कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#cooksnap
#Varsha Ingole Bele
#कोबीची भाजी
मी आज वर्षा बेले ताईंची कोबीची भाजी चणा डाळ घालून ही रेसिपी cooksnap केली आहे.
नेहमी आपल्या चवीची भाजी खातच असतो. थोडा बदल हवा म्हणून ही वेगळी मस्त टेस्टी भाजी केलीखूपच छान चविष्ट भाजी झाली होती. घरी सगळ्यांना आवडली. खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏

कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)

#cooksnap
#Varsha Ingole Bele
#कोबीची भाजी
मी आज वर्षा बेले ताईंची कोबीची भाजी चणा डाळ घालून ही रेसिपी cooksnap केली आहे.
नेहमी आपल्या चवीची भाजी खातच असतो. थोडा बदल हवा म्हणून ही वेगळी मस्त टेस्टी भाजी केलीखूपच छान चविष्ट भाजी झाली होती. घरी सगळ्यांना आवडली. खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 300 ग्रामकोबी
  2. 3 टेबलस्पूनचणा डाळ
  3. 4-5हिरवी मिरची
  4. 2 टीस्पूनलाल तिखट
  5. 5-6कढीपत्ता पाने
  6. चवीनुसारमीठ
  7. चवीनुसारसाखर
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. 1 टीस्पूनमोहरी
  10. 1/2 टीस्पूनजीरे
  11. 1/2 टीस्पूनहिंग
  12. 1 टीस्पूनहळद
  13. 1टोमॅटो
  14. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  15. कोथिंबीर

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    प्रथम कोबी बारीक चिरून घेणे.5 मिनिटे पाण्यामध्ये स्वच्छ धून घेणे. त्याचा उग्र वास ही जातो.नंतर टोमॅटो, कांदा बारीक चिरून घेणे.1 तास चणा डाळ भिजून घेणे.

  2. 2

    आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये तेल घालावे. तेल तापले कि मोहरी, जीरे, हिंग, मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालून फोडणी करून घेणे. आता त्या मध्ये कांदा 2 मिनिटे परतून त्यात आले लसूण पेस्ट घालावी. आता त्या मध्ये टोमॅटो 2 मिनिटे परतून घेणे. नंतर त्यात भिजवून घेतलेली डाळ 2-3 मिनिटे परतून घेणे.

  3. 3

    आता या मध्ये चवीनुसार लाल तिखट घालून घेणे. आता या मध्ये बारीक चिरलेला कोबी घालून छान परतून घेणे. व वरून चवीनुसार मीठ साखर घालावी. झाकण ठेवून 5 मिनिट वाफ आणावी. भाजी मधून झाकण काढून हलवावी. आता पुन्हा 2 मिनिटे झाकण ठेवून वाफ आणावी.

  4. 4

    आता वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. मस्त टेस्टी कोबीची भाजी तयार झाली. गरम गरम पोळी किंवा फुलके सोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes