पारंपारिक पद्धतीने गुळंबा (gulamba recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

" पारंपारिक पद्धतीने गुळंबा"

सध्या कैरी,आंबे सिजन चालू आहे, मस्त हिरव्या गार कैऱ्या आहेत बाजारात.मग माझ्या आवडीचा गुळांबा झालाच पाहिजे.साखर घालून ही करतात पण गुळ घालून च छान होतो..यात कोणी लाल तिखट, लवंग घालतात पण मला या पद्धतीने बनवलेलाच मस्त आंबटगोड आवडतो आणि बरेच दिवस टिकतो.. चला तर मग रेसिपी बघुया.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

पंचवीस मिनिटे
  1. 3कच्च्या कैऱ्या
  2. 1 कपबारीक केलेला गुळ
  3. 1 टीस्पूनवेलचीपूड
  4. चिमुटभरमीठ
  5. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिटे
  1. 1

    कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून,साल काढून घ्या.किसनीने किसून घ्या..गुळ बारीक चिरून घ्या.

  2. 2

    कढईत तुप घालून किसलेली कैरी घाला व पाच मिनिटे परतून घ्या.गुळ घाला आणि मिक्स करा.

  3. 3

    गुळाला पाणी सुटेल, बारीक गॅसवर मस्त वीस मिनिटे शिजू द्यावे किंवा गुळाचे पाणी अटेपर्यंत शिजू द्या.मीठ आणि वेलचीपूड घालून मिक्स करा.घट्ट होईपर्यंत शिजवावे आणि गॅस बंद करा.

  4. 4

    झाला तयार आपला गुळंबा.. चपाती, भाकरी सोबत सर्व्ह करा.खुप छान लागतो.

  5. 5

    पॅकबंद डब्यात किंवा बरणीमध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवला तर भरपूर दिवस टिकतो मी सहा महिने पर्यंत वापरला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
अगदी सोपी रेसिपी...करुन बघते👍🏻

यांनी लिहिलेले

लता धानापुने
रोजी

Similar Recipes