दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

#डिनर
साप्ताहिक डिनर प्लानर
चौथी रेसिपी- दुधी भोपळा भाजी

दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)

#डिनर
साप्ताहिक डिनर प्लानर
चौथी रेसिपी- दुधी भोपळा भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 3 कपदुधी भोपळा बारीक फोडी करून
  2. कांदा बारीक चिरलेला
  3. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  4. 3 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 1/4 टीस्पूनहिंग
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  10. 1 टेबलस्पूनसब्जी मसाला
  11. गरम पाणी आवश्यकतेनुसार
  12. 1 टेबलस्पूनगुळ
  13. 2-3 टेबलस्पूनओवा नारळ खरवडलेला
  14. मीठ चवीनुसार
  15. कोथिंबीर गार्निशिंगसाठी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यात मोहरी जीरे हिंग अशी फोडणी करावी.

  2. 2

    आता फोडणी मध्ये कांदा घालून छान शिजवून घ्या.मग टोमॅटो घालून ३-४ मिनिटे परतावे.

  3. 3

    नंतर त्यात हळद तिखट सब्जी मसाला घालून २मि. नीट मिक्स करावे.

  4. 4

    नंतर त्यात दुधीच्या फोडी, थोडे पाणी, गुळ, ओवा नारळ घालून भाजी वर झाकण ठेवून नीट शिजवून घ्यावी, मध्ये मध्ये झाकण काढून ढवळावे.

  5. 5

    व शेवटी चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. भाजी तयार आहे. वर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861
रोजी
Cooking is an art..Cooking and baking is my passion, want to make it as a profession!!
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes