डाळ बाटी (dal batti recipe in marathi)

Shital shete
Shital shete @Shital_123
Pune

#रेसिपीबुक #week1 #माझ्या आवडत्या रेसिपी . माझा जन्म, बालपण आणि नंतर लग्न सगळं पुण्यातले . पण मुळ माहेर मराठवाडा. त्यामुळे तिकडच्या पदार्थांची ओढ कायम च वाटत असते . त्यात डाळ बाटी वर तर विशेष प्रेम . लहानपणी उन्हाळ्यात गावी गेल्यावर हा बेत ठरलेला असे . आणि आता जेव्हा पक्के पुणेकर खवय्ये असलेली सासर ची मंडळी ही डाळ बाटी ची फर्माईश करतात तेव्हा ते बनवण्यातला आणि खाऊ घालण्यातला आनंद काही वेगळा असतो .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-35 मिनिट
4 सर्व्हिंग्स
  1. 2 कपगव्हाचे पीठ
  2. 1/2 कपबारीक रवा
  3. 2 टेबलस्पूनदही
  4. 2 टेबलस्पूनसाजूक तुप/ तेल
  5. 1 टीस्पूनओवा
  6. 1 टीस्पूनखायचा सोडा
  7. 1 टीस्पूनहळद
  8. चवीनुसारमीठ
  9. तळण्यासाठी तेल
  10. 1 टेबलस्पूनपाणी

कुकिंग सूचना

30-35 मिनिट
  1. 1

    एक परात घेऊन त्यात 2 कप गव्हाचे पीठ टाका.

  2. 2

    आता त्यामध्ये 1/2 कप बारीक रवा टाका.

  3. 3

    आता पिठामध्ये दही, मीठ, सोडा,हळद टाका.

  4. 4

    त्यामध्ये साजूक तुप टाकून ते सगळ्या पिठाला व्यवस्तिथ चोळून घ्या.

  5. 5

    आता त्यात थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा घट्ट गोळा मळून घ्या. पीठ भिजण्यासाठी 10-15 मिनिटे बाजूला ठेवून द्या

  6. 6

    10-15 मिनिटा नंतर पिठाचे चपाती साठी करतो त्या आकाराचे गोळे करून घ्या

  7. 7

    इडली च्या थाळी ला तेल किंवा तुप लावून त्यात हे गोळे ठेवा. गॅस वर इडली पात्रात पाणी घालून घ्या. पाण्याला उकळी आली कि आपल्या बाटी ची थाळी त्यात ठेवा

  8. 8

    10-15 मिनिटे बाटी व्यवस्थित उकडून घ्या आणि थंड करून घ्या

  9. 9

    बाटी थंड झाल्यावर चौकोनी आकारात तुकडे करून घ्या

  10. 10

    गॅस वर कढई मध्ये तेल गरम करून त्यात बाटी सोनेरी/ बदामी रंग येईपर्यंत तळून घ्या

  11. 11

    तळून झाल्यावर बाटी टिशू पेपर वर काढून घ्या

  12. 12

    आपली खुशखुशीत खमंग बाटी तयार आहे. बाटी खमंग तिखट डाळी सोबत सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital shete
Shital shete @Shital_123
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes