भाजणीची मोकळ (bhajanichi mokal recipe in marathi)

Kamat Gokhale Foodz
Kamat Gokhale Foodz @KGF11

#KS7

लॉस्ट रेसिपी साठी आणखी एक कोकणी रेसिपी सांगणार आहे ती म्हणजे भाजाणीची मोकळ. यासाठी थालीपीठ भाजणी लागते ते जवळ जवळ सर्व घरामध्ये उपलब्ध असते असे गृहीत धरून रेसिपी सांगत आहे. जरी नसेल तरी आजकाल कोठेही तयार थालीपीठ भाजणी सहज मिळू शकते. किंवा अगदी आपली चकली भाजणी पण वापरू शकता. मी स्वतः वापरून पहिली आहे. चला तर मग रेसिपी पाहू

भाजणीची मोकळ (bhajanichi mokal recipe in marathi)

#KS7

लॉस्ट रेसिपी साठी आणखी एक कोकणी रेसिपी सांगणार आहे ती म्हणजे भाजाणीची मोकळ. यासाठी थालीपीठ भाजणी लागते ते जवळ जवळ सर्व घरामध्ये उपलब्ध असते असे गृहीत धरून रेसिपी सांगत आहे. जरी नसेल तरी आजकाल कोठेही तयार थालीपीठ भाजणी सहज मिळू शकते. किंवा अगदी आपली चकली भाजणी पण वापरू शकता. मी स्वतः वापरून पहिली आहे. चला तर मग रेसिपी पाहू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
२-३ लोक
  1. 1 कपभाजणी पीठ
  2. 3/4-1 कपताक
  3. 1 चमचालाल तिखट
  4. 1 चमचाहळद
  5. 1/4 कपकिंवा आवडीनुसार भिजवलेले शेंगदाणे
  6. 1 चमचामोहरी
  7. 1/4 चमचाहिंग
  8. 2कांदे चिरलेले
  9. 1-2हिरव्या मिरच्या
  10. 5-6कडीपत्ता
  11. मीठ चवीनुसार
  12. 2-3 चमचेतेल
  13. कोथिंबीर
  14. सर्व्हिंग साठी ओले खोबरे

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम भाजानीच्या पीठ एका भांड्यात घेऊन त्यात १ चमचा लाल तिखट,१/२ चमचा हळद,१/२ चमचा मीठ घालून मिक्स करून घ्या.

  2. 2

    मग त्यात ताक घालून मिक्स करून घ्या. मी वापरलेलं ताक ताजे होते त्यामुळे आंबटपणा जास्त नव्हता म्हणून १ कप वापरले आहे.ताक खूप आंबट असेल प्रमाण कमी जास्त करू शकत.पोळीच्या पीठ भिजवतो त्यापेक्षा सैल हे पीठ भिजवायचे आहे.

  3. 3

    १५ मिनिटानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात २-३ चमचे तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यात मोहरी,हिंग,हिरवी मिरची घाला.

  4. 4

    मग त्यात कडीपत्ता,चिरलेला कांदा घाला.कांदा २-३ मिनिटे परतून घ्या

  5. 5

    आता त्यात भिजवलेले शेंगदाणे घाला.हे ऑप्शनल आहे. पण खाताना दाताखाली आलेले दाणे खूप छान लागतात. शेंग दाणे पुरते मीठ घाला.कारण आपण भाजणी पिठात मीठ वापरले आहे. शेंगदाणे तेलात परतून झाले की त्यात १/२ चमचा हळद घाला.

  6. 6

    आता त्यात भिजवलेली भाजणी घाला.आणि फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्या. ५ मिनिटे परतून झाली की जरा एकदा झाकून ठेवा.म्हणजे भाजणी शिजून जरा मोकळी होते.

  7. 7

    मोकळी होत आली की त्यात चिरलेली कोथिंबीर घाला,छान मिक्स करा. आणि ओले खोबरे वरून घालून मस्तपैकी खायला घ्या. खाताना वरून थोडे लोणी किंवा तूप घातले तरी खूपच छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kamat Gokhale Foodz
रोजी
YOU TUBE - Kamat Gokhale Foodz
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes