शेवग्याच्या शेंगांची डाळ (Shevgyachya Shenganchi Dal Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

#RDR
जेवण म्हटलं की डाळ ही हवीच. पण आपण गृहिणी फक्त डाळीचे किती वेगवेगळे प्रकार करत असतो! आणि आता सध्या शेवग्याच्या शेंगा मस्त मिळू लागल्या आहेत. शेंगा पण विविध प्रकाराने आपण खाऊ शकतो. डाळीतल्यातल्या शेंगा तेवढ्याच छान लागतात, आणि डाळीला एक प्रकारची विशिष्ट चव लागते. पाहूया शेवग्याच्या शेंगांची डाळ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटं
  1. 4शेवग्याच्या शेंगा
  2. 1मोठी वाटी तुरीची डाळ
  3. 3हिरव्या मिरच्या
  4. 1 चमचाचिंच गुळाचे पाणी
  5. राई कढीपत्ता हिंग फोडणीकरिता
  6. मीठ आवश्यकतेनुसार
  7. 1पळी तेल फोडणी करता
  8. 1/4 चमचाहळद
  9. 1 चमचाबारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

३० मिनिटं
  1. 1

    प्रथम तुरीची डाळ मीठ,हळद घालून कुकरला तीन शिट्ट्या काढून शिजवून घ्यावी.

  2. 2

    तुरीच्या शेंगा आपल्याला हव्या त्या आकारात कापून सोलून पाच मिनिट पाण्यात भिजवून ठेवाव्यात.

  3. 3

    पातेल्यामध्ये फोडणी करता तेल घालून, राई,कढीपत्ता, हिंग,व हिरव्या मिरचीची फोडणी झाल्यावर, त्यात शेवग्याच्या शेंगा थोडं मीठ आणि थोडं पाणी घालून शिजत ठेवाव्यात. (कुकरमध्ये डाळीबरोबर लावल्यास शेंगा जास्त शिजतात म्हणून मी नेहमी शेंगा अशा फोडणीवर शिजवून घेते)

  4. 4

    शेंगा नीट शिजल्यावर त्यात शिजवलेली डाळ,चींच,गुळ,घालून नीट ढवळून,उकळ आल्यानंतर सर्वात शेवटी ताजी कोथिंबीर घालून गरम गरम भाताबरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes