"तवा पनीर टिक्का" (tawa paneer tikka recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#डिनर
#गुरुवार_पनीर_टिक्का
#डिनर प्लॅनर मधील माझी सातवी रेसिपी

पनीर चा कोणताही प्रकार माझ्या आवडीचा.. त्यामुळे घरात नेहमीच बनवते..घरी बनवलेले खायला मजा येते.. आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यावी असे वाटते..हो म्हणजे रेस्टॉरंट मध्ये जे मिळते ,ते पदार्थ आपण बनवु शकतो हा आनंद मिळतो..

"तवा पनीर टिक्का" (tawa paneer tikka recipe in marathi)

#डिनर
#गुरुवार_पनीर_टिक्का
#डिनर प्लॅनर मधील माझी सातवी रेसिपी

पनीर चा कोणताही प्रकार माझ्या आवडीचा.. त्यामुळे घरात नेहमीच बनवते..घरी बनवलेले खायला मजा येते.. आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यावी असे वाटते..हो म्हणजे रेस्टॉरंट मध्ये जे मिळते ,ते पदार्थ आपण बनवु शकतो हा आनंद मिळतो..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
तीन
  1. 100 ग्रॅमपनीर
  2. 1 टेबलस्पूनबेसन पीठ भाजून
  3. 1/2 कपघट्ट दही
  4. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1 टीस्पूनधनेपूड
  6. 1 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. 1/2लिंबाचा रस
  9. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  10. चवीनुसारमीठ
  11. 3 टेबलस्पूनतेल
  12. 1/2 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  13. आवडीनुसार कोथिंबीर
  14. 1कांदा
  15. 1टाॅमेटो
  16. 1सिमला मिरची

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    पनीर, कांदा टाॅमेटो सिमला मिरची चे तुकडे करून घ्यावेत.पनीर चे तुकडे मोठे मोठे च करावेत.नाहीतर वुडन स्टीक ला लावताना तुटतात.

  2. 2

    अर्धा तास आधी दही गाळणीवर किंवा काॅटनच्या कपड्यावर ठेवावे म्हणजे त्यातील पाणी निथळून जाईल व घट्ट दही मिळेल

  3. 3

    दही वाटी मध्ये घेऊन त्यात सगळे मसाले,बेसन पीठ, मीठ, लिंबाचा रस घालून चांगले फेटून घ्यावे.. कोथिंबीर घालावी.

  4. 4

    तडका पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून मिश्रणात घालावे व चांगले मिक्स करावे..

  5. 5

    बॅटर मध्ये पनीर, कांदा टाॅमेटो सिमला मिरची चे पीस टाकून हलक्या हाताने मिक्स करावे व अर्धा तास मॅरिनिट होण्यासाठी ठेवावे..

  6. 6

    वुडन स्टीक अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे म्हणजे कडक होतात आणि गॅस वर पनीर टिक्का भाजताना तुटत नाहीत..स्टीक मध्ये सिमला मिरची, टाॅमेटो, कांदा, पनीर असे एकामागे एक लावून घ्यावे...

  7. 7

    गॅस वर मिडीयम आचेवर पॅन गरम करून त्यात तेल घालावे व स्टीक ठेवाव्यात..उलटपुलट करत सगळ्या बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे..

  8. 8

    तयार झालेला पनीर टिक्का चे स्टिक गॅसवर भाजून घ्यावे, मस्त दिसतात आणि चवही छान येते..

  9. 9

    सलाड व हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे

  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes