परवल / परवर फ्राय (parwal fry recipe in marathi)

#GA4 #Week26 की वर्ड-- point guard
परवल ही तोंडली वर्गातील फळभाजी..साधारणपणे उन्हाळ्यात मिळणारी ही भाजी..उत्तम antioxidant,डायबिटीस साठी वरदान,diatary fibres भरपूर,त्वचेसाठी उपकारक, भूकवर्धक,रोगप्रतिकारक शक्ती ची वाढ,कँल्शियम,मँग्नेशियम,व्हिटॅमिन्सचा स्त्रोत असलेले हे परवल आपल्या आहारात असायलाच हवा... हा आपला परवलीचा शब्द बनवू या..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम परवर चे उभे पातळ काप करून घ्यावेत बटाट्याचे देखील उभे काप करून घ्यावेत मिरच्या कोथिंबीर चिरून घ्यावी.
- 2
एका कढईत तेल तापत ठेवावे तेल तापल्यावर मोहरी जीरे हिंग हळद यांची खमंग फोडणी करून घ्यावी नंतर यात कडी पत्ता मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर आणि आल्याचे तुकडे घालून फोडणी परतून घ्यावी आता यामध्ये बटाटे घालावेत आणि बटाटे सोनेरी रंगावर शिजवून घ्यावेत
- 3
आता परवल घालून भाजी परतून घ्यावी झाकण ठेवून 4-5 वाफा काढा..भाजी शिजताना त्यात मीठ साखर घालून मिक्स करा..भाजी शिजली की त्यात ओलं खोबरं घाला आणि परत 1-2 वाफा काढा..वरुन कोथिंबीर घाला..
- 4
गरमागरम पोळीबरोबर ही खमंग रुचकर परवल फ्राय भाजी सर्व्ह करा..
- 5
- 6
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
तोंडलीची सात्विक भाजी (tondali satvik bhaji recipe in marathi)
#skmLearn with Cookpad...#तोंडलीची_भाजी..रोजच्या आहारात आपण अनेक भाज्यांचा समावेश करत असतो. यात फळभाज्यांपासून ते पालेभाज्यांपर्यंत अनेक भाज्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत. त्यामुळे या भाज्या शरीरासाठी गुणकारी असल्याचं दिसून येतं. यामध्येच तोंडली खाण्याचेदेखील अनेक फायदे आहेत. परंतु, अनेक वेळा तोंडली खाण्यास काही जण नकार देतात.तोंडली म्हटलं की बऱ्याच जणांकडून नापसंतीचा सूर ऐकायला मिळतो, पण आहारमूल्यांच्या दृष्टीने पाहिलं तर तोंडली शरीराच्या निरोगीपणासाठी आवश्यक असणाऱ्या फळभाज्यांपैकी एक आहे. वेलवगीर्य भाज्यांमध्ये मोडणाऱ्या तोंडलीचं उगमस्थान भारतातच आहे. मात्र, पोटाच्या विकारापासून ते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापर्यंत तोंडली खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात तोंडली खाण्याचे फायदेः१. उष्णतेमुळे तोंडात फोड आल्यास कच्चे तोंडले चावून खावे.२. पोटांच्या तक्रारी दूर होतात३. शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवते.४. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.५. ताप आल्यास गुणकारी६. पचनक्रिया सुरळीत ठेवते.कारण या भाजीमध्ये 94%पाणी असते..७. अपचन, गॅसेसच्या समस्या दूर ठेवते.८. तोंडली खाल्ल्यामुळे भूकेवर नियंत्रण राहते. अनेक जण तोंडलीची भाजी खाताना नाकं मुरडतात. अशा वेळी मसालेभात, तोंडल्याचं भरीत ,भरली तोंडली अशा विविध रेसिपींचे option आहेतच आपल्याकडे..😀 Bhagyashree Lele -
फ्लॉवर बटाटा वाटाणा रस्सा (flower batata vatana rassa recipe in marathi)
#pr#चॉकलेट मेकिंग वर्कशॉप#फ्लॉवर_बटाटा_वाटाणा रस्सा रस्सा,कुर्माभाजी या साधारणपणे सर्वांच्या आवडीचा भाजीचा प्रकार..रसाच्या भाज्या,आमटी,डाळ जेवणात असते तेव्हां कोरडं कोरडं न वाटता अन्नरस चांगले पाझरतात आणि अन्नपचन देखील चांगले होते..म्हणूनच भारतीय खाद्यसंस्कृती मध्ये चौरस आहाराला फार महत्व आहे..कारण शरीराचे भरण पोषण आपण घेत असलेल्या आहारातूनच होत असते..*आहार हेच औषध * हेच सूत्र आहे आपल्या खाद्यजीवनाचे..चला तर मग हे सूत्र पाळण्यासाठी रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#Trending_recipe कोबी..पत्ताकोबी..जगभरातील किचन मधला हुकमाचा एक्का...या भाजीचे वेगवेगळ्या पद्धतीने केलेले variations आपल्याला बघायला मिळतात...एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतात ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते..अर्थातच त्यामुळे आपण या एकाच भाजीच्या विविध स्वाद,विविध चवी चाखू शकतो..त्यातीलच चणाडाळ घालून केलेली कोबीची भाजी माझी अतिशय आवडीची..चला तर मग या सोप्या,झटपट,बिना कांदालसणाच्या पण अतिशय खमंग अशा कोबीच्या भाजीच्या रेसिपीकडे..😋😋 Bhagyashree Lele -
पडवळ डाळिंब्या (parwal dalambiya recipe in marathi)
#GA4 #Week24 की वर्ड-- Snake guard..अर्थात पडवळ...पडवळ, शिराळे, दोडका ,घोसाळी, गवार ,कारली..ही काय भाज्यांची नावे झालीत.. ही नाव ऐकूनच त्या भाज्या खाव्याशा वाटत नाही.. काय माहिती कोणी ठेवली असली अतरंगी नाव भाज्यांना...म्हणून मला भाज्या खायला आवडतं नाहीत Teacher..इति माझी एक student..कोणे एके काळी मी Teacher होते तेव्हां 4 th ला की 5th ला शिकवायला असताना एका student चा मला प्रश्न..😄..पुढे हाच प्रश्न मला माझ्या मुलाने नंतर भाचीने विचारला..काय बोलणार मी..बोलती बंद..वर्षे उलटली,पिढ्या बदलल्या तरी प्रश्न मात्र तोच कायम..अशा प्रश्नांना बगल देऊ शकत नाही म्हणून काहीतरी थातुरमातुर सांगायचं..आणि स्वतःच्या डोक्याचं दही करुन घ्यायचं हे तमाम गृहिणींचे सकाळ संध्याकाळचं routine..*केलंय हे खा..नाहीतर बस उपाशी*..हा आपल्या आयांचा खाक्या..हम्म्म..छडी लागे छमछम चा जमाना होता तो..काळाप्रमाणे सगळीच गणितं बदलली..जग जास्त जवळ येऊ लागलं..Child Psychology चा विचार जास्त होऊ लागलाय..म्हणून मग हातात घास घेऊन धावतात मुलांच्या मागे आया.Every dog has his days 😜..चलता है.कुठून कुठे पोहोचले मी..digital Technologyच्या ,fast food च्या जमान्यात रोजचं जेवण पण interesting हवं असतं.त्याच नादात *माझे स्वयंपाकाचे प्रयोग*हे स्वतःच्याच अनुभवांचे पुस्तक गृहिणीच्या मदतीला धावून जाते.आणि मग ती रांधून वाढते.हे सगळं जरी खरं असलं तरी खाद्यसंस्कृती जर टिकवायची असेल तर काही super duper combinations ला पर्यायच नसतो..ती तशीच करायची..शास्त्रं सांगतं ते.आपण नाही ब्वाॅं..असं म्हणत ती combinations करायचीच अधूनमधून..असंच एक fantastic combination म्हणजे पडवळ डाळिंब्या.सुखाचा घास असतो तो.रांधायचाआणि ताटात वाढायचा...कसा ते सांगते Bhagyashree Lele -
शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi)
#GA4 #Week25 की वर्ड-- Drumsticksशेवगा शेंगा..हा की वर्ड वाचल्यावर लहानपणीचे अंगणातले शेवग्याचे झाड.. शेवगा आणि सुरण यांना व्हेजवाल्यांच नॉनव्हेज म्हटले जाते आणि ते खरं देखील आहे कारण दुधाच्या चार पट, मटनाच्या 800 पट यामध्ये कॅल्शियम असते. जवळपास तीनशे विकारांवर मात करणारे ,कुपोषण थांबवणारे शेवगा , अनेक व्याधी नाहीसे करणार्या शेवग्याला जागतिक आरोग्य संघटनेने *चमत्कारी वृक्ष* म्हटले आहे .शेवग्याची पाने, फुले बिया शेंगा या सगळयाचा औषधी उपयोग आहे..साधारण 100 ग्रॅम इतक्या वजनाच्या शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये तितक्याच वजनाच्या गाजराइतके अ जीवनसत्व, संत्र्यापेक्षा अधिक मात्रेमध्ये क जीवनसत्व, दुधापेक्षा अधिक मात्रेमध्ये कॅल्शियम, केळ्यामध्ये असते त्यापेक्षा अधिक पोटॅशियम, पालाकापेक्षा अधिक मात्रेमध्ये लोह, आणि दह्यामध्ये असतात त्यापेक्षा जास्त प्रथिने असल्याचे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स आहेत.तर असा हा प्रोटीन कॅल्शियम विटामिन्सचा बारमाही खजिना..कायम लुटलाच पाहिजे आपण.. Bhagyashree Lele -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#gur#वाटली_डाळ...😋😋 गणपती विसर्जनाच्या दिवशी खिरापत म्हणून तसेच बाप्पा बरोबर शिदोरी देण्यासाठी करण्यात येणारा वाटली डाळ हा अतिशय खमंग चमचमीत असा नैवेद्याचा प्रकार आहे आणि तो घरोघरी आवर्जून केला जातो ..गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी घराघरातून या वाटल्या डाळीचा खमंग सुवास सगळीकडे दरवळत असतो..चला तर मग खिरापतीचा हा प्रकार पाहू या.. Bhagyashree Lele -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#मटार_उसळ हिवाळ्यात बाजारात सर्वत्र ताजा ताजा हिरवा मटार दाखल होतो..आपण सगळे त्या हिरव्या राशींच्या मोहात नकळत पडतोच हे काही नव्याने सांगायला नको..😀 आणि हिरवा मटार आपल्या स्वयंपाकघरात दिमाखात पावले टाकत विराजमान होतो...आणि मग सुरु होतो मटार महोत्सव.. एक से एक भारी ,खमंग मटार रेसिपीज शिजून आपल्या ताटात समोर येतात तेव्हां..वाह..क्या बात है..😋 असं म्हणत आपण त्यावर अगदी तुटून पडतो..😀काय करणार खाण्यासाठी जन्म आपुला हे ब्रीदच आहे आपलं...😂 याच मटार महोत्सवातील बिना कांदा लसणाची मटार उसळ म्हणजे माझ्यासाठी एक खमंग चविष्ट celebration च जणू...🤩जास्त तामझाम करावा लागत नाही या चवदार मटार उसळीला..चला तर मग सुरु करुया या मटार महोत्सवाच्या खमंग celebration ला..😋 Bhagyashree Lele -
🍃तोंडली फ्राय
🍃तोंडली एक वेलीफळ आहेरोज तोंडली खाल्ल्याने एसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तोंडली अत्यंत महत्वाची मानली जातात. तोंडली खाल्ल्याने भूकेवर नियंत्रण येण्यास मदत होते. P G VrishaLi -
फोडणीची पोळी (phodhni chi poli recipe in marathi)
#mfr#World_food_day#फोडणीची_पोळी#फोपोफोभा😲😍😋😋 बा अदब बा मुलाहिजा होशियाsssssर...काल आमच्याकडे श्री.व सौ.श्रीमंत शिळावळ सरदार 👨👩👧यांची कन्या आपल्या खमंग नखर्याने भल्याभल्यांच्या जिभेची तपश्चर्या हरण करणारी रंभा,उर्वशी #फोडणीपोळीसुंदरी👸 💃😍आणि तितकाच खवखळ,अल्लड मदनापरि भासणारा नाजूक साजूक पुत्र👪 #फोडणीभातेश्वर🤴😊 यांना मुद्दाम ठरवून आमंत्रण देण्यात आले होsss😀😀 व्वा.. सकाळ सकाळी ठरल्यावेळी ही मंडळी पधारली देखील 🤩🤩ते ही अगदी साधारण पणे मूळ रूपातच म्हणायला हरकत नाही..म्हणजे काय विचारताय होय..अहो आपल्या ठराविक भालदार🌰 चोपदारांना🍅 घेऊन हो.. (कांदा, टोमॅटो हो😃) ... इकडे आमच्या दोन्ही युवराजांना Manchester United⚽Club आणि Arsenal ⚽ Club च्या खालोखाल हे राजघराणं प्रिय 🤗 असल्यामुळे त्यांचं स्वागत 🎉🎊 तर दणक्यात झालं.. शिळोप्याच्या भरपेट गप्पा मारत हा अंक पण फस्त झाला😄😄..काय आहे नं यांचं हे मूळ स्वरुप भारी प्रिय हो आमच्या फुटबॉल वाल्यांना...अगदी अच्छे दिनच वाटले त्यांना ...तसे ते बोलले देखील😜😊 (आम्हां पामरांच्या माफक अपेक्षा हो असं म्हणत.😀) असो.....आता यापुढे आपली King Maker ( अस्मादिक) फो पो आणि फो भा ची🤝 युती कोणाबरोबर करणार का त्यात १३ धान्याचं भाजणी mix करुन कडबोळं 🍥करुन आपल्याला खायला घालणार या विचारातच आमची24×7फुटबॉल संघटना एकमेकांशी सल्लामसलत करण्यासाठी आपल्या कक्षात रवाना झाली...आणि मी माझ्या हक्काच्या कक्षात👸🤩😎..पुढच्या तयारीला☕🥔🥕🌶️🥒🔪🥙🍽️😊😊टीप....फो पो फो भा चा फन्ना उडविल्यामुळे माझ्या वाटणीचं जेवढं आलं ते जास्त कसं दिसेल ..त्या angle ने फोटो काढून पोस्टलेत😂 आणि सरदार घराणं म्हणून editing चा तामझाम😍 Bhagyashree Lele -
उकडलेल्या बटाट्याची किंवा सोल्या बटाट्याची भाजी (ukadlelya batatchyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge#श्रावण_स्पेशल_भाजी...🥔🥔😍😋#Cooksnap# उकडलेल्या बटाट्याची भाजी..😋 वर्षभर तसंच श्रावण महिन्यात उपवास सोडताना आणि सणांच्या निमित्ताने देवाला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या भाजी चे स्थान अगदी परमनंट असते. अतिशय खमंग खरपूस अशी ही सात्विक भाजी पोळी ,पुरी, भात, लोणच्या बरोबर अतिशय अफलातून चवीची लागते. माझी मैत्रीण@Charusheela Prabhu हिने केलेली बटाट्याची भाजी आज मी cooksnsp केलेली आहे ..चारू ही बटाट्याची भाजी अतिशय खमंग खरपूस झालेली आहे .मला खूप आवडली.Thxnk you so much for this wonderful recipe😊👌🌹❤️❤️ Bhagyashree Lele -
आंबा डाळ (amba daal recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव _रेसिपीज #आंबाडाळ.. परवा अक्षय्य तृतीया झाली..चैत्रगौरी सासरी परत जातात..महिनाभर माहेरपणाला आलेली ही गौर जाताना सुखद आठवणी घेऊन जाते..या माहेरवाशिणीचे आपण केलेले कोडकौतुक मनात साठवून आपल्या बरोबर घेऊन जाते..आपणही मोठ्या उत्साहात कोडकौतुक, हळदीकुंकू करतो आपल्या चैत्रगौरीचं..तिच्या आगमनाने खरंतर आपणच विसावलेले असतो,आनंदले असतो..मनाला सकारात्मकता लाभते आपल्या..किती खोलवर विचार केलाय आपल्या पूर्वजांनी या सगळ्या सणांचा.. आणि मग याच उत्साहात प्रत्येक जण जसं जमेल तसं विविध खाद्यपदार्थ करुन गौरीचे आणि पर्यायाने स्वतःचे लाड करुन घेतो. मी पण चैत्रगौरीसाठी चटपटीत आंबाडाळ केलीये..चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#श्रावण_शेफ_वीक4_चँलेंज#उपवासाची _बटाटा_भाजी अत्यंत खमंग चमचमीत आणि सर्वांना आवडणारी उपवासाची बटाटा भाजी.. अत्यंत सात्विक,सोपी,चवदार, चविष्ट अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi amti ani daynanchi amti recipe in marathi)
#एकादशी आज जया एकादशी.. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं गेलंय..माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील ही एकादशी *जया एकादशी* या नावाने प्रचलित आहे..जिच्या नावातच *जया* हा शब्द आहे ..त्यामुळे मग हे व्रत अथवा एकादशीचा उपवास करुन श्री विष्णूंचे पूजन केल्यामुळे सर्व कष्टांपासून मुक्ती मिळून देवी लक्ष्मी भक्तांंवर कृपेचा वर्षाव करते.तसेच श्रीविष्णूंचा जप केल्याने पिशाच योनिचे देखील भय रहात नाही असे पंचांग पुराणात सांगितले आहे. उपवास म्हणजे देवाच्या जवळ जास्तीत जास्त आपला वास ठेवणे..उपवास करुन रोजचे जेवण न घेता मोजका हलका आहार घेऊन शरीरशुद्धी करणे..शरीरातील toxic द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी ही व्रत वैकल्ये आणि उपवास ही..जणू anti Oxident च.. खाण्याच्या बाबतीतलं हे सगळं लिहीण्यासाठी छान वाटतं..पण प्रत्यक्षात वेळ आली की जीभ गप्प बसत नाही..कामालाच लावते ना राव..किती निग्रह करा..शेवटी हतबल होऊन *एकादशी दुप्पट खाशी*हाच नियम अमलांंत आणावा लागतो..काय करणार शास्त्र असतं ते..😀आज माझंही असंच झालं..😂 आजच्या माझ्या एकादशीच्या उपवासासाठी मग उलुशी भगर म्हणजेच वरईचेतांदूळ आणि दाण्याची आमटी करुन *एकादशी दुप्पट खाशी * हा नियम अमलात आणलाच मी..😀 चला तर मग या झटपट होणार्या ,चटपटीत, पोटभरीच्या रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
सांजा..तिखट सांजा..तिखट शिरा (tikhat sanja recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्त्विक रेसिपीज... या आठवड्याची थीम आहे सात्त्विक रेसिपीज..सात्त्विक पदार्थ म्हणजे बिना कांदा ,लसूण पदार्थ आणि हे जास्त मसालेदार पण नसतात...आता श्रावण महिना सुरु आहे..या महिन्यात बर्याच ठिकाणी जेवणात कांदा लसूण वापरत नाहीत..कारणही तसंच असतं. श्रीविष्णू देवता चातुर्मासात योगनिद्रा घेतात..आणि पृथ्वीचे भरणपोषण करण्याची जबाबदारी भगवान शंकरांची असते..म्हणूनच या महिन्यात आपण खूप व्रतवैकल्ये, उपासतापास करतो..आणि भगवान शंकराचा आशिर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतो..या काळात आपली वृत्ती देखील सात्त्विक ठेवायचा प्रयत्न करतो..म्हणूनच वृत्तीला,विचारांना सात्विकपणा हा आहारातून येतो..कांदा,लसूण राजस,तामस मानले जातात..म्हणून ते निषिद्ध..तसंच शास्त्रीय कारण म्हणजे या काळात आपला अग्नी म्हणजेच पाचनक्रिया मंदावलेली असते..म्हणून थोडा नाजूक साजूकच आहार घ्यायचा असतो.भगवान शंकरांना बघा आपण दहीभाताचा नैवेद्य दाखवतो..म्हणूनच चित्ती ते वृत्ती..आहारातून विचार..विचारातून आचार घडत असतो...म्हणून हा सारा सात्त्विक पदार्थांचा भक्तिमय वातावरणासाठी पूरक असा खटाटोप.... तर अशा या श्रावणात breakfast ला बिना कांदा लसूण काय करायचे खायला ..,हा नेहमीच गृहिणींना पडलेला प्रश्र्न...पण माझ्याकडे आहे उपाय याचा..खास ब्राम्हणी पद्धतीचा सांजा किंवा तिखट शिरा..अत्यंत खमंग चवदार अशी रेसिपी...माझी मावशी हा सांजा खूप सुंदर,मऊसूत करायची..तिच्याकडूनच मी शिकले ही रेसिपी... *तिन्हीसांजा सखी मिळाल्या*...हं हं हं...मी आपलं गाणं म्हणत चालले हो किचनकडे..😂या ओळीतला हा सांजा आपला खायचा सांजा नाही बरं..😄😄चला तर माझ्याबरोबर आपल्या front वर...😊😊 Bhagyashree Lele -
तुलसी लेमन जिंजर टी/ हर्बल टी (herbal tea recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- हर्बल तुळशीच्या चहामध्ये व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे डोळयांची शक्ती टिकून राहते.तुळशीचा चहा प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.तुळशीमध्ये अँटी इंफ्लेमेंटरी हा गुण आहे त्यामुळे हा चहा सांधूदुखीला दूर ठेवतो. Deepti Padiyar -
फ्लाॅवर फ्राय...बिना कांदा लसूण (flower fry recipe in marathi)
#GA4. #Week24. कीवर्ड--Cauliflower फ्लाॅवर ...नावातच फुल असलेली ही फळभाजी.. .. full range of variety..किती प्रकारच्या रेसिपीज तयार होतात या फ्लाॅवर पासून..अगदी soups पासून ते flower crispies पर्यंत..घेशील किती दो कराने..या उक्तीप्रमाणे..करशील किती दो कराने या सगळ्या varieties..हो पण या फ्लाॅवरचं friend circle मात्र selected च.. 😊टोमॅटो,बटाटा,कांदा,वाटाणा,लसूण,मिरची,आलं, कोथिंबीर बस्स. ..यांच्या गोतावळ्यात तो छान रमतो..जर का ही सगळी टीम मिळून खेळत असली तर ताट रुपी ग्राउंड वरुन चवीचे असे काही चौकार,षटकार मारतात ही मंडळी..की ताटाभोवती च्या स्टेडियम मध्ये बसलेले प्रेक्षक एकदम खुश..😋🥳होऊन या टीमला भरभरुन दाद देतात..तुम्ही पण या टीमला support करत असाल ना..पण आज मात्र मी फ्लाॅवर,बटाटा, टोमॅटो याच खेळाडूंना खेळवलंय..बाकीच्यांना rest दिलीये..😜..कारण नैवेद्यरुपी मॅच असली की काळजीपूर्वक खेळाडू select करावे लागतात..सात्विकता हा criteria पाळावा लागतो म्हणून दुसरं काही नाही..😄.. चला तर मग फ्लाॅवर,बटाटा, टोमॅटो हे त्रिकुट मिळून ही inning कशी खेळतात ते तुम्हीच बघा..😜 Bhagyashree Lele -
कच्च्या केळ्याची भाजी (kacchya kelyachi bhaji recipe in marathi)
#KS4 #खान्देश_रेसिपीज #कच्च्या केळ्याची भाजी.. खान्देशात केळीचे भरपूर पीक येत असल्यामुळे केळी विविध प्रकारे आहारात वापरतात जेणेकरून केळी वाया न जाता त्यांचा पूरेपूर वापर व्हावा.अन्न हे पूर्णब्रह्म मानणारे आपण ...मग भाजीच्या स्वरुपात केळ्याचा उपयोग करुन आहारात समावेश करतो..कधी उपवासाची भाजी करतात तर कधी नेहमीची बिनउपवासाची चमचमीत भाजी केली जाते..तर अशी ही खाद्यसंस्कृतीतील विविधता आपलं खाद्यजीवन समृद्ध करतात..आणि त्या विविध चवी चाखून जो आनंद मिळतो..तेव्हां म्हणावेसे वाटते..खाण्यासाठी जन्म आपुला..😍😋केळीच्या बागा मामाच्यापिवळ्या घडांनी वाकायच्या.मामा आमचा प्रेमाचाघडावर घड धाडायचा.आक्का मोठी हौसेचीभरपूर केळी सोलायची.आत्या मोठ्या हाताचीतिनेच साखर लोटायची.आजी आमची मायेचीसायच साय ओतायची.ताई नीटस कामाचीजपून शिकरण ढवळायची.आई आग्रह करायचीपुरे पुरे तरि वाढायची.वाटिवर वाटी संपवायचीमामाला ढेकर पोचवायचीतर मग चमचमीत चटपटीत रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
मटकी रस्सा (करी)... (matki rassa recipe in marathi)
#cf Friday fest-- Curry..म्हणजेच रस्सा मला सांगा मटकीला मटकीच कां म्हणतात...कारण मटकी तर पनघट पर जानेवाल्या राधेची,गोपिकांची...पण ती मटकी इथे उसळ,रस्सावाली मटकी कशी..🤔🤔 यासारखे प्रश्न मला नेहमीच पडतात..श्रीखंडात कोणताही खंड नाही तरी ते श्रीखंड,गुलाब जाम मध्ये गुलाब नाही तरी तो गुलाबजाम,शिर्या मध्ये कुठल्याही शिरा नाहीत तरी तो शिराच,वरणगाव कां??,बांद्रा मध्ये बंदर नाहीत,करीरोड मध्ये करी कुठून आली ,कॉटनग्रीन ..Cotton तर white असतो,रे रोडमध्ये हा रे कुठचा,चिंचपोकळीत चिंच ???,पालघर🦎😱😱,बदलापूर..बदला👹😡...पण तिथे तर किती चांगले ,बदला न घेणारे लोक राहतात😍🤗🤗❤️,पसरट पातेल्याला *लंगडी* का म्हणतात..मानपाडा रोड..माना पाडल्या जात होत्या कां??🤔...असे आणि या प्रकारचे असंख्य शब्द *हे असेच का* म्हणजे त्या त्या गोष्टीला तीच नावे का, कशी ,कोणी दिली असतील,अपभ्रशांतून झाली असतील का..शब्द उच्चारायचा अवकाश की तीच प्रतिमा मेंदूत register होते..दुसरी का नाही..असंख्य कोळ्यांची जाळी मेंदू विणू लागतो..बघा आलं ना कोळ्याचं जाळं डोळ्यासमोर..😀..तर अशी काही मजेदार नाव पण त्यांचा त्या नावाशी काही संबंध नाही ..असं काही तुम्हांला ही पोस्ट वाचताना आठवत असेल तर जरुर कमेंट करा ...म्हणजे अजून गमती जमती कळतील आपल्या सर्वांना..चला तर मग घ्या लिहायला..मी जाते *मटकी रस्सा,करी* टायपायला..टाईप करायला हो..झाला नवीन शब्द😂😂😂 Bhagyashree Lele -
शेपूची भाजी (sepuchi bhaji recipe in marathi)
#gur#शेपूची_भाजी..😋😋 गणपती आगमनानंतर दोन दिवसांनी ज्येष्ठा गौरींचे आगमन होते..ज्येष्ठा गौरींचे वाजतगाजत आगमन झाल्यावर त्या स्थानापन्न झाल्यावर त्यांची पूजा करुन त्यांना शेपूची भाजी ,भाकरीचा नैवेद्य दाखवतात..या सिझनमध्ये मिळणार्या ताज्या शेपूची चव काही औरच असते..म्हणून या माहेरवाशिणीसाठी मुद्दाम ह्या खमंग खरपूस शेपूच्या भाजीचा नैवेद्य दाखवतात..चला तर मग माझ्या अत्यंत आवडीच्या या भाजीची रेसिपी पाहू या.. Bhagyashree Lele -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs #कुकपँडची_शाळा...#लेमन_राईस...सप्टेंबर महिन्यात येणारा शिक्षक दिन.. या शिक्षक दिनाप्रति कुकपॅडची शाळा अनोखी थीम .. मन नकळत भूतकाळात शिरले.. माझी शाळा, शिक्षक, मैत्रिणी यांच्या आठवणीत रमून गेले.. खरं तर आपल्याला आपली जन्म देणारी आई आणि शाळेत शिक्षकांच्या रूपात भेटलेली आई.. हो ती आईच असते आपली.. दिवसातले पाच ते सहा तास आपल्याला ती घडवत असते.. तर अशा 2-2 आयांचे प्रेम, माया,काळजी,त्यांचे संस्कार, त्यांची शिकवण आपल्या सर्वांना लाभते.. यामागे दोघांचेही एकच लक्ष असते की तिच्या मुलांना, विद्यार्थ्यांना सजग नागरिक , परिपूर्ण व्यक्ति म्हणून समाजात उभे करणे.. त्यासाठी त्या अहोरात्र मेहनत घेत असतात.. यामध्ये चांगल्या आहाराच्या सवयी हा मुख्य मुद्दा.. शाळेतल्या मधल्या सुट्टीत डब्यामध्ये पोळी भाजी हवीच हा नियम होता. माझ्या लहानपणी मधल्या सुट्टीचा डबा म्हणजेच पोळी भाजी असं समीकरण ठरलेलं होतं.. आम्हाला एकच मधली सुट्टी असायची.. त्यामुळे पोळी भाजी कंपल्सरी असायची.. त्यावेळेस बाहेरचं खाण्याचं इतकं फॅड नव्हतं.. शाळेजवळ एक बाई दर शनिवारी घरगुती बटाटेवडे करत असत.. क्वचित कधी तरी आम्ही खात असू..तेवढीच मजा..किती ग्रेट वाटायचं त्यादिवशी..😊.. नंतर आठवलं ते मुलांच्या शाळा ..त्यांचे खाऊचे डबे .त्यांच्या दोन मधल्या सुट्ट्या.. एक सुका खाऊ त्यामध्ये काही सटरफटर,फळे, तर मोठ्या सुट्टीसाठी डब्यामध्ये कधीतरी पोळी भाजी, पराठे फ्रंकी ,वेगवेगळे भात,पाव भाजी , पिझ्झा,असे पदार्थ दिमतीला असतं..दोन पिढ्यांमधला खाण्याच्या सवयींमधला फरक.🤷हम्म्..थीमच्या निमित्ताने लेमन राईस करताना आठवले की कधी भात उरला की मुलांना आवडतो म्हणून फोडणीचा भात लिंबू पिळून करायची..आणि एका डब्यासाठीचा प्रश्न त्या दिवसापुरता सोडवायची😀 Bhagyashree Lele -
-
लाल भोपळ्याची भाजी (laal bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लँनर #शनिवार की वर्ड-- भोपळा भाजी भोपळा म्हटला की माझ्यासमोर दुधीभोपळा ऐवजी नेहमी लाल भोपळाच येतो.. याला कारण की आपली लहानपणीची चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ची गोष्ट. या गोष्टीने मनात घर करून ठेवले आहे .गोष्टी मधली म्हातारी लेकीकडे जाऊन तूप रोटी खाऊन चांगली जाडजूड होऊन परत यायला निघते तिच मुळी लाल भोपळ्यात बसून.. तर अशा ह्या लाल भोपळ्याने म्हातारीचे वाघ आणि कोल्ह्यापासून रक्षण केले होते. आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारणे वजन कमी करणे ते डायबिटीस लो बीपी कॅन्सर यासारख्या असाध्य रोगांंपासून म्हणजेच या जंगली भयानक आजारांपासून लाल भोपळा आपले देखील रक्षण करतो. त्यामुळे लाल भोपळा आपण खाणे मस्टच. कोणी लाल भोपळ्याची भाजी करून खा आणि सांबार करा कोणी भरीत करा कोणी घारगे करा कोणी खीर करा पण काहीतरी करून लाल भोपळा पोटात जाऊद्या आणि मुलांना पण खायला द्या कारण मुलांना खाण्याच्या सवयी लहानपणापासूनच लावल्या पाहिजेत नाहीतर मोठेपणी ते खवय्यै कसे होणार .आपल्या खाद्यसंस्कृतीचा आनंद कसा लुटणार यासाठी लहान वयातच खाद्य संस्कार होणे महत्त्वाचे आहे. चवीनं खाणार त्याला देव देणार असं म्हटलेलं आहे ..म्हणून पु लं म्हणतात तसे खाण्यासाठी खाणारा तो खवैय्या कसला... कारण शेवटी खाण्यासाठी जन्म आपुला आणि या खाण्यावर शतदा प्रेम करावे अशाच एक एक खमंग पाककृती..चला तर आपण आज लाल भोपळ्याची मेथीदाणा घालून केलेली खमंग भाजी पाहूया आणि खाऊ या..😋 Bhagyashree Lele -
कच्च्या पपईची चटणी..फाफडा चटणी (kachya papaya chi chutney recipe in marathi)
#GA4 #Week23 की वर्ड--पपई सौराष्ट्र फरसाण मधून फाफडा , खमण ढोकळा,अमिरी खमण ,गाठिया घेतानाच दुकानदाराला सांगायचे की ,"भैय्या पपीते की चटणी मत भूलना,extra देना थोडी" असं म्हणत थोडी चटणी तिथेच चाखणे हे माझं करोनाच्या आधीचं शास्त्र..हे शास्त्र मी वर्षानुवर्ष माझे भाजीवाले,फळवाले,इतर दुकानात पण पाळते..🙈शास्त्र,नियम हे पाळण्यासाठीच असतात..तुम्हांला वाटेल काय ही हावरट खादाड बाई..पण असं अजिबात नाहीये बरं..उलट हे सगळे वर्षानुवर्षांपासून चालत आलेलं interaction आहे....या मागे दिदी,ताई,भाभी असं कौतुकवजा असलेलं नातं जोडलं गेलंय..अर्थात व्यवहार पण असतोच..या व्यक्तींना ज्यांचे तळहातावर पोट असते त्यांंना आपले आपुलकीचे दोन शब्द सुखावून सोडतात..त्याच बरोबर वजनाच्या मापात पाप करत नाहीत ही मंडळी .. उलट सढळ हात असतो यांचा..मी देखील किंमतीच्या बाबतीत घासाघीस करत बसत नाही..जीवो जीवस्य जीवनम..हाच निसर्गाचा नियम..एक जीव दुसर्या जीवावर जगतो..एकमेकां साह्य करु..यामुळेच समाजरचना टिकून आहे..सुरळीत आहे..प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून..Food Chain सारखंच..बरोबर ना😊..चला तर मग आता भूक लागली असेल ना वाचून ..पटकन रेसिपीकडे जाऊ या..खूप सोपी,खमंग आणि झटपट होणारी अशी आजची रेसिपी.. Bhagyashree Lele -
घोसाळ्याची भाजी (ghosalyachi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक3_चँलेंज#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज#घोसाळ्याची_भाजी.. पावसाळ्यात श्रावणात हमखास बाजारात दिसणारे भाज्यांपैकी घोसाळे ही वेलवर्गीय भाजी. बहुतेक करून घोसाळ्याची भजीच जास्त केली जाते.. पण मी घोसाळ्याची चणा डाळ किंवा मुगाची डाळ घालून भाजी देखील करते .अतिशय चविष्ट होते ही भाजी. आपल्या शरीरास अतिशय उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेली ही घोसाळ्याची भाजी कशी करायची ते आपण पाहूया Bhagyashree Lele -
दलिया लापशी..with IB पावडर. (daliya lapsi recipe in marathi)
#Immunity #दलिया लापशी गेले दीड वर्ष संपूर्ण जगात कोरोना ने थैमान घातलेले आहे..कोरोनापासून बचावाचे हरेक प्रयत्न प्रत्येक जण जसं जमेल तसं करत आहे..या कोरोना काळात मास्क,सोशल डिस्टन्सिंग बरोबरच आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवणे,वाढवणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.. त्याचबरोबर ज्यांना कोरोना होऊन गेलाय त्यांना अतिशय थकवा जाणवतो,अगदी गळून गेल्यासारखे होते..त्यांनाही ताकद भरुन येण्यासाठी काहीतरी पौष्टिक, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अन्नपदार्थ पोटात जाणे आवश्यकच आहे..शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ज्या घटकांमुळे वाढते ते सर्व पदार्थ आपल्या रोजच्या आहारात स्वयंपाकघरात उपलब्ध आहेत..या पदार्थांचा जाणीवपूर्वक आहारात उपयोग केला गेला आणि जोडीला हलका व्यायाम,प्राणायाम,कपालभाती सारखे योगप्रकार केले तर आपले कोरोनारुपी संकटापासून रक्षण होऊ शकते.. आज मी आहारात थोडा बदल म्हणून इम्युनिटी बुस्टिंग दलिया लापशी केलीये..इम्युनिटी बुस्टिंग रेसिपीज मधली एक नवी मुलायम चव..ही चव चाखून तर बघा..तुम्हा़ला नक्कीच आवडेल..त्याआधी इम्युनिटी बुस्टिंग पावडर तयार करुन ठेवलीये यात मी हळद नाही घातली..ती आयत्या वेळेस घाला..ही पावडर तुम्ही दूध,खिरी,लाडू,वड्या,इतकंच काय पण भाजी आमटीत ही घालू शकता.. Bhagyashree Lele -
चिक्कु मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#W16भरपूर आयर्नचा आणि साखरेचा स्त्रोत असलेले चिक्कु हे थंडीत मुबलक मिळणारे फळ...याचा समावेश अधूनमधून तरी आहारात हवाच.सर्वांच्या आवडीचा चिकूशेक नक्कीच करायला हवा.😊 Sushama Y. Kulkarni -
आवळा कूलर (awla cooler recipe in marathi)
#jdr की वर्ड-- आवळा. आवळा कूलर.. आवळा आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी जेवढा फायदेशीर आहे त्यापेक्षाही अधिक आवळा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. यात व्हिटामिन C ची मात्रा सर्वात अधिक असतात.Vit. बी 5, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध प्रमाणात आढळते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. (Amla is beneficial for boosting immunity)रोज आवळा खाल्ल्याने आपला चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो. त्यामध्ये उपस्थित अँटीऑक्सिडेंट त्वचेच्या वृद्धत्वाची समस्या कमी करतात. रस पिण्यामुळे सुरकुत्या आणि फाईन लाईन कमी होतात. हे शरीराला डिटॉक्स करण्याचे कार्य देखील करते. ज्या लोकांची हाडे कमकुवत आहेत, त्यांनी आवळा रस सेवन केला पाहिजे. हा रस आपली हाडे मजबूत करण्यासाठी कार्य करते.आवळा हे असे सुपर फूड आहे, जे अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामुळे पचनशक्ती देखील बळकट होते. चला तर मग जिंजर आवळा कूलर तयार करून आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जास्तीत जास्त वाढवू या.शरीराला थंडावा देऊ या म्हणजे या कोरोना च्या काळात आपले सर्व बाजूंनी रक्षण होईल. Bhagyashree Lele -
भरली तोंडली (bharli tondli recipe in marathi)
#pcr #प्रेशर_कुकर_रेसिपीज #भरली_तोंडली प्रेशर कुकर,प्रेशर पॅन ...आजच्या गृहिणींचा उजवा हातच म्हणाना... इंधन आणि वेळ वाचवून अन्न शिजवण्यासाठी तसंच घाईगर्दीच्या वेळेस वेळेत स्वयंपाक करण्यासाठी प्रेशर कुकर हे वरदानच आहे..असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही..जेव्हा आपण पातेले किंवा अन्य उघड्या भांड्यात अन्न शिजवतो, तेव्हा वाफ बाहेर जाऊन अन्न शिजण्यास वेळ लागतो. परंतु जर ते प्रेशर कुकरमध्ये शिजवले, तर वाफेच्या दाबामुळे अन्न लवकर शिजण्यास मदत होते.आणि ते ही काही मिनिटातच..दुसरं म्हणजे तो पदार्थ शिजताना सारखं बघायला लागत नाही..एकदाच सगळे मसाले ,पाणी घातलं की निश्चिंती..शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा..काही मिनिटांत पदार्थ तयार.. चला तर मग आज आपण प्रेशर कुकरमध्ये झटपट होणारी चविष्ट चवदार भरली तोंडली कशी करायची ते पाहूया.. Bhagyashree Lele -
कांदा कैरी आमटी (kanda kairi amti recipe in marathi)
#dr #दाल_रेसिपीज #कांदा_कैरी_आमटी... आमटी... ताटातील मानाचं पान..आमट्यांच प्रकार तरी किती..कांद्याची,कैरीची,कैरीकांदा,चिंचगुळाची,वेगवेगळ्या फळभाज्या घातलेल्या..यात बटाटा,लालभोपळा,दुधी,टोमॅटो, शेवगाशेंगा,असे कितीतरी प्रकार..तेवढेच मसाल्यांचे प्रकार..कधी ब्राह्मणी गोडा मसाला,कधी नुसते धणे जीरे पावडर,कधी सांबार मसाला,कधी नुकतेच शिकलेले येसर पावडर,तर कधी गरम मसाला,कधी आलं लसूण पेस्ट, मिसळ मसाला पावडर पण घालते मी कधीतरी,कांदा लसूण मसाला...करु तेवढे combinations कमी..पण प्रत्येक मसाल्याची चव अफलातून..आमटी उकळायला लागली की घरभर आमटीचा मिश्र वास असा काही दरवळतो की रसनेची सगळी रंध्रे एका फटक्यात खुली होतात..खरंच भारतीय खाद्यसंस्कृतीचे ,पर्यायाने आपल्या सर्व मागच्या पिढीतील लोकांचे आपल्यावर खूप उपकार आहेत..त्यांनी विविध पदार्थांची निर्मिती तर केलीच पण त्यांचे जतन,संवर्धन करुन आपल्याकडे या रेसिपीज सुपूर्द केल्यात...मनापासून धन्यवाद मागील पिढीतील सर्व सुगरणींना...😊🌹🙏 Bhagyashree Lele -
फराळी मिसळ (farali bhel recipe in marathi)
#fr #फराळी मिसळ उपवास म्हटले की साबुदाणा खिचडी,भगर,दाण्याची आमटी,थालिपीठे,बटाटा भाजी,राजगिरा पुरी,खिरी या ठराविक पदार्थांबरोबरच उपवासाच्या इडल्या, डोसे,ढोकळे,कटलेट,पँटीस,मिसळ,बटाटेवडा,आप्पे,यासारखे फँन्सी फदार्थ करून आपल्या जिभेची चंगळ करतो..तरी पण ती जीभली सारखी म्हणतेच ..उपास मज लागला...😂😂आचार्य श्री.प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेल्या " भ्रमाचा भोपळा " या नाटकात एक विडंबन कविता आहे .👇सखे बाई उपास मज लागलाकांहींच नसे खायलाकेळी नि खजूर आणिलाकेशरी दूध प्यायला !सखे बाई उपास मज लागला ll १ llखारका मोजक्या दहाउकडले बटाटे सहाखीस नुसता केला पहा !सखे बाई उपास मज लागला ll२llवाडगा भरुन लापशीघेतली पहा गोडशीवर खिचडी चापुन तशीसखे बाई उपास मज लागला ll३llहा उपास मज भोवलाघाबरा जीव जाहलादही भात म्हणुनी चापलासखे बाई उपास मज लागला ll४ll म्हणूनच तर अभिमानाने म्हणतात..एकादशी आणि दुप्पट खाशी..😀उपवास असेल तर कमी खाऊन शरीर detox करायला मदत करायची,digestive system ला आराम द्यायचा..या सगळ्या अंधश्रद्धा ,अफवा आहेत..😀 त्यामुळे मग मी पण अफवांवर विश्वास न ठेवता मस्त चमचमीत फराळी मिसळ केलीये🤣..चला तर मग.. या फराळी मिसळ मध्ये मी साबुदाणा खिचडी घातली नाही. डायबिटीस साठी शक्यतो साबुदाणा avoid करावा.. Bhagyashree Lele
टिप्पण्या (2)