दाल बाटी (dal batti recipe in marathi)

Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233

#GA4 #Week25
#Rajasthani हा कीवर्ड घेऊन मी राजस्थानची फेमस रेसिपी दाल बाटी बनविली आहे. दाल बाटी राजस्थानची पारंपारिक रेसिपी आहे. राजस्थानची खासियत दाल बाटी रेसिपी आहे. प्रत्येक प्रांताची पाहुणचार करण्याची पद्धत वेगळी, राजस्थानला आपण जेव्हा जातो तेव्हा अगत्याने आणि प्रेमाने खिलवतात हा पदार्थ दालबाटी. आपण ही दाल-बाटी घरच्या घरी सुद्धा करू शकतो. दाल बाटी करण्याच्या अनेक पद्धती आहेत, जसे की ओव्हनमध्ये,कुकर मध्ये, कढईमध्ये, किंवा आप्पेपात्रात अशा अनेक पद्धतीने करता येते. माझ्याकडे तंदूर ओव्हन असल्यामुळे मी त्यात बनवली आहे. माझ्या मुलींची खूप आवडती दाल बाटी रेसिपी आहे. आणि मी ज्या पद्धतीने केलेली आहे त्यामुळे दाल बाटी नरम साॅफ्ट होते आणि वयस्कर माणसांना खाण्यास योग्य आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ १/२ तास
६ जणांसाठी
  1. बाटी बनविण्यासाठी घटक
  2. 3 कपगव्हाचे पीठ
  3. 1/2 कपरवा
  4. 1 टीस्पूनओवा
  5. 1/3 कपतूप
  6. मीठ चवीनुसार
  7. पाणी आवश्यकतेनुसार
  8. दाल बनविण्यासाठी घटक
  9. 1/4 कपतूरडाळ
  10. 1/4 कपमूगडाळ
  11. 1/4 कपमसूर डाळ
  12. 1 छोटाकांदा
  13. 1छोटे टमाटर
  14. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  15. 1 टीस्पूनधने पूड
  16. 1 टीस्पूनगरम मसाला
  17. 1 टीस्पूनतिखट
  18. 1/2 टीस्पूनहळद
  19. 1 टीस्पूनमोहरी
  20. 1 टीस्पूनजीरे
  21. 1/4 टीस्पूनहिंग
  22. कढीपत्त्याची पाने आवडीनुसार
  23. कोथिंबीर आवडीप्रमाणे

कुकिंग सूचना

१ १/२ तास
  1. 1

    प्रथम एका परातीत गव्हाचे पीठ आणि रवा एकत्र करून घ्यावा आणि त्यात ओवा, मीठ टाकून मिक्स करावे.

  2. 2

    नंतर त्यामध्ये थोडे थोडे तूप घालून मिक्स करून घ्यावे हाताने छान मिक्स करावे पूर्ण पीठाला तूप चांगले लागले पाहिजे आणि नंतर पाण्याने भिजवून त्याचा गोळा तयार करून घ्यावा आणि या पिठाला झाकून ठेवावे.

  3. 3

    नंतर कुकर मध्ये डाळी मिक्स करून घ्याव्या आणि स्वच्छ धुऊन घ्याव्या. आता त्यामध्ये हळद, मीठ, आणि तेल घालून कुकरला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्याव्यात.

  4. 4

    दहा मिनिटानंतर पीठ छान मळून घ्यावे आणि त्याचे गोळे करून घ्यावे आणि एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवावे आणि त्या पाण्याला उकळी आली की हे सर्व गोळे त्यात टाकावे आणि जोपर्यंत पूर्ण गोळे पाण्यावरती तरंगत नाही तोपर्यंत शिजू द्यावे.

  5. 5

    नंतर थोड्यावेळाने सर्व गोळे पाण्यावर तरंगत आले की समजावे ते शिजले आता एका ताटामध्ये काढून घ्यावे.

  6. 6

    नंतर तंदूर ओव्हन गरम करायला ठेवावे आणि चांगले गरम झाले की वरुन पाणी शिंपडून बघावे आणि ओव्हन गरम झालेले असेल तर त्यात सर्व तयार केलेले गोळे ठेवावे आणि तंदूर चे झाकण लावून ठेवावे आणि थोड्या थोड्या वेळाने चेक करावे.

  7. 7

    नंतर एका कढई मध्ये तेल गरम करून त्यात जीरे, मोहरी टाकावे हिंग, कढीपत्ता कांदा टाकून फोडणी तयार करून घ्यावी नंतर त्यात टमाटर, सर्व मसाले टाकून फोडणी तयार झाली की त्यात शिजवलेल्या डाळी टाकाव्यात.

  8. 8

    नंतर ओव्हन मध्ये ठेवलेल्या बाटी झालेल्या की नाही ते बघावे आणि झालेल्या असतील तर काढून घ्याव्या अशाप्रकारे सर्व बाटी करून घ्याव्या. आता तयार झालेल्या डाळीमध्ये कोथिंबीर टाकुन मिक्स करावे तयार आहे आपली दाल बाटी.

  9. 9

    नंतर लागेल तसे बाटी ला हाताने थोडे दाबून घ्यावे आणि एका कढईमध्ये तूप गरम करून घ्यावे आणि त्यात ह्या बाटीला डिप करावे आणि डाळी सोबत खायला द्यावे आणि सोबत मिरचीचा ठेचा आणि लिंबू लोणचे द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233
रोजी

Similar Recipes