भोगीची भाजी (boghichi bhaji recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#मकर
# cooksnap
# वंदना शेलार ताई
काल वंदना ताई नी भोगी स्पेसिएल हा लाईव्ह विडिओ दाखवला. त्या मध्ये भोगीची भाजी दाखवली होती. खूप छान पद्धतीने ती भाजी करून दाखवली. आज मी त्यांनी केलेली भोगीची भाजी केली आहे. मी त्यात थोडा बदल करून केली आहे.
खूप छान भाजी झाली होती.
खूप खूप धन्यवाद वंदना ताई 🙂🙏

भोगीची भाजी (boghichi bhaji recipe in marathi)

#मकर
# cooksnap
# वंदना शेलार ताई
काल वंदना ताई नी भोगी स्पेसिएल हा लाईव्ह विडिओ दाखवला. त्या मध्ये भोगीची भाजी दाखवली होती. खूप छान पद्धतीने ती भाजी करून दाखवली. आज मी त्यांनी केलेली भोगीची भाजी केली आहे. मी त्यात थोडा बदल करून केली आहे.
खूप छान भाजी झाली होती.
खूप खूप धन्यवाद वंदना ताई 🙂🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपपापडी
  2. 1/2 कपमटार
  3. 2वांगी
  4. 1/4 कपपावटा
  5. 1/4 कपगाजर
  6. 1/4 कपहरभरा
  7. 1/4 कपशेंगदाणे
  8. 2 टेबलस्पूनगोडा मसाला / काळा मसाला
  9. 1 टेबलस्पूनलाल तिखट(चवीनुसार घेणे)
  10. 1 टीस्पूनकाश्मिरी तिखट
  11. 1 टीस्पूनधने पूड
  12. 1 टीस्पूनजीरे पूड
  13. 1 टीस्पूनगरम मसाला
  14. 1/4 कप खिसलेले खोबरे
  15. 1/4 कपभाजलेले शेंगदाणे
  16. 1/4 कपतीळ
  17. 1 टीस्पूनमोहरी
  18. 1 टीस्पूनजीरे
  19. 1 टीस्पूनहळद
  20. 1/2 टीस्पूनहिंग
  21. 7-8कढीपत्ता पाने
  22. कोथिंबीर
  23. 1 टीस्पूनगूळ
  24. आवश्यकतेनुसार पाणी
  25. चवीनुसारमीठ
  26. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम आपल्या आवाडीनुसार सगळ्या भाज्या स्वच्छ धून चिरून घेणे. एका प्लेट मध्ये काढून घेणे. नंतर गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये एक एक करून शेंगदाणे, खोबरे आणि तीळ भाजून घेणे.

  2. 2

    नंतर या भाजलेले घटक मिक्सर मधून त्याची बारीक पेस्ट करून घेणे. नंतर गॅस वर कढई ठेवून त्यात तेल घालावे. तेल गरम झाले कि त्यात मोहरी, जीरे, हिंग आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी करून घेणे.नंतर त्यात पावटा, मटार दाणे, हरभरा दाणे हे घालून 2-3 मिनिटे झाकण ठेवून वाफवून घेणे.

  3. 3

    आता त्या मध्ये केलेले वाटण घालावे. छान परतून घेणे. व लगेचच त्यात हळद आणि सगळे मसाले आपल्या चवीनुसार घालावेत. व सगळे 2-3 मिनिटे छान तो मसाला त्यात परतून घेणे.थोडे पाणी ही घालावे. म्हणजे मसाला कढई मध्ये चिकटणार नाही.

  4. 4

    आता त्या मध्ये पापडी, वांगी, गाजर आणि शेंगदाणे घालून त्या मसल्या मध्ये सगळ्या भाज्या एकत्र करून छान 3-4 मिनिट परतून घेणे. तो मसाला सगळ्या भाज्या मध्ये मिळून येतो. भाजीला चव ही छान येते.

  5. 5

    आता या मध्ये आपल्याला भाजी किती पातळ आणि घट्ट हवी आहे. त्या नुसार त्या मध्ये पाणी घालावे. व चवीनुसार मीठ घालावे. आवडत असल्यास गूळ घालणे.छान झाकण ठेवून 10 मिनिटे भाजी शिजवून घेणे. भाजी शिजली कि वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. मस्त अशी भोगीची भाजी तयार झाली.

  6. 6

    गरम गरम बाजरीची भाकरी तीळ लावून, सोबत लोण्याचा गोळा,मुगाची खिचडी या सोबत भोगीची भाजी सर्व्ह करावी. खूप छान लागते.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

टिप्पण्या (3)

Similar Recipes