मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi)

Purna Brahma Rasoi
Purna Brahma Rasoi @Trupti

मुगाच्या डाळीचे टिमणे हा एक पारंपारिक पदार्थ आहे तो विदर्भात केला जातो. याला चिमणे का म्हणतात माहिती नाही पण माझी आजी करायची आज सहज आठवले म्हणुन केला.
#dr #purnabrmharasoi

मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi)

मुगाच्या डाळीचे टिमणे हा एक पारंपारिक पदार्थ आहे तो विदर्भात केला जातो. याला चिमणे का म्हणतात माहिती नाही पण माझी आजी करायची आज सहज आठवले म्हणुन केला.
#dr #purnabrmharasoi

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

भिजवणयासाठी 7-8 तास व नंतर लगेच केला तरी चालते
४ जणांना करता
  1. 1 वाटीमुगडाळ
  2. 6-7लसुण पाकळ्य
  3. 3-4हिरवी मिरची
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. कोथिंबीर आवडीने
  6. मीठ चवीनुसार
  7. वाटीतेल छोटी
  8. 1 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

भिजवणयासाठी 7-8 तास व नंतर लगेच केला तरी चालते
  1. 1

    सुरवातीला 1 वाटी मुगडाळ स्वच्छ धुवून घेणे.

  2. 2

    7- 8 तास भिजत ठेवणे

  3. 3

    8 तासानंतर त्यातील पाणी काढून पुन्हा स्वच्छ धुवून घेणे.

  4. 4

    पाणी निथळून घेणे अत्ता त्यात हिरवी मिरची, लसुण पाकळ्या, जीरे, मीठ, कोथिंबीर घालून मिक्सर मधुन पेस्ट करुन घेणे.

  5. 5

    थोडेसे पातळ करुन घ्यावे. चल बघावी थोडी हळद घालावी मिक्स करावे व 10 मिनिटे झाकुन ठेवावे.

  6. 6

    तवा गरम करून घ्यावा त्यावर तेल सोडावे. तवा चांगला गरम झाला की वाटी ने मिश्रण सोडावे व गोल आकारे फिरवून घ्यावे.

  7. 7

    कडेने परत तेल सोडावे व वरच्या बाजूला ही तेल लावून घ्यावे.

  8. 8

    5-6 मिनिटानी एक बाजू चांगली भाजली की दुसरी बाजू ही भाजुन घेणे. अगदी पातळ सोडायचे आहे.

  9. 9

    अत्ता दुसराही बनवुन घेते हा तुम्ही खोबरयाच्या चटणी सोबत सर्व करावे

  10. 10

    हे डोश्यासारखे करायचे आहेत.

  11. 11

    तयार आहेत आपले मुगाच्या डाळीचे टिमणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Purna Brahma Rasoi
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes