पालक मुग डाळ भाजी (palak moong daal bhaji recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#GA4
#week2
#spinach
#भाजी

गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये spinach हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पालक भाजी भारतात सगळीकडे उगवली जाते व खाल्ली जाते प्रत्येक प्रांतात पालक ही भाजी आवडीने खाल्ली जाते.
पालक चे आरोग्यावर बरेच फायदे आहे मोठ्यांना पालकचे फायदे माहीतच आहे पण लहान मुले पालक खात नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आहारातून पालक तयार करून द्यावी लागते
पालक ला एक गुणकारी भाजी मानली जाते म्हणून सर्व जण सांगतात हिरव्या पालेभाज्या खा म्हणजे त्याच्यापासून आपल्याला बऱ्याच रोगान पासून आपण लांब राहू शकतो. पालकांमध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, लोह ,क्लोरीन आणि जीवनसत्व ए ,बी, सी आणि भरपूर प्रमाणात आहे या गुणांमुळे पालकाला लाईव्ह प्रॉडक्टिव भाजी मानले जाते पालकात भरपूर आयोडीन असल्यामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूवर त्याचा भरपूर फायदा होतो
बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रोगावर पालक वेगळ्या पद्धतीने घेतात पालकाचा रस बऱ्याच आजारांवर गुणकारी आहे रक्ताची कमी असणारे लोक रोज पालकाचे रस आहारातून घेतात, हृदय रोग, दातांच्या समस्या, डोळ्यांच्या समस्या ,बीपी ,थायराइड , कावीळ असं बरेच आजार पालकच्या सेवनाने बरे होतात म्हणून पालकाचा रोजच्या आहारात समावेश करायचा.
मी पालक बनवताना नेहमी त्यात बटाटा कोणत्याही प्रकारची डाळ असे टाकूनच पालक बनवते ज्याने थोडी भर रही मिळते प्रोटीन ही मिळते
बघूया पालक मुग डाळ भाजी रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीट
3 व्यक्ती
  1. 1जुड़ी पालक
  2. 1/2 कपमुग डाळ भिजवलेली
  3. 2कट केलेल्या हिरव्या मिरच्या
  4. 2त्यापासून तेल भाजी फोडणीसाठी
  5. 1 टेबलस्पूनमोहरी जीरे
  6. 1 टेबलस्पूनमिरची पावडर
  7. 1/2 टेबलस्पूनहळदी पावडर
  8. 1 टेबलस्पूनधना पावडर
  9. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

20 मिनीट
  1. 1

    पालकाची पाने निवडून पाण्यातून धुन स्वच्छ करून घेऊ
    मूग डाळ पंधरा-वीस मिनिटे भिजवून घेउ, बाकीची सर्व तयारी करून घेऊ

  2. 2

    आता भाजी फोडणीची तयारी करून घेऊ
    कढईत तेल टाकून तेल तापल्यावर मोहरी,जीरे हिरव्या मिरच्या,दिल्याप्रमाणे मसाले,मीठ टाकून भिजलेली मुंग डाळ फोडणीत टाकून मिक्स करून घेऊ

  3. 3

    थोडे पाणी टाकून डाळ अर्धवट शिजवून घेऊ
    मग पालकाची बारीक केलेली पाने मूग डाळ वर टाकून मिक्स करून घेऊ

  4. 4

    भाजी शिजवून घेऊ भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करू

  5. 5

    तयार भाजी पोळी बरोबर सर्व करू

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes