शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#cooksnap #कुकपॅड वरची 200 वी रेसिपी म्हणून काहीतरी गोड करावे मैत्रीणी साठी म्हणून चारूशीला प्रभू यांची रेसिपी cooksnap केली आहे.खुपच अप्रतिम झाली चारू रेसिपी.अर्थात थोडा बदल केला आहे फक्त मिल्कमेड ऐवजी जरा दुध जास्त आठवले नि पेढे टाकले त्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
2/3 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरदुध
  2. 2-3पेेढे
  3. 2 टेबलस्पूनसाखर
  4. 5-6काड्या केसर
  5. 2 टेबलस्पूनबदाम काप
  6. 2 टेबलस्पूनपिस्ता काप
  7. 2 टेबलस्पूनकाजू काप
  8. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  9. 2 टेबलस्पूनमध
  10. 3/4 टेबलस्पूनतुप

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    प्रथम दुध उकळत ठेवावे व साधारण 300 मिली होईल एव्हढे आटवावे.त्यात पेढे कुस्करुन घालावे हे मिल्कमेड चे काम करतात.साखर घाला छान उकळले कि वेलचीपुड घाला,दुधात भिजवलेले केसर घाला नि थंड करायला फ्रीज मधे ठेवा.

  2. 2

    आता ब्रेड स्लाईस घ्या कडा कापून घ्या एका स्लाईस चे दोन तुकडे करा नि मंद गॅसवर तुपात परतून घ्या.व मधात घोळवून बाजुला ठेवा.

  3. 3

    बदाम,पिस्ता,काजू पातळ स्लाईस करा.

  4. 4

    आता एका डीश मधे मधात घोळवलेले ब्रेडचे तुकडे ठेवा वरती रबडी म्हणजे आटवलेले दुध घाला,ड्रायफ्रूट घाला नि खायला द्या.

  5. 5

    अप्रतिम शाही तुकडा झालेला आहे आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes