शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी (Shevgyachya Shengachi Sukhi Bhaaji Recipe In Marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#BR2
सोनाली सूर्यवंशी यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.

शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी (Shevgyachya Shengachi Sukhi Bhaaji Recipe In Marathi)

#BR2
सोनाली सूर्यवंशी यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. 3-4शेवग्याच्या शेंगा
  2. 1कांदा
  3. 1मोठा टोमॅटो
  4. 1/2 टेबलस्पून लाल तिखट
  5. 1/2 टेबलस्पूनकांदा-लसूण मसाला
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 2 टेबलस्पूनशेंगदाण्याचा कूट
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. 1 टीस्पूनजीरे -मोहरी
  10. 1/4 टीस्पूनहिंग
  11. तेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    शेवग्याच्या शेंगांचे एकसारखे तुकडे करून घेणे व त्याची वरच्या शिरा काढून घेणे. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेणे. गॅसवर कढई तापत ठेवणे.त्यात तेल घालणे. तेल तापले की, त्यात जीरे,मोहरी, हिंग यांची फोडणी करून घेणे.

  2. 2

    कांदा घालून गुलाबीसर भाजून घेणे. नंतर टोमॅटो घालून परतणे. टोमॅटो मऊ झाले की सर्व मसाले घालून घेणे.
    तुम्ही नुसते लाल तिखट ही घालू शकता.

  3. 3

    सर्व मसाले व्यवस्थित परतले की त्यात शेवग्याच्या शेंगा घालून व्यवस्थित परतून घेणे व थोडेसेच पाणी घालून (साधारण तीन चार टेबलस्पून) झाकण ठेवून शेंगा शिजवून घेणे.

  4. 4

    अधून मधून शेंगा हलवत राहणे. शिजल्या का नाही ते पाहणे.पुन्हा झाकण ठेवून शिजवणे.

  5. 5

    शेंगा शिजल्या की त्यात दाण्याचं कूट घालून, व्यवस्थित मिक्स करणे. झाकण ठेवून एक वाफ काढून घेणे. गॅस बंद करावा. वरून‌ चिरलेली कोथिंबीर घालणे.

  6. 6

    शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes