पोटॅटो स्पिनच बॉल्स (potato spinach ball recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#pe

पोटॅटो स्पिनच बॉल्स (potato spinach ball recipe in marathi)

#pe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2उकळलेले बटाटे
  2. 1 कपपालक
  3. 1 छोटाकांदा
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1/2 टीस्पूनजीरे
  6. 1 टीस्पूनआले-लसूणपेस्ट
  7. 1/2 कपबारीक चिरलेला कोथिंबीर
  8. 2 टीस्पूनतांदळाचे पीठ
  9. 2 टीस्पूनबेसन
  10. चवीनुसारमीठ
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम बटाटेचे छिलके काढून व्यवस्थित मॅश करून घ्यावे.

  2. 2

    पालक, कांदा आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यावे.

  3. 3

    आता एका कढईत तेल घालून ते तापल्यावर त्यात जीरे घालावे. जीरे तडतडल्यावर त्यात कांदा घालून तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा. त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या टाकावे.

  4. 4

    आता त्यात आले-लसूणपेस्ट आणि कोथिंबीर घालून 2 ते 3 मिनिटे परतून घ्यावे.

  5. 5

    आता त्यात पालक आणि मॅश केलेले बटाटे टाकून सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे.

  6. 6

    आता त्यात तांदळाचे पीठ, बेसन आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण 2 ते 3 मिनिटे परतावे. परतल्यानंतर एक घट्ट गोळा बनलेला दिसेल.

  7. 7

    हा गोळा एका प्लेट मध्ये काढून थंड होऊ द्यावा. थंड झाल्यावर दोन्ही
    हाताला थोडे तेल लावून त्याचे छोटे-छोटे बॉल्स बनवून घ्यावे. कढईमध्ये तळण्यापूरते तेल घालून सर्व बॉल्स मध्यम आचेवर गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावेत.

  8. 8

    गरमागरम पोटॅटो-स्पिनच बॉल्स सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून चटणी सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

Similar Recipes