कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#जागतिक पोहे दिवस
#कांदे पोहे
कांदे पोहे म्हणजे लग्नाचा पाहण्याचा कार्यक्रम....मराठी मध्ये कांदे पोहे हा चित्रपट सुध्दा आहे....प्रत्येकाच्या जीवनात येणारे कांदे पोहे काहीनाकाही आठवणी देवून जातात...माझ्या घरी आवडीच्या नाष्ट्यामध्ये याचा समावेश आहे...भरपुर लिंबू पिळून केलेले कांदे पोहे...पाहुयात रेसिपी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मी.
3 सर्व्हिंग
  1. 3 कपजाड पोहे
  2. 2मोठे कांदे
  3. 4हिरव्या मिरच्या
  4. 5कढीपत्त्याची पाने
  5. 2 टेबलस्पूनतेल
  6. 1/2 टीस्पूनमोहरी
  7. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  8. 1लिंबू
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. मीठ चवीनुसार
  11. साखर चवीनुसार
  12. कोथीबीर आणि खोबरं किस सजावटीसाठी
  13. पाणी अंदाजे

कुकिंग सूचना

20 मी.
  1. 1

    सर्वप्रथम पोहे चाळून घ्या.मग पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या आणि 10 मी.भिजत ठेवा त्यात साखर मीठ आणि लिंबाचा रस घाला.

  2. 2

    कांदा उभा चिरून घ्या. मिरची बारीक चिरा. कढई मध्ये तेल गरम करून मोहरीची फोडणी करून घ्या त्यात कांदा,मिरची,कडीपत्ता,शेंगदाणे घालून परतून घ्या.

  3. 3

    कांदा मिरची छान परतून झाली की त्यात हळद घाला आणि परता.नंतर पोहे घालून छान मिक्स करा.आणि कोथिंबीर घाला.आणि 5 मी.झाकून ठेवा.मग पोहे गरम गरम सर्व्ह करा.

  4. 4

    वरून थोडे लिंबू पिळून, खोबरं किस आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

Similar Recipes