पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण (Bomblanch kalvan Recipe in Marathi)

नमस्कार,
मी अश्विनी महेश पाटील , आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण दाखवणार आहे.
कृती:- त्यासाठी पाच ते सहा बोंबील घेऊन ते साफ करून घ्यायचे आणि त्याचे चार ते पाच तुकडे करायचे .त्यानंतर स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन चमचे तेल, दोन चमचे वाडवळी मसाला किंवा घरचा मसाला,एक चमचा हळद ,चवीनुसार मीठ, कोथिंबीर ,मिरची ,आलं ,लसूण पेस्ट त्यामध्ये टोमॅटो एक किसून घालायचा, त्यामध्ये चिंचेचा कोळ अर्धा वाटी आणि अर्धा चमचा तांदळाचे पीठ हे सर्व बोंबला मध्ये एकत्र करून चमच्याने मिक्स करून घ्यायचं.
तुमच्या घरात जशी माणसं असतील त्याप्रमाणे रस्सा वाढवायचा आणि पाच मिनिटानंतर गॅसवर भाजी ठेवून एक ऊकळा घेणे वरून थोडी कोथिंबीर बारीक कापून घालणे .झटपट बोंबलाचा रस्सा रेडी....
#AV
धन्यवाद 🙏
पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण (Bomblanch kalvan Recipe in Marathi)
नमस्कार,
मी अश्विनी महेश पाटील , आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण दाखवणार आहे.
कृती:- त्यासाठी पाच ते सहा बोंबील घेऊन ते साफ करून घ्यायचे आणि त्याचे चार ते पाच तुकडे करायचे .त्यानंतर स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन चमचे तेल, दोन चमचे वाडवळी मसाला किंवा घरचा मसाला,एक चमचा हळद ,चवीनुसार मीठ, कोथिंबीर ,मिरची ,आलं ,लसूण पेस्ट त्यामध्ये टोमॅटो एक किसून घालायचा, त्यामध्ये चिंचेचा कोळ अर्धा वाटी आणि अर्धा चमचा तांदळाचे पीठ हे सर्व बोंबला मध्ये एकत्र करून चमच्याने मिक्स करून घ्यायचं.
तुमच्या घरात जशी माणसं असतील त्याप्रमाणे रस्सा वाढवायचा आणि पाच मिनिटानंतर गॅसवर भाजी ठेवून एक ऊकळा घेणे वरून थोडी कोथिंबीर बारीक कापून घालणे .झटपट बोंबलाचा रस्सा रेडी....
#AV
धन्यवाद 🙏
कुकिंग सूचना
- 1
पाच-सहा बोंबील घेऊन ते साफ करून तुकडे करून घ्यायचे
- 2
तेल,मसाला, हळद, मीठ,टोमॅटो, चिंचेचा कोळ, तांदळाचे पीठ, कोथिंबीर मिरची,आलं,लसूण पेस्ट बोंबला मध्ये मिक्स करून घ्यायचं.
- 3
रस्सा वाढवायचा
- 4
गॅसवर भाजी ठेवून एक ऊकळा घेणे
- 5
पाच मि. बोंबलाचा रस्सा रेडी
Similar Recipes
-
पारंपारिक पद्धतीने बोंबलाची पोंतेडी (bomblachi potendi recipe in marathi)
पारंपारिक पद्धतीने बोंबलाची पोतेंडीसाहित्य:-केळफुल ,कांदा ,मिरच्या ,कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट,मीठ,मसाला,हळद,अर्धा वाटी तांदळाचे पिठ,एक वाटी चण्याचे पीठ, एक चमचा गरम मसाला ,ओले बोंबील.कृती:- सर्वप्रथम केळफुल घेऊन ते साफ करून घ्यायचं .त्या बोंडाला साफ करताना एक मध्ये दांडी असते आणि एक पापुद्रा असतो तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर ते बारीक कापुन घ्यायच. स्वच्छ पाण्याने धुऊन, त्यामध्ये बारीक कांदा कापून ,दोन मिरच्या बारीक कापून ,त्यामध्ये बारीक कोथिंबीर कापून ,त्यानंतर आलं लसूण पेस्ट, एक चमचा चविनुसार मीठ, दोन चमचे मसाला, एक चमचा हळद ,अर्धा वाटी तांदळाचे पिठ,एक वाटी चण्याचे पीठ, एक चमचा गरम मसाला आणि त्यामध्ये ओले बोंबील साफ करून स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक कट करून मिक्स करून घ्यायचे. हे सगळं मिश्रण एकत्र करून गोळा बनवून घ्यायचा. त्यानंतर मध्ये तीन चमचे तेल टाकून भाकरी करून घ्यावी. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटाने ती भाकरी उलटी करून घ्यावी पुन्हा दहा मिनिटे गॅसवर शिजवून देणे .दहा मिनिटांनी गॅस बंद केल्यानंतर भाकरी थंड झाल्यानंतर तिचे तुकडे पाडावेत. अशा प्रकारे आपली बोंबलाची पोंतेडी रेडी झाली.#AVधन्यवाद 🙏 Hinal Patil -
खाडीची कोलंबी आणि शिंद / वास्ता / बांबु (Bambu Recipe in Marathi)
नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील, मी आज तुम्हाला खाडीची कोलंबी आणि शिन म्हणजेच बांबुची भाजी दाखवणार आहे .साहित्य:- खाडीची कोलंबी एक वाटी, शिंद म्हणजेच वास्ता, दोन पळी तेल ,दोन चमचे मसाला, एक चमचा हळद ,चवीनुसार मीठ, कोथिंबीर ,मिरची ,आलं ,लसूण वाटण टोमॅटो ,बटाटा, कांदा, चिंचेचा कोळ अर्धा वाटी.कृती:- सर्व प्रथम कोलंबी तेलावर टाकून थोडी शिजविल्यावर कांदा घालून तोही परतवायचा. त्यानंतर वाटण ,मसाला ,हळद ,चवीनुसार मीठ हे घालून परतवायचा. मग बटाटा , शिंद घालून सगळं मिक्स करायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडा पाणी घालून भाजी शिजवून घेणे. बटाटा शिजल्यानंतर चिंचेचा कोळ घालावा. त्यानंतर दहा मिनिटं ऊकळा घ्यावा. गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालावी .अशाप्रकारे शींद आणि कोळंबीची भाजी रेडी .#AVधन्यवाद. Ashwini Patil -
पारंपारिक पद्धतीने कोलंबी आणि पाण्यातला आंबा भाजी
पारंपारिक पद्धतीने कोलंबी आणि पाण्यातला आंबा ह्याची भाजी दाखवणार आहे .साहित्य:- वर्षभर भरलेला आपण पाण्यातला आंबा ,एक खाडीची कोलंबी ,आलं लसूण मिरची कोथिंबीर यांचे वाटण तीन चमचे आणि मसाला दोन चमचे, हळद एक चमचा ,मीठ चवीनुसार, दोन पळी तेल.कृती :- सर्वप्रथम कोलंबी साफ करून तेलावर तळायची. त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घालायचा, एक मोठा टोमॅटो बारिक कापून घालायचं ,ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये वाटण, मसाला, हळद ,चवीनुसार मीठ टाकून द्यायचं. एक बटाट्याच्या बारीक काप करून त्या भाजीत घालाव्यात ,त्या भाजी मध्ये थोडे पाणी घालून बटाटा शिजवून आणि कोळंबी शिजवुन घ्यावी .बटाटा शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये पाण्यातला आंबा बारीक कापून घालावा भाजी शिजून द्यावी. त्यानंतर आपल्या घरात जशी माणसं असेतील ,त्याप्रमाणे भाजीत रस्सा ठेवावा. रशाला अर्धा चमचा तांदळाचं पीठ लावून घ्यावं आणि भाजी मिक्स करून घ्यावी .एक ऊकळा भाजीचा घ्यावा .सुंदर अशी आपली खाडीत कोलंबी आणि पाण्यातला आंब्याची भाजी रेडी 🙏🏻#AV Hinal Patil -
पारंपारिक पद्धतीने तांदळाच्या पिठाची मुटकी (Tandalachya Pithache Mutke Recipe in Marathi)
पारंपारिक पद्धतीने तांदळाच्या पिठाची मुटकीसाहित्य :- तांदळाचं जाडसर पीठ, कोथिंबीर, मिरची, सोललेले वाल, बारीक कापलेला कांदा, नारळ खऊन घेतलेला ,मीठ ,तेल, हळद , जीरे , एक पेला तांदळाचे पीठ आणि दोन पेले पाणी .कृती :- सर्वप्रथम तेलावर फोडणी देण्यासाठी एक चमचा जीरे तीन ते चार मिरच्या बारीक कापून एक कांदा बारीक कापून, एक छोटी वाटी कोथिंबीर ,बारीक कापून अर्धा वाटी नारळ खीचून, मीठ, हळद ,एक चमचा छोटी वाटी वाल सोलले हे सगळं तेलावर फोडणी द्यायचं. त्यानंतर दोन ग्लास पाणी टाकून ऊकळुन घ्यायचं थोडे वाल शिजत आले की त्यामध्ये एक पेला तांदळाचे पीठ टाकायचं आणि उकडून घ्यायचं. उकडून झाल्यानंतर पीठ मळून हाताच्या मुठीने मुटके वाळायचे त्यानंतर पुन्हा उकडीच्या करंडयात दहा मिनिटांसाठी उकडून घ्यायचे खूप सुंदर अशी मुटकी आपली रेडी.Ashwini Mahesh Patil धन्यवाद Ashwini Patil -
फिश करी(माशाचे कालवण) (Fish Curry Recipe in Marathi)
मासे शिजवण्यापूर्वी व्यवस्थित साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.इथे मी करी साठी चिंचेचा वापर केलाय. Prajakta Patil -
सुक्या बोंबील चा झणझणीत रस्सा (sukhya bombil cha rassa recipe in marathi)
#cpm3#रेसिपी_मॅगझीन#Week3 "सुक्या बोंबील चा झणझणीत रस्सा"सुक्या बोंबील ची चटणी ही छान होते..पण रस्सा लयच भारी.. आमच्या कडे नाॅनव्हेज खाणाऱ्यांमध्ये बाळंतीण बाईला सर्रास हा बोंबील रस्सा आणि भाकरी कुस्करून जेवायला देतात...हो पण तिखट कमी असते त्यात... आणि व्हेज खाणाऱ्यांसाठी मेथीची पातळ भाजी असते.कारण या दोन्ही पदार्थांमुळे दुध वाढीस उपयोग होतो..पण मी आज मात्र आमच्यासाठी झणझणीत रस्सा बनवला आहे.चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
बोंबील चिली (bombil chilli recipe in marathi)
अस्थिमत्स्य वर्गाच्या सायनोडोंटिडी कुलातील एक मासा. भारतात तो बोंबील या नावाने ओळखतात. बोंबील माशाचे शास्त्रीय नाव हार्पोडॉन नेहेरियस आहे. ते सामान्यपणे उथळ समुद्रात राहतात. भारतापासून चीनपर्यंतच्या नदीमुखांत किंवा किनाऱ्याजवळील समुद्रांत ते आढळतात. मुंबई किनाऱ्याजवळील समुद्रात व बंगालच्या उपसागरात ते मुबलक प्रमाणात दिसून येतात. मुंबईलगत ते मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे त्यांना ‘बॉम्बे डक’ हे नाव पडले आहे. तर चला वेळ न वाया घालवता आपण बोंबील चिली कसे बनवायचे ते पाहू. Mrs. Snehal Rohidas Rawool -
झटकेपट तुप अंड भाजी (Toop Anda Bhaji Recipe in Marathi)
नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील . तुम्हाला झटकेपट तुप अंड भाजी दाखवणार आहे .कृती:- पाच ते सहा अंडी उकडून घेणे .त्यानंतर त्याची साल काढून ती बारीक कापून घेणे . एका पातेल्यामध्ये तीन ते चार चमचे तूप घालून त्यामध्ये फोडणीसाठी तीन चमचे काळी मिरी पावडर ,दोन चमचे जिरा पावडर ,चवीनुसार मीठ हे सर्व फोडणीवर घालने, मग त्यामध्ये उकडलेलीअंडी बारीक कट करून घालने. पाच मिनिटांसाठी शिजवून द्यायचं. पातेल्यावर झाकण ठेवू नये .चमच्याने परतवत राहायचं वरून बारीक कोथिंबीर कापून घालने. आपली रेडी झाली तूप आणि अंड भाजी .#AVधन्यवाद 🙏 Ashwini Patil -
-
सुक्या बोंबील च कालवण
#fish curry #फिशकरीसी फूड माझ्या साठी खरच एक चॅलेंज असता। तेव्हा नेहमी जे काई लवकर आणि सरळ बनेल ते च मे बनवते। त्यात सूका बोंबील ता अगदी बेस्ट , लवकर बनतो ते महत्वा चे। Sarita Harpale -
कांदा-बोंबिल आणि शिसोणी (चिंचकढी) (kanda bobil ani chinch kadhi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावाकडच्या आठवणीपालघर जिल्ह्यातील माहीम हे माझे गाव. आम्ही मूळचे पाचकळशी वाडवळ, शेती हा पिढीजात व्यवसाय. एकदा पाऊस सुरू झाला म्हणजे गावाकडे दिवसभर शेतीच्या कामाची लगबग असते. अशा दिवसात जेवण बनवण्यासाठी फार वेळ देता येत नाही. परंतु अशा परिस्थितीतही तेव्हाच्या गृहिणींनी आपल्या कल्पकतेने ही चमचमीत, कमी वेळात होणारी आणि पौष्टिक रेसिपी शोधली. कांदा-बोंबील व शिसोणी (चिंचेला आमच्या वाडवळी भाषेत शिस म्हणतात). पिढी दर पिढी बनविली जाणारी ही पारंपारिक रेसिपी आहे. यात मोजक्या आणि नेमक्या स्थानिक जिन्नसांचा वापर होतो. मागच्या वर्षी पिकविलेल्या तांदळाचा भात, परिसरात मुबलक प्रमाणात मिळणारी चिंच आणि भाजीसाठी सुके बोंबील.स्थानिक समुद्रात मुबलक प्रमाणात आढळणारे बोंबील (बॉम्बे डक) हे आमचे विशेष जिव्हाळ्याचे मासे. पावसाळ्यात जेव्हा मासेमारी बंद असते अशा दिवसांसाठी, उन्हाळ्यात जास्तीचे बोंबील पकडून ते सुकवून ठेवले जातात. समुद्रकिनाऱ्यावर कडक ऊन आणि खारे वारे यांच्यावर सुकलेले बोंबील अतिशय चविष्ट लागतात.चला तर कांदा-बोंबील आणि शिसोणी (चिंच कढी) वर ताव मारूया! Ashwini Vaibhav Raut -
झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय (kodambi rasa ani bombil fry recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Fish # झणझणीत कोळंबी रस्सा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय# लता धानापुने -
भरलेला पापलेट (Bharlela Paplet Recipe in Marathi)
साहित्य:- एक मोठा पापलेट साफ करून घ्यायचे. पापलेट च्या वरच्या भागाने राऊंड मध्ये दोन्ही साईडने गोल असं कट करून घ्यायचा आहे .त्यानंतर मसाला, थोडसं मीठ आणि त्याला थोडसं दोन तीन थेंब पाणी टाकून मिक्स करायचे आहे आणि आपण राऊंड कट केला आहे त्याला मसाल्याचा हात लावून घ्यायचा आहे. त्यानंतर वाटणा मध्ये कोथिंबीर, मिरची ,आलं, थोडस लसणाच्या चार ते पाच पाकळ्या ,एक चमचा लिंबू चा रस ,नारळ खऊन घ्यायचा आहे हे वाटण तेलावर फोडणी द्यायचं थोडं थंड झाल्यानंतर पापलेट मध्ये भरायचा आहे.पापलेट भरून झाल्यानंतर ते तांदळाच पीठ लावून तव्यावर फ्राय करायचं.#AV#cfAshwini Mahesh Patil: धन्यवाद Ashwini Patil -
लिंबूची पाने टाकून ओल्या बोंबीलाचे कालवण / ग्रेव्ही (limbu pane bombil gravy recipe in marathi)
#GA4#week4फिश करी कोणाला नाही आवडत... अगदी लहानांपासून मोठ्यांन पर्यन्त... लग्न करून चूरी कुटुंबात आले तेव्हा बोंबील कालवण मध्ये लिंबूची पाने टाकताना मी पहिल्यांदा पाहिले. माझ्या सासूबाई नेहमी बोलायच्या अगं खाऊन तर बग... खातच राहशिल. पण हे मात्र खरे निघाले... काय अफलातून लागते.. लिंबाच्या पानांचा वास आणि वाफाळत्या भाताबरोबर तर खूपच भारी लागते.... पालघर जिल्हात चिंचणी, तारापूर या गावात ओल्या बोंबील कालवण ची ही पद्धत आहे हे लग्नानंतर समजले. सासू नेहमी बोलायची ही आपल्या नानांची रेसिपी.. नाना म्हणजे माझे आज्जेसासरे. आज त्यांची रेसिपी तुमच्या समोर मांडत आहे. Trupti B. Raut -
वांगी मसाला (wangi masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4#माझे आवडते पर्यटन स्थळकोल्हापूरला आम्ही एकदा गेलो तिथे महालक्ष्मी मंदिर, शाहू महाराजांचे म्युझियम, रंकाळा तलाव वगैरे बघण्यासारखे खूप काही आहे. मुख्य म्हणजे खादाडी, अस्सल खवय्ये असाल तर एकदा तरी कोल्हापूरला भेट द्यावीच, तिकडचे मुख्य म्हणजे जेवणात जो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरतात त्याचा झणझणीत स्वाद, तेलाचा तवंग अप्रतिम, बघुनच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही तसेच तिकडची स्पेशल डिश म्हणजे पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, झणझणीत मिसळ असे बरेच पदार्थ चाखायला मिळतील. तर आज मी अशीच वांगी मसाला रेसिपी बनविली आहे, बघा बरं कशी झालीय ते...... Deepa Gad -
नारळाच्या रसातील अंडा करी (Coconut Milk Egg Curry recipe in marathi)
समुद्रकिनारपट्टीला राहणारी माणसं जेवणात नारळाचा पुरेपूर वापर करून घेतात. असंच एक सुंदर समुद्रकिनारपट्टी लाभलेलं राज्य म्हणजे केरळ.केरळी पद्धतीची नारळाच्या रसातली अंडा करी करून पहिली आहे. सुप्रिया घुडे -
"मेथी बोंबील मसाला" (methi bombil masala recipe in marathi)
#GA4#week19#keyword_मेथी"मेथी बोंबील मसाला"एक पारंपरिक मस्त चमचमीत रेसिपी... Shital Siddhesh Raut -
ओले बोंबिल कालवण(पारंपारिक रेसिपी) (ole bombil kalvan recipe in marathi)
#GA4 #week18 # Fish हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. ही आमच्या कडची पारंपारिक रेसिपी आहे.हे कालवण पातळ असते नि आंबट थोडे भातावर छान लागते. Hema Wane -
गव्हाच्या पिठाचा पिझ्झा (gavachya pitha cha pizza recipe in marathi)
एक कप गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला दोन चमचे दही घातले बारीक चिरून कांदा टोमॅटो सिमला मिरची घातली या सर्वांचा एक गोळा बनवून घेणे आणि पिझ्झा प्रमाणे थापून थोडीशी जाडसर पोळी लाटून ते कट करून ते तळून घेतले Deepali Surve -
कोकण फीश थाळी (kokan fish thali recipe in marathi)
#HRL -कोकणातील लोकांना आवडणारी गोष्ट म्हणजे फीश..., तांदूळाची भाकरी चल तर मग कोकण मेवा खाऊ या... Shital Patil -
क्रिस्पी बोंबील फ्राय (crispy bombil fry recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडमालवणी जत्रा म्हटली की माश्यांचे विविध प्रकार स्टार्टरचे स्टाॅल म्हणून पाहायला मिळतात .या जत्रेत फिशचे वेगवेगळे प्रकार खाण्यासाठीलोकांची खूप गर्दी पाहायला मिळते.आमच्या येथे मालवणी जत्रा भरते तेव्हा मी बोंबील फ्राय ,जवळा वडे ,कोंबडी वडे आवर्जून खाते...😋😋अशीच एक मालवणी जत्रेतील माझे आवडते बोंबील क्रिस्पी फ्रायची रेसिपी पाहू...😊 Deepti Padiyar -
भेंडीची चिंच गुळातली आमटी(bhendichi chinch gulatil aamti recipe in marathi)
मागील दोन-तीन महिन्यांतील कठीण काळात एक चांगली गोष्ट घडली. आपल्या कडे पूर्वी असलेला आणि मधल्या काळात विस्मरणात गेलेला एक गुण आपल्याला पुन्हा गवसला. आपण पुन्हा लहान गोष्टी तितक्याच उत्साहाने साजऱ्या करू लागलो. आजची ही भेंडीची भाजी अशीच खास आहे. भेंडी ही सर्व मोसमात मिळणारी काहीशी नॉन ग्लॅमरस भाजी. पण चिंचेचा आंबटपणा आणि गुळाचा गोडवा सोबत घेऊन साध्याशा भेंडीचे मेकओव्हर होते आणि जेवणाच्या ताटात ती भाव खाऊन जाते. चलो लेट्स सेलिब्रेट भेंडी! Ashwini Vaibhav Raut -
दोडक्याचे कालवण आणि मोड आलेल्या मुगाची उसळ (dokyache kalwan ani moongachi usal recipe in marathi)
#KS2 रोजच्या जेवणामध्ये कमी मसाला चं साधं जेवण आम्ही बनवतो यामध्ये दोडक्याची रस्सा भाजी वांग्याची रस्सा भाजी याला मी कालवण असे म्हणतो. एक सुकी भाजी यामध्ये मूग चवळी यांच्या उसळी , तर तुम्हाला मी आज दोडक्याचे कालवण आणि मोड आलेल्या मुगाची उसळ कशी बनवायचा सांगणार आहे कोल्हापूर सांगली या भागात रस्सा उसळ यामध्ये दाण्याच्या कुटाचा जास्त वापर केला जातो Smita Kiran Patil -
बोंबील रस्सा (bombil rassa recipe in marathi)
# आज फिश आणले होते..म्हणून रस्सा करायचे ठरवले..चला मग करूया बोंबील रस्सा... Kavita basutkar -
शेपूची वडी (sepu vadi recipe in maartahi)
रेसिपीची गोष्ट अशी नाही पण, शेपू किती पौष्टिक आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच पण आमचे यजमान आणि चिरंजीव शेपू म्हटले कि नाक मुरडतात म्हणून मी एकदा शेपूची वडी करून पहिली आणि काय गंमत बघा यजमान आणि चिरंजीव यांनी आनंदाने खाल्ली सुद्धा.. Sheetal Mahadik -
-
"पारंपरिक सुरळीच्या वड्या" (Suraḷichya vadya recipe in marathi)
#pcr सुरळीच्या वड्या या आधी मी कधीही केल्या नाहीत, एक उत्सुकता होतीच की टेस्ट कशी असेल...?? जमेल की नाही पण म्हटलं एकदा करून बघायला काय हरकत आहे...नाहीं का..!! आणि त्यात कुकर रेसिपी चॅलेंज असल्याने मी या वड्या कुकर च्या मदतीने केल्या आहेत... तसं कुकर म्हणजे माझ्यासारख्या , सगळ्याच गृहिणींचा किचन मधला बेस्टफ्रेंड नाही का...!!!☺️☺️ कारण गडबडीत आणि पटकन होणाऱ्या जेवणासाठी त्याच्याशिवाय कोण आहे,आपल्या मदतीला... होना..!!बिचाऱ्या आपण बायका नोकरी सांभाळून, घर सांभाळून परिवारासाठी सगळं सगळं करतो....!!!पण काही किचन गॅझेट्स जे आपल्या मदतीला धावून येतात, त्या पैकी एक म्हणजे माझा आवडता "प्रेशर कुकर"...चला तर मग मी सुरळीच्या वड्या मी कुकरच्या मदतीने कशा केल्या ते बघुया...👌👌 Shital Siddhesh Raut -
बाफळ्या आणि लिंबाची कढी (baflaya and lemon curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#sunday_फिशकरीपारंपरिक ओले बोंबील घालून केेलेली बाफळ्या आणि लिंबाची कढी"पारंपरिक ओले बोंबील घालून केेलेली बाफळ्या आणि लिंबाची कढी" गरमागरम भात आणि ही कढी असली की दुसरं काहीच नको.... अप्रतिम अशी ही कढी नक्कि करून पहा..👌👌 Shital Siddhesh Raut -
झणझणीत वांग सुकट(वाडवळी style)
सुकी मच्छी ही पावसाळी साठवण असते. सुकट दोन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून घ्या.ह्या भाजीला मीठ थोडं कमीच वापरा. सुकट सुकवताना जास्तीच मीठ असतंच. कापलेली वांगी नेहमी पाण्यात ठेवा नाहीतर लगेच काळी पडतात. Prajakta Patil
More Recipes
टिप्पण्या