रताळ्याचे श्रीखंड (ratadyache shrikhand recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#उपवास # आमचे इकडे महाशिवरात्रीला रताळ्याचे जरा जास्त महत्त्व आहे . त्यामुळे बहुदा एक तरी उपवासाचा पदार्थ या दिवशी केला जातो. असाच एक पदार्थ मी आज केलाय... रताळ्याचे श्रीखंड..खूप छान लागते...आणि करायला एकदम सोपे...

रताळ्याचे श्रीखंड (ratadyache shrikhand recipe in marathi)

#उपवास # आमचे इकडे महाशिवरात्रीला रताळ्याचे जरा जास्त महत्त्व आहे . त्यामुळे बहुदा एक तरी उपवासाचा पदार्थ या दिवशी केला जातो. असाच एक पदार्थ मी आज केलाय... रताळ्याचे श्रीखंड..खूप छान लागते...आणि करायला एकदम सोपे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅमगोड घट्ट दही
  2. 1मध्यम आकाराचे रताळे
  3. 4 टेबलस्पूनसाखर किंवा चवीनुसार
  4. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  5. 2 टेबलस्पूनआवडीनुसार सुकामेवा तुकडे
  6. 1 टीस्पूनचारोळी
  7. 5-7केशराच्या काड्या

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सुरुवातीला रताळे धुवून त्याचे मोठे काप करावेत. भेटलेले रताळे मोठे असल्यामुळे त्याचे काम केलेले आहे. लहान आकाराचे रताळे असेल तर काम करण्याची गरज नाही.

  2. 2

    आणि शिजेपर्यंत उकडून घ्यावेत.आणि सोलून मॅश करून घ्यावे.

  3. 3

    हे सर्व होईपर्यंत दही एका पांढऱ्या कापडात बांधून लटकून ठेवावे. आणि त्याचा चक्का बनवून घ्यावा.

  4. 4

    चक्का तयार झाल्यावर चक्का आणि मॅश केलेले उकडलेले रताळे एका भांड्यात काढावे. त्यात साखर टाकावी.

  5. 5

    चमच्याने चांगले मिक्स करून घ्यावे. आणि हँड ब्लेनडर किंवा मिक्सर मधून छान चोपडे बारीक करून घ्यावे.

  6. 6

    श्रीखंड आपल्याला पाहिजे तेवढेच स्मुथ झाल्यावर, त्या त आवडेल त्याप्रमाणे सुका मेव्याचे तुकडे टाकावे, वेलची पावडर टाकावे. चारोळी मात्र आठवणीने टाकावी. केशर च्या काड्या गरम दुधात मिक्स करून ते थंड करून त्यात टाकावे. आणि सर्व एकत्र करून घ्यावे. रताळ्याची श्रीखंड तयार आहे.

  7. 7

    हे तयार श्रीखंड, आपण लगेचच खाऊ शकतो... किंवा फ्रिजमधे थंडगार करून त्याचा आस्वाद घेऊ शकतो...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes