दाल बाटी (Dal baati recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#MWK
Weekend recipe

दाल बाटी (Dal baati recipe in marathi)

#MWK
Weekend recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-45 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीगव्हाचे पीठ
  2. 2 टेबलंस्पून रवा
  3. 1 टीस्पूनबेकिंग सोडा
  4. 2 टेबलंस्पून तूप
  5. 1 टेबलंस्पून ओवा
  6. चवीनुसारमीठ
  7. गरजेनुसार पाणी
  8. 1/2 वाटीतूरडाळ
  9. 1 टेबलंस्पून मसूरडाळ
  10. 1 टेबलंस्पून मुगडाळ
  11. 1 टेबलंस्पून हरभरा डाळ
  12. 1कांदा
  13. 1टोमॅटो
  14. 2 टेबलंस्पून तेल
  15. 1 टीस्पूनजीरे
  16. 1 टीस्पूनमोहरी
  17. 1 टेबलंस्पून मिरची लसूण पेस्ट
  18. 1 टेबलंस्पून लाल तिखट
  19. 5कडीपत्ता पाने
  20. 1 टीस्पूनहळद
  21. थाडेसे हिंग
  22. 1आमसूल
  23. 2 टेबलंस्पून तेल
  24. चवीनुसारमीठ
  25. गरजेनुसार पाणी
  26. कोथिंबीर
  27. 1/2 वाटीतूप

कुकिंग सूचना

40-45 मि
  1. 1

    प्रथम बाटी बनविण्यासाठी गव्हाच्या पिठात सोडा, मीठ आणि तूप ऍड करा आणि छान मिक्स करून घ्या. आता यात ओवा आणि थोडे थोडे पाणी ऍड करत घट्ट पीठ मळून घ्या 10 -15 मीनिटे झाकून ठेवा.

  2. 2

    आता सर्व डाळी एकत्र करून धुवून घ्या. कट केलेला कांदा आणि टोमॅटो डाळींमध्ये ऍड काटा थोडे पाणी आणि हळद टाकून डाळी कुकर मध्ये शिजवून घ्या

  3. 3

    आता पातेल्यात तेल ऍड करून गरम करा तेल गरम झाले कि गॅस बारीक करा त्यात जीरे मोहरी कढीपत्ता हिंग ऍड करून फोडणी बनवा नंतर यात लसूणमिरची पेस्ट आणि तिखट टाका आणि लगेच शिजवलेली डाळ रवीने फेटून ऍड करा

  4. 4

    आता यात आमसूल मीठ आणि पाणी घालून उकळी आणा वरून कोथिंबीर घाला मस्त टेस्टी डाळ तयार.

  5. 5

    आता बाटी च्या पिठाचे गोळे तयार करा. आप्पे पात्रात तूप टाका आणि तयार गोळे ठेवून झाकून बारीक आचेवर बाटी भाजून घ्या नंतर बाटी पलटी करून वरून तूप सोडा आणि दुसऱ्या साईड ने बाटी भाजून घ्या मस्त बाटी तयार होते (ही तयार बाटी आपण तुपात थोडावेळ डीप करून नंतर पण सर्व्ह करू शकतो)

  6. 6

    मस्त दाल बाटी तयार. डाळी मध्ये तूप टाकून बाटी बरोबर सर्व्ह करा. बरोबर कांदा लिंबू आणि लोणचे खूप मस्त लागते ही दाल बाटी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes