शकुनउंडे /सुकरुंडे (Sukrunde recipe in marathi)

Kamat Gokhale Foodz
Kamat Gokhale Foodz @KGF11

#KS7

ह्या आठवड्याच्या लॉस्ट रेसिपी साठी मी आज एक कोकणी रेसिपी सांगणार आहे ती म्हणजे शकुनउंडे किंवा काही जण ह्यालाच सुकरुंडे असेही म्हणतात.ही रेसिपी कोकणातील आहे. सणासुदीला, विशेषतः गणेश चतुर्थीला आमच्याकडे हे शकुनउंडे बनवले जातात. तसेच काही शुभप्रसंगी थोड्या प्रमाणात का होईना हे शकुनउंडे बनवायची प्रथा आहे. कदचित म्हणूनच ह्याला शकुनउंडे नाव पडले असेल.☺️मी खाली दिलेल्या प्रमाणामध्ये ११ मध्यम आकाराचे शकुनउंडे तयार झाले आहेत.चला तर आता रेसिपी पाहू.

शकुनउंडे /सुकरुंडे (Sukrunde recipe in marathi)

#KS7

ह्या आठवड्याच्या लॉस्ट रेसिपी साठी मी आज एक कोकणी रेसिपी सांगणार आहे ती म्हणजे शकुनउंडे किंवा काही जण ह्यालाच सुकरुंडे असेही म्हणतात.ही रेसिपी कोकणातील आहे. सणासुदीला, विशेषतः गणेश चतुर्थीला आमच्याकडे हे शकुनउंडे बनवले जातात. तसेच काही शुभप्रसंगी थोड्या प्रमाणात का होईना हे शकुनउंडे बनवायची प्रथा आहे. कदचित म्हणूनच ह्याला शकुनउंडे नाव पडले असेल.☺️मी खाली दिलेल्या प्रमाणामध्ये ११ मध्यम आकाराचे शकुनउंडे तयार झाले आहेत.चला तर आता रेसिपी पाहू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-४० मिनिटे
३-४
  1. 1 कपमूग डाळ
  2. 1/2 चमचाहळद
  3. 1/4 चमचामीठ डाळ शिजवताना
  4. 1 चमचातूप डाळ शिजवताना
  5. काजु आणि बदाम काप आवडीनुसार
  6. 1 कपचिरलेला गूळ
  7. 1/4 कपओले खोबरे खिसलेले
  8. 1/2 चमचावेलची पावडर
  9. 1/4 चमचाजायफळ
  10. 1 कपतांदळाचे पीठ
  11. 1/4 कपगव्हाचे पीठ
  12. 1 चमचाबेसन
  13. 1/2 टीस्पूनमीठ किंवा चवीनुसार
  14. आवश्यकतेनुसार पाणी
  15. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

३०-४० मिनिटे
  1. 1

    प्रथम मूग डाळ २-३ वेळा स्वच्छ धूऊन १/२ तास पाण्यामधे भिजत ठेवा. अर्ध्या तासानंतर भिजवलेले पाणी काढून टाकून डाळ कूकरच्या डब्यामध्ये काढून घ्या.

  2. 2

    कूकरच्या डब्यात डाळीमध्ये ३ कप पाणी घाला. त्यात १/२ चमचा हळद,१/४ चमचा मीठ आणि १ चमचा तूप घाला. २-३ शिटी पर्यंत शिजवा.

  3. 3

    डाळ शिजल्यावर त्यात जास्तीचे पाणी राहिले असेल तर ते गाळून घ्या.हे आमटी मधे वापरू शकता.पण पुरण बनवताना पाणी राहिले तर पुरण घट्ट होण्याला खूप वेळ लागतो किंवा पुरण नीट बनत नाही.नंतर गॅसवर एक कढई ठेवून त्यात शिजलेली डाळ आणि गूळ घाला. हे सतत ढवळत राहायचे आहे.

  4. 4

    गूळ विरघळला की त्यात ओले खोबरे १/४ कप घाला आणि पुन्हा मिक्स करून ढवळत रहा. हे घट्ट होत आले की त्यात काजू बदामाचे तुकडे,वेलची पावडर घाला.

  5. 5

    आता त्यात जायफळ खिसून घाला. मग पुन्हा मिक्स करून ढवळत रहा. कढई पासून पुरण वेगळे होत आले की त्यात १ चमचा तूप घाला पुरण छान गोळा होऊन येते.मग गॅस बंद करा.

  6. 6

    तयार पुरण एका भांड्यात काढून थंड होऊ द्या,तोपर्यंत आपण उंडे चे बॅटर बनवू

  7. 7

    उंडे बॅटर साठी तांदूळ पिठ,गव्हाचे पीठ,बेसन पीठ एकत्र करून घ्या.

  8. 8

    त्यात १/४ चमचा मीठ घाला आणि आवश्कतेनुसार पाणी घालून वड्यासाठी लागते त्याप्रमाणे पीठ भिजवून घ्या.

  9. 9

    आता कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करा. आणि तयार करून ठेवलेल्या पुरणाचे लहान गोळे तयार करून घ्या.

  10. 10

    आता हे पुरणाचे गोळे बॅटर मध्ये घोळवून गरम तेलात तळण्यासाठी सोडा. मध्यम आणि लहान गॅस ठेवून तळायचे आहेत. दोन्ही बाजूंनी वडे परतून तळून घ्या.

  11. 11

    दोन्ही बाजूंनी छान लालसर तळून घ्या.खायला कुरकुरीत होतात. आत मध्ये मऊ पुरण आणि कुरकुरीत आवरण मस्त लागते.उंडे तुपसोबत खाण्याची प्रथा आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kamat Gokhale Foodz
रोजी
YOU TUBE - Kamat Gokhale Foodz
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes