* हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#sp #रविवार #रशियन सलाड साठी मी हे * हेल्दी रशियन सलाड * बनवले आहे. बऱ्याच व्हेजी व फ्रूटचा समावेश ह्या सलाड पद्धतीत असल्याने टेस्टी लागते. तसे हेवी पण आहे.

* हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi)

#sp #रविवार #रशियन सलाड साठी मी हे * हेल्दी रशियन सलाड * बनवले आहे. बऱ्याच व्हेजी व फ्रूटचा समावेश ह्या सलाड पद्धतीत असल्याने टेस्टी लागते. तसे हेवी पण आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

13-15 मिनिटं
2-3 सर्व्हिन्ग
  1. 2 टेबलस्पूनकेळी काप
  2. 2 टेबलस्पूनटरबूज काप
  3. 2 टेबलस्पूनडाळिंब दाणे
  4. 2 टेबलस्पूनअननस काप
  5. 2 टीस्पूनमटार दाणे
  6. 2 टीस्पूनसिमला मिरची काप
  7. 2 टीस्पूनकॉर्न दाणे
  8. 4 टीस्पूनबटाटा काप
  9. 1/8 टीस्पूनमिरे पुड
  10. 1 टीस्पूनमिरची काप
  11. 2 टीस्पूनसाखर
  12. 4 टेबलस्पूनमियोनीज एगलेस
  13. 3 टेबलस्पूनदही
  14. चवीनुसारमीठ
  15. 2 टीस्पूनपुदिना
  16. भाज्या ब्लँच करायला पाणी आवश्यकते नुसार

कुकिंग सूचना

13-15 मिनिटं
  1. 1

    फळे बारीक चिरून घ्या. भाज्या कापून घ्या. कॉर्न व मटार दाणे मऊ होतील इतपत शिजवून घ्या.

  2. 2

    सिमला व बटाटे पण पाण्यात कच्चपणा जाईल इतपत शिजवून घ्या. मग सगळे एका ठिकाणी साहित्य ठेवून तयारी करावी मिरची पुदिना कापून घ्या.

  3. 3

    एका मोठ्या बाउल मध्ये प्रथम सगळी फळे घाला. मग भाज्या घाला.

  4. 4

    आता दुसऱ्या एका भांड्यात मियोनीज, मिरची पुदिना, साखर, मीठ घालून घ्या.

  5. 5

    दही, मिरेपूड घालून सर्व सॉस एकजीव करा.

  6. 6

    हा सॉस वा ड्रेसिंग सर्व भाज्या, फळावर घालावे छान मिक्स करावे.

  7. 7

    तयार * हेल्दी रशियन सलाड *एका बाउलमध्ये सर्व्ह करा. फारच सुंदर लागते ते. जरूर बनवा. घरचे लहान मोठे सर्व एन्जॉय करतात. माझेकडे लगेच सम्पले. फारच आवडले सगळ्यांना.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

Similar Recipes