तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

#KS8 महाराष्ट्राचे स्त्रीट फुड
महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रोडवरती छोटे छोटे स्टॉल दिसतात यामध्ये स्पेशली वडापाव ,भजी पाव ,मिसळ पाव , आणि तर्री पोहे हे आइटम पाहायला मिळतील तर मी आज तुम्हाला तर्री पोहे रेसिपी दाखवणार आहे तर नक्की करुन पहा चमचमीत असे तर्री पोहे

तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)

#KS8 महाराष्ट्राचे स्त्रीट फुड
महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रोडवरती छोटे छोटे स्टॉल दिसतात यामध्ये स्पेशली वडापाव ,भजी पाव ,मिसळ पाव , आणि तर्री पोहे हे आइटम पाहायला मिळतील तर मी आज तुम्हाला तर्री पोहे रेसिपी दाखवणार आहे तर नक्की करुन पहा चमचमीत असे तर्री पोहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
४ लोकांसाठी
  1. पोहे पाच मुठी
  2. 1 वाटीहरभरे
  3. 2मोठे कांदे
  4. 1टोमॅटो
  5. 4हिरव्या मिरच्या
  6. कोथिंबीर
  7. हिंग
  8. फोडणीसाठी
  9. जीरे
  10. मोहरी
  11. कढीपत्ता
  12. आलं-लसूण पेस्ट
  13. 1 चमचाबेसन
  14. 2 चमचाकाळा मसाला
  15. 1 चमचालाल तिखट
  16. मूठ शेंगदाणे

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    पहिल्या दिवशी रात्री हरबरे पाण्यात भिजत ठेवून कुकरला एक शिट्टी काढून घ्यावी एक कांदा आलं लसूण हिरवी मिरची टोमॅटो मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी. कढई तापत ठेवावी ते तीन चमचे तेल घालावे त्यामध्ये हिंग टाकावा जीरे मोहरी हिंग कढीपत्त्याची फोडणी करावी आणि वाटलेले मिश्रण या तेलात चांगले परतून घ्यावे

  2. 2

    कांदा टोमॅटोचा मिश्रण चांगले परतल्यावर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट, काळा मसाला धने जीरे पावडर गरम मसाला लाल तिखट हे सर्व घालून परतून घ्या यामध्ये एक चमचा बेसन घालून परता आणि यामध्ये एक कप गरम पाणी घाला शिजवून घेतलेले हरभरे यामध्ये घालून परतून या यामध्ये तर्री साठी गरम पाणी ओता साधारण एक ते दीड ग्लास पाणी ओता

  3. 3

    आता दहा ते पंधरा मिनिटे हे मिश्रण बारीक गॅस वरती उकळू द्या तोपर्यंत आपण पोहे बनवून घेऊ बारीक गॅसवर उकळल्यावर याला मस्त तर्री येते.

  4. 4

    तोपर्यंत पोहे भिजवून घ्यावे कांदा मिरची कापून घ्या दुसऱ्या कढईमध्ये तेल तापत ठेवा जीरे मोहरी कढीपत्ता हिंग यांची फोडणी करा आता शेंगदाणे टाका मग मिरची कांदा टाकून कांदा चांगला परता, हळद टाका कांदा भाजल्यावर भिजवलेले पोहे टाका चवीप्रमाणे मीठ आणि साखर टाका वरून लिंबू पिळा कोथिंबीर घाला एक झाकण ठेवून एक वाफ काढावी

  5. 5

    आता एका प्लेटमध्ये पोहे त्यावर कांदा घ्या शेव घाला मिक्स फरसान घाला वाटीमध्ये हरभऱ्याची तर्री द्या

  6. 6

    नागपूरचे तर्री पोहे आता महाराष्ट्राचे स्ट्रीट फूड म्हणून फेमस आहे तर नक्की करुन पहा तर्री पोहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

Similar Recipes