सावजी मटण ग्रेव्ही (saoji mutton gravy recipe in marathi)

सावजी मटण ग्रेव्ही (saoji mutton gravy recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कांदा लांब पातळ चिरून घ्यायचे, तव्यावर टाकून चांगले परतून घ्यायचे कांदा लालसर होत पर्यंत भाजून घ्यायचा नंतर
कांद्यावर खाकस टाकून दोन मिनिटे परतून घ्यायचे मग मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचे. - 2
नंतर तव्यावर दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची, जायपत्रि आणि मिरे घालून भाजून घ्यायचे आहे नंतर धने, लाल सूखी मिरची टाकून भाजून घ्यायचे आहे.
- 3
नंतर जीरे व राई घालून भाजून घ्यायचे आहे शेवटी जार मध्ये पालक व मूठभर कोथिंबीर टाकून थोड पाणी टाकून पूर्ण पेस्ट बारीक करून घ्यायचे
- 4
मसाला पूर्ण बारीक झाल्यावर पातेल्यात तेल घालून मसाला टाकून छान परतून घ्यायचे नंतर त्यातआलं लसून पेस्ट घालावा व परतून घ्यायचे कांदा लालसर मसाला 10,15 मिनिटे छान परतून शिजवून घ्यायचे आहे
- 5
मसाला पूर्ण शिजल्यावर (मसाल्यातून तेल Separate झाल की मसाला शिजला समजायचं आहे)
- 6
शिजलेल्या मसाल्यात तिखट मीठ आणि हळद दिलेनूसार घालायचे आणि 2 मिनट परतून घ्यायचे
- 7
नंतर तिखट वगैरे शिजल्यावर त्यात मटण घालून चांगले फिरवून घ्यायचे नंतर ताट झाकून 20,25 मिनिटे मिडीयम गॅसवर शिजू द्यायचे
- 8
मग 25 मिनीट नंतर मटण भाजी अर्धी शिजत आल्यावर त्यात 4 ग्लास पाणी टाकून 15 मिनीट पून्हा झाकून शिजू द्यायचे
- 9
15 मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायची गरमागरम सावजी मटण ग्रेव्ही तयार...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
नाॅनवेजमी मुळची नागपूर ची आणि नागपूर ची ओळख म्हणजे सावजी मटण आणि मी तर मुळात सावजीच मग काय आज सावजी मटण बनवुन आपल्या मैत्रिणींसोबत शेअर कराव वाटल . मैत्रीणींन्हो आवडल असेल तर नक्की सांगा Sneha Barapatre -
-
-
झणझणीत मटण.. (zhanzhanit mutton recipe in marathi)
#लंच#मटणआज काल नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. नॉनव्हेज खाणार्यांची पहिली पसंत मटण ...मटण खूप वेगवेगळ्या प्रकारे बनविले जाते. प्रत्येकाची बनविण्याची पद्धत वेगळी असली तरी, मटणाला स्वतः ची विशिष्ट प्रकारची चव असल्याने, ते कसेही बनविले तर चांगलेच लागते. आता मटणाची चव मला माहित नाही. कारण मी नॉनव्हेज खात नाही. पण एकंदरीतच घरातील लोकांनी दिलेली प्रतिक्रिया...पण बाहेर मैत्रिणीसोबत केलेल्या चर्चेत मला ते जाणवले...💃 💕 Vasudha Gudhe -
-
सावजी मटण खिमा बॉल्स (saoji mutton kheema balls recipe in marathi)
#wd Happy women's day to all my dear friends 🎉😘🥰आज मी तुमच्या बरोबर सावजी स्पेशल मटण खिमा बॉल्स ची रेसिपी शेअर करतेय. आमच्या सावजी समाजामध्ये नॉनव्हेज साठी ही पारंपारिक रेसिपी आहे.ही रेसिपी मी माझ्या आईला डेडीकेट करते. ती रेसिपी खूप छान बनवते . आपण सर्वजण कितीही छान रेसिपी बनवत असेल तरी आपल्या आईच्या हाताची चव खूप स्पेशल असते. आज वूमन्स डे च्या निमित्ताने आमच्या सावजी स्पेशल मटण खिमा ची रेसिपी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न 🙏Dipali Kathare
-
हैद्राबादी मटण दम बिर्याणी.(hyderabadi mutton dum biryani recipe in marathi)
#बिर्याणीबिर्याणी ही शाही रुबाब असलेली रेसिपी आहे. जेवढी शाही तेवढीच किचकट आणि तेवढीच लज्जतदार अशी ही रेसिपी...बिर्याणी मध्ये मॅरीनेशन ही प्रक्रिया खूप महत्त्वाची.. आणि जेव्हा आपण मॅरीनेशन करण्यासाठी दही वापरतो,, तेव्हा चिकन 🐥.. मटण किंवा बाकीच्या ही पदार्थात तेव्हा तो पदार्थ सॉफ्ट तर होतोच पण तेवढीच टॅंगी आणि क्रीमी टेक्शचर पदार्थाला येते....... हैद्राबादी बिर्यानी करताना त्यामध्ये गुलाब किंवा केवडा पाणी चा फ्लेवर नसतो. म्हणजे त्याचा वापर केला जात नाही. टोमॅटो सुध्दा वापरत नाही. केरळ साईडला बिर्याणी मध्ये टमाटर वापरतात..... हैद्राबादी दम बिर्याणी मध्ये केशरचा वापर जास्त असतो. म्हणजे तिथल्या बिर्याणीचा तो स्टार आहे... असे म्हटले तर वावगे ठरू नये...... ही झाली माहिती हैद्राबादी बिर्याणी बदल... आता थोडसे माझ्या बदल..मी व्हेजिटेरीयन असल्याने माझ्या कडे नाॅनव्हेज फारच कमी केले जाते.. मुलीपण खात नाही.. लहान मुलगी बाहेरून आणलेली बिर्याणी कधीतरी खाते आवडली तर...माझ्या लग्नाला 25 वर्ष झालीत... पण अजून पर्यंत मी नाॅनव्हेज बिर्याणी कधीच केली नाही... नवरोबांना नेहमीच तक्रार असायची... मी ती तक्रार आज cookpad ने दिलेल्या थीम मुळे,, तसेच माझ्या नवरोबानी देखील चॅलेंज केल्याने.. मी पर्ण करु शकले... त्याबद्दल Cookpad टीम चे खूप खूप धन्यवाद.. 🙏🏻🙏🏻..तसेच नवरोबांचे देखील आभार.. कि त्याचा मदतीने मी इतकी छान बिर्याणी बनवु शकले.. मी केलेला माझा पहिलाच प्रयत्न 100% यशस्वी झाला... बिर्याणी खूप छान झाली.. . एक एक दाणा अलग.. आणि प्रत्येक मसाल्याचा फ्लेवर अगदी परफेक्ट... असे छान कमेंट आमच्या. अहोनकडून.. मिळाल्या... 🙈यांचा जास्त आंनद झाला... Vasudha Gudhe -
खुर (मटण पाया) (mutton paya recipe in marathi)
प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळे नाव आहेत हैदराबादला मटन पाया असं ओळखले जाते आपल्या नागपूरला खूर असे संबोधले जाते ही भाजी खायला अत्यंत चविष्ट लागते या भाजी मध्ये खूप ताकत असते असं म्हणतात प्रोटीन्स भरपूर असते आणि माझ्या नवऱ्याला ही भाजी खूप आवडते आणि मला बनवायला पण खूप आवडतात अशा मसाल्याच्या भाज्या Maya Bawane Damai -
नागपुरी सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
#GA4 #week3 #muttonगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील mutton ह्या की-वर्ड निवडून आज मी नागपुरी स्पेशल सावजी मटण ची रेसिपी बनवली आहे. सरिता बुरडे -
-
विदर्भ स्पेशल सावजी अंडाकरी (saoji anda curry recipe in marathi)
#सावजीअंडाकरीविदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, विदर्भातील लोकांचा आदरतिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. बिंदास, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत.. तंबाखूची डबी काढून, "चुन्याची पुडी हाय का जी"? असे विचारणारे.... "विदर्भातले जेवण" म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.'.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. मात्र इथला सुविख्यात असा "सावजी" प्रकार तिखटच असतो हे अगदी खरे..विदर्भ म्हटलं की सावजी हे नाव हमखास येतच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे.. "सावजी अंडा करी"....बऱ्याच ठिकाणी अंडाकरी करताना उकडलेले अंडे तळून घेतात. मग ते मसाल्यामध्ये घालतात. पण मला तळलेले अंडे आवडत नसल्याने मी तसे केले नाही. पण जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून बघा. त्याची सुद्धा एक वेगळीच टेस्ट असते.तसेच बऱ्याच वेळा या अंडाकरी मध्ये टमाटर चा देखील वापर करतात, टमाटर घातल्याने थोडा टॅंगी फ्लेवर येतो. अप्रतिम लागते. शेवटी काय पदार्थ एकच असला तरी बनविणारी हात वेगवेगळे आणि प्रत्येकाचा पदार्थ, आवडी-निवडी ह्या वेगवेगळ्या असणारच. आणि असायलाच हव्यात.. नाही का..? चला तर मग करायचा.. सावजी चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास नागपूरचा सावजी अंडा करी Vasudha Gudhe -
चमचमीत मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल E-Book रेसिपी#मटण_रस्सा Jyotshna Vishal Khadatkar -
झणझणीत मटण (mutton recipe in marathi)
लॉक डाऊन असल्याने इतक्यात मटन आणलेच नव्हते,जवळ जवळ तीन महिन्यांनी आणले,तसे आमचा कडे रेगुलार होत नाही, कधी कधी च होते......मुलं खूप तरसून गेले होते मटन खाण्यास...मुलगा म्हणाला आई आज आणू का,, मी म्हटले हो ठीक आहे आण...कारोणा मुळे खूप भीती वाटते, म्हणून इतके दिवस मी त्याला आणू नाही दिले,,आज मुलं खूप खुश होती...छान झणझणीत मटन झाले होते..त्यामुळे मुलं जरा जास्तच आनंद होते... Sonal Isal Kolhe -
पोळ्याची कर मटण रस्सा भाजी (mutton rassa bhaji recipe in marathi)
आजचा दिवस म्हणजे पोळ्याची कर त्यामुळे नाॕनव्हेज खाणार्यांचा स्पेशल दिवस.म्हणून मटण रस्सा बनविण्याचा बेत केला. Dilip Bele -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
# आज माझ्या मुलाला बिर्याणी खायची इच्छा झाली...म्हणून मटण आणले आणि बिर्याणी करायचे ठरवले...पण जरा वेगळ्या पद्धतीने....मी केले खूप छान झाले ..तुम्ही पण करून बघा.. नक्की आवडेल...चला मग बनवू...मटण बिर्याणी... Kavita basutkar -
-
-
-
-
काळ मटण रस्सा (kala mutton rassa recipe in marathi)
#KS5: काळ मटण हे मराठवाडी मटण त्या चा काळा मसाला आणि काळ वाटण मुळे सुप्रसिध्द आहे आणि ते तितकं चवीष्ट सुद्धा लागत.माझ्या मिस्टर ला मटण फार आवडत. Varsha S M -
देसी मटण रस्सा (MUTTON RASSA RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीमाझ्या फॅमिली त आम्ही 4 च आहोत आम्ही दोघे आणि आमची दोन मुले, आमच्या घरी सर्वांना च नॉनव्हेज खूप आवडते , या साठी केव्हाही तयार असतात मुलांना तर रोज ही दिले तर आवडणार , आणि नवरा हिंदी साईडर असल्याने त्यांना ही नॉनव्हेज आवडत ..तर सर्वांची मजाच असतेतसे बघितले तर माझ्या फॅमिली त सासू सासरे नाहीत ते पहिलेच गेले, पण नवरा कुठली ही कसर सोडत नाही , कधी माझी सासू होवून किचन मधे लुडबुड करून माझा मूड खराब करतील , कधी सासरे होवून समजावतील पण सगळे कॅरेक्टर अगदी न विसरता पार पाडतात छान वाटत कधी कधी , Maya Bawane Damai -
सावजी मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB #W1सावजी मटण रस्सा ही नागपरी लोकांची खासियत आहे.नागपुरात रहाणारे कोष्टी विणकर लोक विशिष्ट पद्धतीने आणि भरपूर तेल मसाले वापरून हे पदार्थ बनवितात जे आता जगभर प्रसिद्ध झाले आहेत.खुप स्वादिष्ट ही लागतात.नागपुरच्या कोरड्या हवामानात ते आवश्यक ही आहे.तिखट, झणझणीत मटण रस्सा ही रेसिपी आपण पाहू या.त्या लोकांच्या मानाने मी तिखट आणि तेल जरा कमी वापरले आहे परंतु मसाले तेच आहेत.विशेष म्हणजे अजून ही ती लोकं हा मसाला पाट्यावर वाटतात. Pragati Hakim -
-
-
"घी रोस्ट मटण मसाला" (ghee roast mutton masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनर#शनिवार_ मटण"घी रोस्ट मटण मसाला" माझं आणि नॉनव्हेजचं समीकरण अजून तरी जुळलं नाही, आणि कदाचित जुळणार ही नाही, आणि मटण म्हणजे माझ्या नवऱ्याचा आणि मुलाचा वीक पॉइंट... तेव्हा जरी मी खात नसले, तरी मला हे सर्व बनवणं भाग आहे... म्हणजे ते पण खुश आणि ते खुश म्हणून मग मी पण खुश...!!😊😊 Shital Siddhesh Raut -
-
-
-
मटण रस्सा व सुकं मटण (mutton rassa sukh mutton recipe in marathi)
#EB1#W1विंटर स्पेशल रेसिपी E - bookवीक -1 Sujata Gengaje -
मटण खिमा रस्सा (mutton kheema rassa recipe in marathi)
#EB1#W1#मटण रस्सामी मटण खिमा रस्सा बनविला. Deepa Gad
More Recipes
- उपमा (upma recipe in marathi)
- ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा (jowarichya lahyancha chiwda recipe in marathi)
- कच्च्या केळ्याची भाजी (kacchya kelyachi bhaji recipe in marathi)
- गावाकडची पंगतीतिल कांद्याची भाजी (kandyachi bhaji recipe in marathi)
- कळण्याची भाकरी भरीत (kalnyachi bhakhri bharit recipe in marathi)
टिप्पण्या