नागपुर स्पेशल तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

नागपुर स्पेशल तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. तर्री बनविण्यासाठी
  2. 1.5 वाटीभिजवलेला हरभरा
  3. 2कांदे
  4. 2टोमॅटो
  5. 2 टेबलस्पूनआल लसूण खोबरे पेस्ट
  6. 2 टीस्पूनगरम मसाला
  7. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 2 टीस्पूनगोडा मसाला
  9. 1 टीस्पूनधने पावडर
  10. 3 टेबलस्पूनतेल
  11. 1.5 टीस्पूनमोहरी
  12. 1.5 टीस्पूनजीरे
  13. चवीनुसारमीठ
  14. गरजेनुसार पाणी
  15. पोहे बनवण्यासाठी
  16. 2 वाटीपोहे
  17. 1कांदा
  18. 1बटाटा
  19. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  20. 3हिरव्या मिरच्या
  21. 2 टेबलस्पूनतेल
  22. 1 टीस्पूनजीरे
  23. 1 टीस्पूनमोहरी
  24. 5-6कडीपत्ता पाने
  25. 1.5 टीस्पूनहळद
  26. 1 टीस्पूनहिंग
  27. 1टिस्पून साखर
  28. चवीनुसारमीठ
  29. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  30. 1/2 वाटीशेव
  31. 1कट केलेला लिंबू

कुकिंग सूचना

40 मि
  1. 1

    तर्री बनवण्यासाठी प्रथम हरभरे सात तास भिजत घातले आणि नंतर कुकर मध्ये शिजवून घेतले कांदा टोमॅटो कट करून घेणे

  2. 2

    आता पॅनमध्ये तेल ऍड करून मध्यम आचेवर गरम करा त्यामध्ये जीरे मोहरी ची फोडणी तयार करून घ्या या मध्ये कांदा ऍड करून दोन मिनिटं परतून घेणे.

  3. 3

    कांदा परतल्यानंतर त्यामध्ये हळद,लाल तिखट,गरम मसाला, गोडा मसाला, आले लसूण खोबरे पेस्ट ऍड करा छान मिक्स करून घ्या. आता यामध्ये कट केलेला टोमॅटो ॲड करा आणि पाच मिनिटे तेल सुटेपर्यंत टोमॅटो परतून घेणे.

  4. 4

    आता यांमध्ये शिजविलेला हरभरा, चवीनुसार मीठ आणि पाणी ऍड करा आणि छान आठ मिनिटे उकळी येऊ द्यात. मस्त अशी झणझणीत तर्री तयार होते.

  5. 5

    आता पोहे बनवण्यासाठी कांदा, बटाटा, मिरच्या कट करू घेऊन पोहे स्वच्छ धुऊन पाच मिनिटे भिजवून घेणे.

  6. 6

    आता पॅन मध्ये तेल ऍड करून मध्यम आचेवर गरम करा या तेला मध्ये प्रथम शेंगदाणे तळून घेऊन बाजूला काढा. आणि त्याचा तेला मध्ये जीरे, मोहरी, मिरची कडीपत्त्याची फोडणी तयार करून घ्या. आता यामध्ये कांदा, हळद आणि हिंग ऍड करून कांदा दोन मिनिटं परतून.

  7. 7

    कांदा परतल्यानंतर यांमध्ये बटाटा ॲड करा करून बटाटा पाच मिनिट शिजवून घ्या. बटाटा शिजल्यावर ह्यामध्ये भिजवलेले पोहे, चवीनुसार मीठ,साखर आणि शेंगदाणे ॲड करा.

  8. 8

    आता पोहे छान मिक्स करून घ्या दहा मिनिटे झाकण ठेवून मस्त बारीक गॅसवर वाफवून घ्या वरून कोथिंबीर घाला आपले पोहे तयार

  9. 9

    आता आपले तर्री आणि पोहे दोन्ही तयार आहे. आता सर्व्ह करताना एका प्लेट मध्ये पोहे घ्या आणि त्यावर ती तयार केलेली तर्री लागेल तशी ॲड करा.त्यावर ती कट केलेला कांदा शेव कोथिंबीर लिंबू घालून आपले तर्री पोहे सर्व्ह करा

  10. 10

    नागपुर स्पेशल तर्री पोहे तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes