गावठी पोह्यांचे पॅटीज (pohyanche patties recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

"पोहे cooksnap challenge" साठी मी Jyoti Saste yanchi पाककृती #cooksnap केली आहे 😊 गावठी पोहे वापरत अजून काही घटक वापरत पोहे patty बनवली आहे ☺️ माझ्या काकांनी सिंधुदुर्गातून गावठी पोहे पाठवलेले आहेत. त्याचे काय काय पदार्थ बनवणं चालू असतं घरात. मग कांदे पोहे असतील, दडपे पोहे असतील किंवा नारळाच्या रसातले पोहे असतील. हा पॅटी प्रकार एकदम मस्त वाटला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
४ व्यक्तींसाठी
  1. 1 वाटीगावठी पोहे
  2. 1/2 वाटीबेसन
  3. 1बटाटा
  4. 1कांदा
  5. 1हिरवी तिखट मिरची
  6. 1 चमचाबडीशेप
  7. 1 चमचाजीरे
  8. 1 चमचाओवा
  9. 1 चमचाजीरे पावडर
  10. 1 चमचाधणे पावडर
  11. 1 चमचाआमचूर पावडर
  12. 1 चमचाचाट मसाला
  13. 1 चमचालाल तिखट मसाला
  14. 1 चमचागोडा मसाला
  15. 1/4 चमचाहळद
  16. 1 चमचामीठ
  17. चिमूटभरहिंग
  18. तळण्यासाठी तेल
  19. 1 इंचआलं

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    १ वाटी गावठी पोहे स्वच्छ धुवून घेणे. १ बटाटा किसून घेतला. १ कांदा बारीक चिरून घेतला. १ हिरवी तिखट मिरची आणि १ इंच आलं खलबत्त्यात ठेचून घेतलं.
    हा सगळा ऐवज त्यात अर्धी वाटी बेसन, १ चमचा बडीशेप, १ चमचा जीरे, १ चमचा ओवा, १ चमचा जीरे पावडर, १ चमचा धणे पावडर, १ चमचा आमचूर पावडर, १ चमचा चाट मसाला, १ चमचा लाल तिखट मसाला, १ चमचा गोडा मसाला, पाव चमचा हळद, १ चमचा मीठ, चिमूटभर हिंग घालून एकत्र मिक्स केलं.

  2. 2

    पाणी घालण्याची गरज वाटली नाही. थोडं मिश्रण चाखून मिठाचं प्रमाण चेक केलं. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून छोटे पॅटी बनवून घेतले.

  3. 3

    पॅनवर तेल गरम करून पॅटी shallow फ्राय करून घेतले. दोन्ही बाजूने व्यवस्थित गुलाबीसर तळून घेतले.

  4. 4

    टोमॅटो सॉस सोबत पॅटी खूप टेस्टी लागतात. :) फोटोत पोह्याचे मिरगुंड बाजूला ठेवले आहेत :)
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes