तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#cooksnap
#वर्षा देशपांडे
#तोंडली मसाले भात
मी वर्षा देशपांडे ताईंची ही रेसिपी cooksnap केली आहे. ताई खूप छान चविष्ट असा मसालेभात झाला होता. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

20 -25 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबासमती तांदूळ
  2. 150 ग्रामतोंडली
  3. 1गाजर
  4. 1 टेबलस्पूनगोडा मसाला
  5. 2 टीस्पूनलाल तिखट (आवाडीप्रमाणे कमी जास्त करणे)
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 1 टीस्पूनजीरे पूड
  8. 1 टीस्पूनधने पूड
  9. 1 टीस्पूनमोहरी
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1/2 टीस्पूनहिंग
  12. 1/2 टीस्पूनजीरे
  13. 1.5 टेबलस्पूनतेल
  14. 5-6काजू
  15. आवश्यकतेनुसार पाणी
  16. कोथिंबीर

कुकिंग सूचना

20 -25 मिनिट
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धून घेणे.10 मिनिट ठेवून देणे. तोंडली, गाजर उभे चिरून घेणे.

  2. 2

    आता गॅस वर छोटा कुकर ठेवून त्या मध्ये तेल घालावे. तेल गरम झाले कि मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता, तमालपत्र याची फोडणी करून घेणे. आता त्या मध्ये तोंडली, गाजर आणि हळद घालून 3-4 मिनिटे परतून घेणे.

  3. 3

    आता या मध्ये भिजवलेले तांदूळ घालून 2 मिनिटे परतून घेणे. आता या मध्ये आवडीनुसार सगळे मसाले, काजू घालून छान परतावे. आता या मध्ये जेवढा तांदूळ आहे त्याच्या साधारण दुप्पट गरम पाणी घालावे. व वरून चवीनुसार मीठ, साखर घालावी. कुकर चे झाकण लावून मध्यम आचेवर 1 शिट्टी काढून घेणे. गॅस बंद करावा.

  4. 4

    मस्त गरमा गरम तोंडली मसाले भात तयार झाला. वरून थोडे साजूक तूप आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

  5. 5

    तयार आहे तोंडली मसाले भात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes