झणझणीत वांग सुकट(वाडवळी style)

सुकी मच्छी ही पावसाळी साठवण असते. सुकट दोन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून घ्या.ह्या भाजीला मीठ थोडं कमीच वापरा. सुकट सुकवताना जास्तीच मीठ असतंच. कापलेली वांगी नेहमी पाण्यात ठेवा नाहीतर लगेच काळी पडतात.
झणझणीत वांग सुकट(वाडवळी style)
सुकी मच्छी ही पावसाळी साठवण असते. सुकट दोन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून घ्या.ह्या भाजीला मीठ थोडं कमीच वापरा. सुकट सुकवताना जास्तीच मीठ असतंच. कापलेली वांगी नेहमी पाण्यात ठेवा नाहीतर लगेच काळी पडतात.
कुकिंग सूचना
- 1
गॅस वर तेल गरम करत ठेवा.
- 2
गरम तेलात कांदा छान परतवून घ्या.त्यावर आले लसणाची पेस्ट टाका.
- 3
हळद, लाल तिखट, मीठ टाकून 2 मिनिट छान परतवून घ्या.
- 4
त्यामध्ये पाण्यात भिजवलेली सुकट मिक्स करा.सुकट तेलात परतवल्याने उग्र वास निघून जातो.
- 5
आता सुकट मध्ये चिंचेचा कोळ व चिरलेली वांगी मिक्स करा.
- 6
मिडीयम गॅस वर ही भाजी वाफेवर शिजवा. मध्ये मध्ये भाजीला चमचा फिरवत राहा.भाजीत पाण्याचे प्रमाण कमी वापरायचे आहे. 20 मिनिटात भाजी छान शिजली जाते.उतरवताना मिक्स मसाला व कोथिंबीर टाकून 2 मिनिट भाजी झाकून ठेवा.
- 7
ही भाजी तांदळाच्या भाकरी सोबत अप्रतिम लागते.
Similar Recipes
-
झणझणीत सुकट (Sukat recipe in marathi)
#cooksnapआज मी, Prajkta Patil यांची झणझणीत सुकट ही रेसिपी थोडासा बदल करून कुकस्नॅप केली आहे.सुकट खूप छान झाली आहे.मी ही सुकट ,बटाटा आणि कैरी घालून केली आहे...😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
करंदी सुकट आणि बटाटा (sukat batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण म्हणजे सुकी मच्छी सुकी मच्छी असली अगदी पोटामध्ये दोन घास जास्त जातात. सुकी मच्छी आणि गरम गरम भाकरी काय कॉम्बिनेशन आहे. Purva Prasad Thosar -
करंदी कैरी सुकट (karandi kairi sukat recipe in marathi)
सुकी करंदी माझी आणि माझ्या मुलाची खूप फेवरेट ...😊तांदळाच्या भाकरी सोबत किंवा वरण भाता खूप छान लागते करंदी .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सोड्याचे सुके (sodyache suke recipe in marathi)
#cpm3 सुकट मासाहारी लोकांना ताज्या माशां सोबतच सुकी खारवलेली मच्छी पण तेवढीच प्रिय असते जेवणात सुकी मच्छी असेल तर त्याच्या वासाने व खाण्याने दोन घास जास्तच जातात चला तर अशाच सगळ्यांच्या आवडीचे सोडे म्हणजेच सुकवलेले मिठात खारवलेले प्रान्स त्याची च डिश आज मी बनवली आहे सोड्याचे सुके चला दाखवते तुम्हाला ही रेसिपी Chhaya Paradhi -
बोंबील कांदा फ्राय
सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा घाईघाईने ताजे मासे आणता नाही आले तर वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही.गरमागरम भात, चिंचेचे सार, तळलेला कांदा बोंबील अफलातून जेवण होत. सोबत सुक्का भाजलेले बोंबील😋😋 ह्या भाजीत तुम्ही आवडत असल्यास पातळ बारीक चिरलेला बटाटा सुद्धा घालू शकता. Prajakta Patil -
झणझणीत आगरी कैरी सुकट/ ड्राय झिंगा (dry zhinga recipe in marathi)
कोकणी खवय्यांना सुकट हा प्रकार अपरिचित नाही. सुका बांगडा भाजल्याचा वास नाकात शिरला की, काहींची भूक चाळवते. काहींना मात्र हा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे घरच्या स्वयंपाकघरातल्या या पदार्थाला हॉटेलच्या मेन्यूकार्डमध्ये स्थान देणे हे खरे तर धाडसच. आता नाॅनव्हेज हाॅटेल्स मधे सुद्धा ,फिश थाळीमधे सुकटीला विशेष स्थान मिळाले आहे..😊तर अशीच एक सुकटीची झटपट आणि चविष्ट रेसिपी पाहूयात..😊😋 Deepti Padiyar -
झणझणीत सुकट (जवळा) (sukat recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटलं की प्रथम आठवते ती सुकी मासळी आज मी अशीच झणझणीत सुकट बनवली आहे Rajashree Yele -
कैरी सुका जवळा (kairi suka jawala recipe in marathi)
मैत्रिणींनो आज-काल मच्छी इतकी महाग झाली कीसर्वसामान्यांना दुरून डोंगर साजरे. तरी घरी ठेवणीतली सुकी मच्छी असते म्हणून आज त्याचाच बेत केला आहे. या रेसिपीमधे मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे. Jyoti Gawankar -
फिश करी(माशाचे कालवण) (Fish Curry Recipe in Marathi)
मासे शिजवण्यापूर्वी व्यवस्थित साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.इथे मी करी साठी चिंचेचा वापर केलाय. Prajakta Patil -
मसूर भात
#लॉकडाऊन मसूर ची आमटी बनवतात. पण जेव्हा घरात सामान कमी असते किंवा वेळ नसतो दोन तीन पदार्थ बनवायला तेव्हा हा मसूर भात बनवू शकतो. Swayampak by Tanaya -
गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत वांग रस्सा (Vang Rassa Recipe In Marathi)
वांग्याचा रस्सा म्हटलं कि तोंडाला पाणी सुटतं आणि त्यात चुलीवरचा म्हटलं कि विचारूच नका म्हणून आज गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत वांग रस्सा...😋😋 Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
सुकट आणि तांदळाची भाकरी (sukat ani tandalachi bhakhri recipe in marathi)
#KS1#सुकट आणि तांदळाची भाकरीकोकण म्हंटलं डोळ्यासमोर येतो तिथला नयनरम्य निसर्ग, समुद्र, नारळ - पोफळीच्या बागा, आंबट गोड रानमेवा, काजू,फणस,ताडगोळे, समुद्रातील विविध प्रकारची मासळी....आणि हो फळांचा राजा...आंबाही चाखावा तो कोकणातलाच . जगभरात त्याला खूप मोठी मागणी .आणि याबरोबरच येथील खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध...जेवणात भात आणि मासे यांना प्राधान्य. मासळीचे असंख्यप्रकार खावेत ते इथेच. म्हणूनच बऱ्याचदा लोक कोकणात सहलीला जावून मासळीचा मनमुराद आनंद लुटतात. तसेच व्हेज जेवणामध्येही भरपूर व्हरायटी असते. सोलकढी या जेवणात असलीच पाहिजे. तांदळाचे मोदक, वालाचे बिरडे,पोहा, नाचणीचे पापड काळ्या वाटाण्याची ऊसळ शिवाय नाश्त्यामध्ये पोहे, आंबोळ्या असे नानाविध प्रकार... मासळीमध्ये ओल्या मासळीबरोबरच सुकी मासळीही तितकीच अप्रतिम.. आज म्हणूनच मी तुमच्यासाठी घेवून आले आहे सुकट आणि तांदळाची भाकरी.. कोकण!! अर्थातच भात हे महत्वाचे पिक. त्यामुळे भाकरीही तांदळाचीच.... Namita Patil -
सवतळलेली सुकट बटाटा (savatleli sukat batata recipe in marathi)
#cpm3बहुतेक सगळ्याच पाचकळशी लोकांच्या घरात किराणामालाच्या साठवणी प्रमाणेच सुक्या माश्यांची साठवण केलेली असते. त्यासाठी एक खास हवा-बंद डबा ठेवलेला असतो. ह्या डब्याला मुंग्या लागणार नाहीत अशी दक्षता घेऊन डबा ठेवावा लागतो. डब्यात भरण्यापूर्वी मासे उन्हात पुन्हा चांगले सुकवले की अजून चांगले टिकतात. असे व्यवस्थित सुकवलेले मासे जवळ जवळ वर्षभर चांगले टिकतात. बर्याचदा जेव्हा समुद्रात मासे कमी प्रमाणात मिळतात, मासे मारी पावसाच्या काही दिवसात बंद ठेवली जाते अशा वेळी गर्मीच्या मोसमात सुकवलेले हे सुके मासे उपयोगी ठरतात. तसेच बाजारात जाणे होत नाही, काहीतरी पटकन करण्यासाठी, सकाळच्या डब्यांसाठी सुक्या माश्यांचा जास्त वापर केला जातो.सुक्या माश्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात वापरले जाणारे मासे म्हणजे सुकट, सोडे व सुके बोंबिल. सुकटीचं कालवण, सोडे-वांगे किंवा भाजलेले बोंबिल म्हणजे मेजवानीच की... चला तर मग ह्या मेजवानी मधील सुकट वापरून करूया सवतळलेली सुकट बटाटा... Yadnya Desai -
पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण (Bomblanch kalvan Recipe in Marathi)
नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील , आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण दाखवणार आहे. कृती:- त्यासाठी पाच ते सहा बोंबील घेऊन ते साफ करून घ्यायचे आणि त्याचे चार ते पाच तुकडे करायचे .त्यानंतर स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन चमचे तेल, दोन चमचे वाडवळी मसाला किंवा घरचा मसाला,एक चमचा हळद ,चवीनुसार मीठ, कोथिंबीर ,मिरची ,आलं ,लसूण पेस्ट त्यामध्ये टोमॅटो एक किसून घालायचा, त्यामध्ये चिंचेचा कोळ अर्धा वाटी आणि अर्धा चमचा तांदळाचे पीठ हे सर्व बोंबला मध्ये एकत्र करून चमच्याने मिक्स करून घ्यायचं. तुमच्या घरात जशी माणसं असतील त्याप्रमाणे रस्सा वाढवायचा आणि पाच मिनिटानंतर गॅसवर भाजी ठेवून एक ऊकळा घेणे वरून थोडी कोथिंबीर बारीक कापून घालणे .झटपट बोंबलाचा रस्सा रेडी....#AV धन्यवाद 🙏 Ashwini Patil -
भरली वांगी सोडे घालून (bharli wangi bhaji recipe in marathi)
खास मच्छी प्रेमी साठी ह्या लॉकडाऊन च्या काळात मच्छी बाजारात उपलब्ध नसल्यामुळे बराच हिरमोड होतो पण निदान सूकी मच्छी आणी त्यातही सोडे म्हणजे *सीकेपी* लोकांचे आवडते चला तर मग *सीकेपी स्पेशल भरली वांगी सोडे घालून* Nilan Raje -
-
झणझणीत सुका जवळा (sukka jawala recipe in marathi)
लॉकडाऊन मध्ये जेव्हा चिकन,फीश मिळत नसे तेव्हां सुकी मच्छी चा आधार पण सुखावह वाटला आणि आज रविवारी चिकन-मटणाच्या दुकानापुढे भलीमोठी रांग असल्याने पुन्हा सुका जवळा व तांदळाची भाकरी. Nilan Raje -
सुकट भरलेली वांगी (sukat bharleli Vangi Recipe in marathi)
#cpm3#week3वांग्याला भाज्यांचा राजा म्हटले जातं...आणि या राजाची शान वाढवली जाते ते निरनिराळे प्रकार करून .या वांग्याला निखाऱ्यात भाजलं की बनतं भरीत ,डाळीमधे शिजवलं की बनतं चविष्ट डाळ वांगं....आणि यात मसाला भरला की बनतात भरली वांगी...😋😋पण ,या व्यतिरिक्तही वांग्याचा एक असा प्रकार आहे .जो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.शाकाहार आणि मांसाहार ह्यांचा सुवर्ण सगंमम्हणजेच,सुकट भरलेलं वांगं..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
मोकळ वांग (mokla vanga recipe in marathi)
#KS5 मराठवाडा रेसिपीमोकळ वांग म्हणजेच वांग्याची सुकी भाजी. शेतातील वांगी जेव्हा आकाराने मोठी होतात तेव्हा ही अशी वांग्याची मोकळी भाजी करतात. या वांग्याला मोठी मोठी आणि जास्त प्रमाणात वांगी लागतात. फक्त तेलावर परतून हे मोकळे वांग खूप छान होते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
#मांदेली करी
#सीफुड मांदेली ही मच्छी मला खायला खूप आवडते कारण ती चवदार असते शिवाय खाण्यासाठी सोपी आहे....आज मी मांदेली करी रेसिपी संपादित करत आहे...💯👍🏼 Pallavii Bhosale -
करंदी कैरी सुकट (karandi kairi sukat recipe in marathi)
#दीप्ती पदियारमी दीप्ती ची रेसिपी कूक्सनप केली आहे .मी जेव्हा तुझी रेसिपी पहिली ती मला खूप आवडली .आमच्या घरी ही सुकी करंदी बनवतात पण कैरी टाकून कधीच बनविली नाही पण तुझी डिश पहिली आणि तोंडाला पाणीआलं आणि मी लगेच बनविली घराच्या खूप आवडली थँक्स दीप्ती आरती तरे -
वांग्याचे काप
#लॉकडाउन सोप्पी रेसिपीबागेतली वांगी बघितली, केविलवाणी वाटली...( मी की वांगी ?😜) बोलली, मालकीण कंटाळली वाटते खाऊन. मग काय वांगी कोळंबी, वांगी सुकट, वांगी घोळ मासा... या सगळ्या भाज्या स्वयंपाकघरातून हद्दपार झाल्यात ना. आणि सगळ्या कडधान्य वांगी टेस्ट करून झाली. हाडाची मासेखाऊ मी... माझी रसललना आता माश्याची आतुरतेने वाट पाहतेय... नको माझा अंत असा पाहू... माश्याविणा प्राण हा जाऊ पाहे...आणि मग जड अंतकरणाने त्या वांग्यांचा उद्धार करण्याकरिता वांग्याचे काप केले... याला म्हणतात माश्यांची तहान वांग्यावर... Minal Kudu -
-
गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi)
#GR2गावरान उकड भरलेली वांगी भाकरी किंवा भाताबरोबर खूप चविष्ट लागतात.ही वेगळ्या पद्धतीने उकड काढून भरलेली वांगी, एकदा नक्की करून पाहा. Deepti Padiyar -
-
वांग सोयाबीन रस्सा भाजी
#lockdownrecipe day 17आज थोडी वांगी होती त्यात जरासे सोयाबीन घालून रस्सा भाजी बनवली. Ujwala Rangnekar -
मोकळी वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझीन#वांग_बटाटा_भाजी मी या आधीच एक वांगी बटाटा रस्सा भाजी शेअर केली आहे👉 पण आज या रेसिपी मॅगझीन साठी पुन्हा एकदा ही मोकळी वांग बटाटा भाजी सादर करत आहेत🤗 मोकळी म्हणजे मी या भाजी मध्ये पाणी न घालता बनवलेली आहेत🤗 म्हणून मी या भाजीला मोकळी वांग बटाटा भाजी हे नाव देत आहे👉 Jyotshna Vishal Khadatkar -
आमखंडी(वाडवळ स्पेशल)
एकदम साधी सोप्पी, तोंडाला पाणी आणणारी तेवढीच मोजक्याच जिन्नसात तयार होणारी रेसिपी.पिढी दर पिढी बनविली जाणारी ही पारंपारिक रेसिपी आहे. अगदीच मोजक्या जिन्नसांचा वापर होतो.कैऱ्यांच्या मोसमात करंदीसोबत युती घडवून तयार होणारी हि अस्सल वाडवळी रेसिपी. लंगडी म्हणून एक भांड्याचा प्रकार असतो ते भांड तुम्ही ह्या भाजीसाठी असेल तर वापरू शकता.आंबट गोडसर चटकदार कैरीचा सिझन सुरू होतो आणि फिशमार्केटला करंदी मिळायला सुरुवात होते.फिकट गुलाबी रंगाची ही करंदी जरी आकाराने छोटी असली तरी चवीला खूप छान असते. भाजी शिजल्यावर जो वास पसरतो ना त्यानेच तोंडाला पाणी सुटते. ज्यांना कैरी खाल्यावर त्रास होतो त्यांनी वाफेवर ठेवलेल्या पाण्यात कैरीच्या फोडी शिजवून घ्याव्यात आणि मग भाजीत मिसळून घ्याव्यात.(त्याने कैऱ्यांचा आम निघून जातो. )कैरी शिजलेले वाफेवरचे पाणी भाजीत टाकू नये.ही भाजी दुपारी बनवून थंड झाल्यावर संध्याकाळी खाण्यात खरी मज्जा असते😋ही भाजी गरमागरम भात,तांदळाच्या भाकरी अथवा घावण्यासोबत छान लागते.ह्या भाजीचा अजून एक प्रकार राळुन करणे.ही पद्धत तुम्हाला माहीत आहे की नाही त्याची मला कल्पना नाही. पण राळलेल्या भाज्या खूप चविष्ट लागतात.वाडवळी मसाला प्रत्येकाकडे असेलच असे नाही तुम्ही तुमच्या घरातील रोजचा घरगुती मसाला भाजीत घालू शकता. Prajakta Patil -
कालवा सुख्खा (Oyester Masala recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2आमच्या गावी समुद्र असल्यामुळे मासे हे भरपूर मस्त ताजे मासे माश्यांचे विविध प्रकार खायला मिळतात. माझी आजी ही मासे असो किंवा काहीही अतिशय उत्तम बनवते त्यात तिच्या हातची कालव आहा एकदम भारीच तिच्या कडून मीही शिकले कालव बनवायला म्हणून आज कालव सुख्खा ही पाककृती पोस्ट करत आहे. Shilpa Wani -
More Recipes
टिप्पण्या