दाल बाटी चुरमा (dal batti churma recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#पश्चिम #राजस्थान
दाल/पंचदाल- पाच डाळी वापरून बनवतात.
बाटी- कणीक आणि रवा यापासून बाटी बनवून ओव्हनमध्ये /तुपामध्ये तळून/आप्पेपात्रात/ डायरेक्ट गॅसवर बनवतात.
चुरमा-तुपावर काजू,बदाम, वेलची घालून बारीक केलेली बाटी परतून घेतात आणि त्यात साखर घालून एकत्र करतात.

दाल बाटी चुरमा (dal batti churma recipe in marathi)

#पश्चिम #राजस्थान
दाल/पंचदाल- पाच डाळी वापरून बनवतात.
बाटी- कणीक आणि रवा यापासून बाटी बनवून ओव्हनमध्ये /तुपामध्ये तळून/आप्पेपात्रात/ डायरेक्ट गॅसवर बनवतात.
चुरमा-तुपावर काजू,बदाम, वेलची घालून बारीक केलेली बाटी परतून घेतात आणि त्यात साखर घालून एकत्र करतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 3 टेबलस्पूनतूरडाळ
  2. 3 टेबलस्पूनचणाडाळ
  3. 3 टेबलस्पूनमसूर डाळ
  4. 3 टेबलस्पूनसालीसकट मुगडाळ
  5. 3 टेबलस्पूनउडीद डाळ
  6. 3 कपपाणी
  7. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेला लसूण
  8. 1 टीस्पूनकिसलेले आले
  9. 1-2बारीक चिरलेली हिरवी मिरची
  10. 1/2 कपबारीक चिरलेला कांदा
  11. 1/2बारीक चिरून टोमॅटो
  12. 2 टेबलस्पूनआमचुर पावडर
  13. 2 टेबलस्पूनमीठ
  14. 3 टेबलस्पूनतूप
  15. 1 टीस्पूनमोहरी
  16. 1 टीस्पूनजिरे
  17. 1 टीस्पूनहळद
  18. 1/4 टीस्पूनहिंग
  19. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  20. 1गरम मसाला
  21. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  22. 2 कपकणीक
  23. 1 कपरवा
  24. 1/2 कपतूप
  25. 1 कपदूध
  26. 1/2 टीस्पूनमीठ
  27. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  28. 1 टेबलस्पूनकाजूचे काप
  29. 1 टेबलस्पूनबदामाचे काप
  30. 2-3वेलची खलबत्त्यात कुटून
  31. 1/2 कपसाखर
  32. 1/2बारीक चिरलेला कांदा
  33. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  34. 1लिंबू

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    सर्व डाळी एकत्र करून 2-3 वेळा स्वच्छ धुऊन घ्याव्यात कुकर मध्ये तीन कप पाणी घालून डाळ शिजवून घ्यावी. कढईमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी,जिरे,हळद,हिंग घालावे नंतर त्यामध्ये लसूण,कांदा,मिरची घालून 2-3 मिनिटे परतावे आता यात टोमॅटो,मीठ,लाल तिखट,गरम मसाला, आमचूर पावडर घालून तूप सुटेस्तोवर परतून घ्यावे नंतर त्यामध्ये शिजवलेली डाळ घालून मिक्स करावे उकळी आली की गॅस बंद करावा वरून कोथिंबीर घालावी तयार झाली आपली पंचदाल.

  2. 2

    परातीमध्ये कणिक,रवा,मीठ,1/2 कप तूप आणि बेकिंग पावडर घालून एकत्र करावे (हे मिश्रण ब्रेडक्रम्ससारखे लागते) आता यात हळूहळू दूध घालून गोळा मळून घ्यावा आणि 10 मिनिटे बाजूला ठेवावा.गोळ्याचे समान भाग करावे आणि हव्या त्या आकारात बाटी बनवून घ्यावी जेणेकरून ती सगळीकडून नीट बेक होईल. (चमच्याने X करू शकतो/गोळ्याच्या मध्ये खोलगट ठेवून बाकीचे कॉर्नर परत हलकेसे जॉईन करायचे/मुटका वळणे)

  3. 3

    ओव्हन प्रीहिट करून 350 डिग्री फॅरेनहाईट /175 डिग्री सेल्सियसवर बाटी बेक कराव्यात 25 मिनिटांनी दुसऱ्या बाजूने 5 मिनिटे बाटी बेक कराव्यात.(दोन्ही बाजूने लाईट गोल्डन ब्राऊन कलर आला की समजावे बाटी तयार झाल्या) 2-3 बाटी चुरमा करण्यासाठी काढून ठेवाव्यात बाकीच्या बाटी तुपामध्ये घालून डिशमध्ये काढून घ्याव्यात.

  4. 4

    चुरमा करण्यासाठी 2-3 बाटी मिक्सरमधून बारीक वाटून घ्याव्यात, पॅनमध्ये तूप गरम करून त्यात खलबत्त्यात कुटलेली वेलची,काजू,बदाम तुकडे घालून परतावे आता यावर मिक्सरमध्ये वाटलेली बाटी लाईट गोल्डन ब्राऊन कलर येईस्तोवर परतून घ्यावी गॅस बंद करावा एका बाऊलमध्ये पिठीसाखर घेऊन त्यावर पॅनमधील परतलेली बाटीचे मिश्रण घालावे आणि एकत्र करावे तयार झाला चुरमा.

  5. 5

    बाऊलमध्ये बाटी तुकडे करून घालावेत त्यावर तयार डाळ,तूप घालावे वरुन चिरलेला कांदा,कोथिंबीर,लिंबू घालावे आणि डिशमध्ये चुरमा वाढून दाल बाटी चुरमा सव्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes