दाल ढोकळी (चकोल्या) (dal dhokli recipe in marathi)

Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681

#dr

दाल ढोकळी (चकोल्या) (dal dhokli recipe in marathi)

#dr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
पाच जणांसाठी
  1. 1.5 वाटी तूरडाळ
  2. 1/2 टीस्पून हळद
  3. 1/4 चमचा हिंग
  4. लसूण पंधरा ते वीस पाकळ्या
  5. 1/4 वाटी सुकं खोबरं
  6. 1 टेबलस्पूनजीरा
  7. गव्हाचं पीठ
  8. 1/2 चमचा ओवा
  9. 5 चमचे तिखट
  10. 4 चमचेकाळा मसाला
  11. गुळ
  12. 2 चमचेगरम मसाला
  13. चवीपुरते मीठ
  14. कडीपत्ता
  15. कोथिंबीर
  16. साजूक तूप

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    प्रथम गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीपुरतं मीठ,तेल आणि ओवा घालून चांगले मिक्स करून घ्यावे आणि पीठ मळून घ्यावे आणि पंधरा वीस मिनिटे झाकून बाजूला ठेवावे.

  2. 2

    तूर डाळ स्वच्छ धुऊन त्यात हिंग आणि हळद घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावी

  3. 3

    लसून पाकळ्या जीरे आणि खोबरे मिक्सरमधून वाटून घ्यावे

  4. 4

    आता एका पातेल्यात तेल घेऊन त्यात फोडणी करून मिक्सरवर वाटलेले जीरे खोबरे आणि लसूण त्यात घालावे, त्यात थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून शिजवलेले वरण घालून आमटी करावी.

  5. 5

    मग आपण जी बाजूला कणिक मळून ठेवली होती तिची पोळी लाटून त्या पोळीवर कात्रण फिरवून शंकरपाळ्या सारखी कापून घ्यावे.

  6. 6

    सगळे कापून घेतल्या नंतर परत गॅस लावावा आणि त्या आमटी मध्ये एकेक करून असे सगळे कापून घेतलेले शंकरपाळी सोडावीत.

  7. 7

    शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवून चांगल्या वाफा आणाव्यात.

  8. 8

    शिजण्यासाठी चार-पाच दणकून वाफा आणल्यानंतर त्यावर कोथिंबीर घालावी आणि एक चमचा साजूक तुप घालावे आणि सादर करावे

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilima Gosavi
Nilima Gosavi @cook_27652681
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes