलच्या आजुबाजुला बदाम लसुण पाकळ्या ब्रोकोलीने डेकोरेट करा सुप स्पुन ठेवुन सुप सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Top Search in

Similar Recipes