भोपळा डाळ रस्सा भाजी (bhopla dal rassa bhaji recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#डिनर दुधी भोपळ्यातुन आपल्या शरीराला फायबर्स, व्हिटॅमिन c,B , लोह, मॅग्नेशियम, झिंक, कॉल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मँगनीज अशा विविध पोषक घटक मिळतात भोपळा आजारांवर उपयुक्त तसेच पित्त कफ कमी करून शरीराचे पोषण करून बल वाढवणारा वजन कमी करतो मधुमेह मुळव्याध हृदयविकारा वर उपयोगी आहे चला तर अशा बहुगुणी भोपळ्याची भाजी मी कशी केली ते तुम्हाला दाखवते चला तर बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
२-४ व्यक्तिसाठी
  1. 1 टीस्पूनकाश्मिरी तिखट
  2. 1 टेबलस्पुनघरगुती मसाला
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. 2-3 टेबलस्पुनओल्या नारळाचा किस
  5. चविनुसारमीठ
  6. 1 टेबलस्पुनतेल
  7. १५० ग्रॅम दुधी भोपळ्याच्या फोडी
  8. ३० ग्रॅम भिजलेली चनाडाळ
  9. भोपळ्याचा पिस व लसुण पाकळ्या
  10. 1 टीस्पूनधनेजिरे पावडर
  11. 1 टीस्पूनचिरलेली कोथिंबीर
  12. 1 टीस्पूनमोहरी
  13. 1 टीस्पूनजीरे
  14. 1 पिंचहिंग
  15. 5-6कडिपत्याची पाने
  16. 1 टीस्पूनआल लसणाचा ठेचा
  17. 1कांदा बारीक चिरलेला
  18. 1टोमॅटो बारीक चिरलेले

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    भोपळा डाळ भाजी करण्यासाठी चण्याची डाळ३-४ तास पाण्यात भिजत घाला तसेच भोपळ्याची साल काढुन फोडी करून ठेवा कांदा व टोमॅटो बारीक चिरून ठेवा आललसुण ठेचुन ठेवा

  2. 2

    पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग कडिपत्ता व आललसणाचा ठेचा टाकुन परतुन घ्या नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकुन परता

  3. 3

    कांदा चांगला परतल्यावर त्यात चिरलेले टोमॅटो टाका व परता त्यातच हळद धनेजिरे पावडर घरगुती मसाला काश्मिरी तिखट टाकुन परतुन घ्या

  4. 4

    नंतर त्यात भिजवलेली चण्याची डाळ टाका व मिक्स करून घ्या

  5. 5

    भाजीत थोड पाणी टाकुन परतुन झाकण ठेवुन ५ मिनिटे डाळ शिजवुन घ्या

  6. 6

    शिजलेल्या चनाडाळीत भोपळ्याच्या फोडी टाकुन परता नंतर त्यात मीठ व गरमपाणी टाकुन झाकण ठेवुन१० मिनिटे शिजवा

  7. 7

    भाजी शिजल्यावर ओले खोबरे टाकुन मिक्स करा व गॅस बंद करून २ मिनिटे झाकण ठेवा आपली भोपळा डाळ भाजी तय्यार

  8. 8

    गरमागरम भोपळा डाळ रस्सा भाजी प्लेटमध्ये सर्व्ह करा वरून कोथिंबिर टाकुन बाजुला भोपळ्याचा पिस व लसुणाच्या पाकळ्या ठेवुन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes