शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#cooksnap # खूप दिवसांनी संधी मिळाली भाग्यश्री ताईंची रेसिपी cooksnap करायची... खरच,खूप छान चव आहे आमटीची...सहज सोपी करायला....thanks ...

शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi)

#cooksnap # खूप दिवसांनी संधी मिळाली भाग्यश्री ताईंची रेसिपी cooksnap करायची... खरच,खूप छान चव आहे आमटीची...सहज सोपी करायला....thanks ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीतुरीची डाळ
  2. 2शेवग्याच्या शेंगा
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  5. 1/4 टीस्पूनहिंग
  6. 1 इंचआले बारीक चिरून
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 4-5हिरव्या मिरच्या
  9. 5-7कढीपत्ता पाने
  10. 3बटुक चिंच
  11. 1 लहानगुळाचा खडा
  12. 1 टीस्पूनगोडा मसाला
  13. कोथिंबीर
  14. खोबरे किस (ओले खोबरे असेल तर उत्तम)
  15. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

20-25 मिनिट
  1. 1

    तुरीची डाळ धुवून त्यात हळद घालून शिजवून घ्यावी. शेवग्याच्या शेंगा सोलून त्याचे तुकडे करून घ्यावे. ते पाण्यात मीठ टाकून उकळून घ्यावे.

  2. 2

    आता गॅस वर एका कढईत तेल टाकून गरम करावे. जीरे, मोहरी, हिंग टाकावा. कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आले आणि थोडीशी कोथिंबीर टाकून परतून घ्यावे.

  3. 3

    आता त्यात शिजलेले आणि घोटलेले वरण टाकावे. मिक्स करून घ्यावे. गोडा मसाला, चिंच, गूळ आणि चवीनुसार मीठ टाकावे.

  4. 4

    त्यानंतर उकडलेल्या शेंगा त्यातील पाण्यासह टाकाव्यात. त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी टाकून 2-3 उकळ्या काढून घ्याव्यात. नंतर खोबरे किस आणि कोथिंबीर टाकून गॅस बंद करावा. माझेकडे ओले खोबरे नसल्यामुळे मी कोरडा खोबरं किस टाकलेला आहे.

  5. 5

    आता चविष्ट, शेवग्याच्या शेंगांची आमटी तयार आहे. गरमागरम भाकरी किंवा पोळी सोबत सर्व्ह करावी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes