चिकन दम बिर्यानी (chicken dum biryani recipe in marathi)

Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
Nagpur

चिकन दम बिर्यानी (chicken dum biryani recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास 30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 किलो चिकन
  2. 4मोठे कांदे
  3. 10,12हिरव्या मिरच्या
  4. 10-12खडा मसाला- --(छोटी विलायची, मिरे, जावित्रि) आणि
  5. ३ चमच जीरे
  6. 1 वाटीकोथिंबीर,
  7. 1 वाटी पूदिना
  8. 1 वाटीआंबट दही,
  9. 2 लिंबू
  10. 2 चमचशहाजिरे,
  11. 4 चमच धने पूड,
  12. 1 चमच बिर्याणी मसाला
  13. 3 चमचलाल तिखट,
  14. 1 चमच हळद,मीठ चवीनुसार,
  15. 1 चमच गरम मसाला व
  16. 1 वाटी तेल
  17. 1किलो बासमती तांदूळ व त्यात टाकायला,
  18. 2 चमच जीरे
  19. 3,4हिरव्या मिरच्या,
  20. 2 मोठी विलायची,
  21. 2छोटी विलायची
  22. 1दालचिनी

कुकिंग सूचना

1 तास 30 मि
  1. 1

    सर्व प्रथम कांदे लांब पातळ चिरून घ्यायचे व तेलात ब्राऊन रंग येत पर्यंत तळून घ्यावेत

  2. 2

    नंतर खडा मसाला दिलेनूसार मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे आणि कोथिंबीर, पूदिना व मिरच्या सूद्धा बारिक करून घ्यावे व चिकन स्वच्छ धुवून घ्यावेत.

  3. 3

    नंतर एका मोठ्या पातेल्यात चिकन, बारीक केलेला खडा मसाला, बारीक केलेले कोथिंबीर पूदिना व मिरच्या चे पेस्ट, तिखट, मीठ, हळद,गरम मसाला, शहाजिरे,धने पूड व बिर्याणी मसाला सगळे साहित्य घालून एकत्र एकजीव करावे नंतर त्यात दही, लिंबाचा रस व तळलेले अर्धे कांदे (अर्धे कांदे वरून भातावर टाकायला ठेवायचे) व तेल घालून एकत्र करावे

  4. 4

    सगळे साहित्य एकत्रितपणे करून घ्यावे 10,15मिनिटे चांगले मिक्स करावे व 1 तासांसाठी झाकून ठेवावे (marrination)

  5. 5

    नंतर लगेच बासमती तांदूळ घेऊन पाण्यात 1/2 तास भिजत घालून ठेवावे. 1/2तास झाल्यावर एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे व त्यात हिरवी मिरची, दालचिनी, मोठी विलायची व छोटी विलायची टाकावी,

  6. 6

    भाताला उकळी आल्यावर त्यात दिलेले खडे मसाले घालावे व नंतर भिजत घातलेले तांदूळ टाकायचे व 50% शिजू द्यायचे

  7. 7

    नंतर 1 तास मेरिनेट झालेले चिकन च्या गंजात त्यावर भात घालून नंतर त्यावर (लाल,हिरवा, केशरी रंग इच्छेनुसार घालावे) तळलेले कांदे, कोथिंबीर व पुदिना

  8. 8

    नंतर गॅस सूरू करून 30 मिनिटांसाठी कमी फ्लेम वर दम द्यायला शिजायला ठेवावे

  9. 9

    30 मिनिटांनी गॅस बंद करावा गरमागरम दम बिर्याणी तयार....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashvini bansod
Ashvini bansod @AshviniBansod
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes