कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#कांदे पोहे # पोह्यांचे अनेक प्रकार असतात भारतात वेगवेगळ्या राज्यात विविध प्रकारचे पोहे खायला मिळतात. त्यात इंदौरचे पोहे प्रसिद्ध आहेत.पोहेतर खायला हलके असतात. पूर्वी मुलीला दाखवायच्या कार्यक्रमात पोहे बनवत असत. आता खूप बदल झाला. तर आठवड्यात एकदा तरी नाश्त्याला पोहे असतातच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2व्यक्तींसाठी
  1. 1 कपजाडे पोहे
  2. 1मध्यम कांदा
  3. 1 लहानबटाटा
  4. 1/4 कपमटार
  5. 1/4 कपओल्या खोबऱ्याचा कीस
  6. 3-4हिरव्या मिरच्या
  7. 5-6कढीपत्त्याची पाने
  8. 2-3 टेबलस्पूनकोथिंबीर
  9. 3 टेबलस्पूनतेल
  10. 1/2 टेबलस्पूनराई
  11. 1/4 टेबलस्पूनहळद
  12. 1/2 टेबलस्पूनसाखर
  13. 1/2 टेबलस्पूनमीठ
  14. 1/2लिंबू

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    पोहे निवडून चाळणीने चाळून घ्यावेत. स्वच्छ धुऊन निथळत ठेवावे.

  2. 2

    कांदा, मिरची, बटाटा, कोथिंबीर, कढीपत्ता, चिरुन घ्यावा,कढीपत्ता नेहमी बारीक चिरून घ्यावा म्हणेज तो खाल्ला जातो नाहीतर काढून टाकतात.

  3. 3

    गॅसवर पॅनमध्ये तेल मध्यम आचेवर तापवून त्यात राई घालून ती तडतडल्यावर कढीपत्ता घालावा नंतर बटाटा घालून परतुन घ्यावे.(बटाटा शिजायला वेळ लागतो. कांदा करपतो) मग त्यात कांदा व मटार घालावे. हळद घालावी.मटार शिजल्यावर त्यात पोहे घालावेत सर्व चांगले ढवळून घ्यावे. मीठ, साखर, खोबरे, लिंबू पिळून परत ढवळून घ्यावे.

  4. 4

    पोहे तयार झाल्यावर खोबरे आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. त्या बरोबर शेव, लोणचे पण द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes