जाड पोह्यांचा चिवडा (jaad pohyancha chivda recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

आपल्याला पटकन चिवडा कधी खावासा वाटला तर मुरमुरे किंवा पातळ पोहे काही आपल्या घरात अवेलेबल नसतात. मग आपण कांदे पोहे साठी जे पोहे वापरतो त्याचा सुद्धा चिवडा खूप छान होतो चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

जाड पोह्यांचा चिवडा (jaad pohyancha chivda recipe in marathi)

आपल्याला पटकन चिवडा कधी खावासा वाटला तर मुरमुरे किंवा पातळ पोहे काही आपल्या घरात अवेलेबल नसतात. मग आपण कांदे पोहे साठी जे पोहे वापरतो त्याचा सुद्धा चिवडा खूप छान होतो चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
6 जणांसाठी
  1. 1/2 किलोजाड पोहे
  2. 1/2 कपतेल
  3. 1/2 कपशेंगदाणे
  4. 1 चमचामोहरी
  5. 1 चमचाजीरे
  6. 12काजू
  7. 5-6 हिरव्या मिरच्या
  8. 1/2 चमचाहळद
  9. 1 चमचामीठ
  10. 1 चमचापिठी साखर
  11. 1 चमचाचाट मसाला
  12. 15-20पाने कडीपत्ता
  13. 10-12पाकळ्या लसुन
  14. 1/2 चमचाहिंग

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम लागणारे साहित्य जमवून घेऊ.

  2. 2

    कढई गॅस वर ठेवून त्या पोहे घालून मंद आचेवर पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणे

  3. 3

    आता फोडणीसाठी दुसऱ्या कढईत तेल घेऊन अगोदर शेंगदाणे तळून घेणे आता त्यात मोहरी, जीरे, हिंग,कढीपत्ता,ठेचलेला लसूण हिरवी मिरची छान गुलाबी रंगावर परतून घेने. लसूण हिरवी मिरची ओलसर राहता कामा नये.
    काजू गुलाबी रंगावर परतने

  4. 4

    आता या फोडणीत भाजलेले पोहे टाकून सर्व छान मिक्स करून घेणे आता त्यात मीठ, पिठीसाखर आणि चाट मसाला टाकून परतने.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

Similar Recipes