शाही पनीर मटका बिर्याणी (shahi paneer matka biryani recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#br

शाही पनीर मटका बिर्याणी (shahi paneer matka biryani recipe in marathi)

#br

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
2 सर्व्हिंग्ज
  1. राईस बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  2. 1 कपबासमती तांदूळ
  3. 2तमालपत्र
  4. 5-6लवंग
  5. 1 टीस्पूनकाळीमिरी
  6. 2कलमी
  7. 3हिरवी विलायची
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. 1 टेबलस्पूनतूप
  10. 1 टेबलस्पूनतिखट
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 1 टेबलस्पूनबिर्याणी मसाला
  13. 1उभा बारीक चिरलेला कांदा
  14. 10-12काजू
  15. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
  16. चवीनुसारमीठ
  17. ग्रेव्ही बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  18. 2 टेबलस्पूनतेल
  19. 1 टीस्पूनजीरे
  20. 2मध्यम आकाराचे चिरलेले कांदे
  21. 5-6लसूण पाकळ्या
  22. 1 इंचअद्रक
  23. 2हिरव्या मिरच्या
  24. 1मोठा आकाराचा चिरलेला टमाटर
  25. 2 टेबलस्पूनशाही पनीर मसाला
  26. 1 कपपनीर क्यूब्स
  27. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  28. चवीनुसारमीठ
  29. थोडेसे पाणी
  30. बिर्याणी असेंबल करण्यासाठी लागणारे साहित्य
  31. थोडे तळलेले कांदे
  32. तळलेले काजू
  33. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  34. पनीर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वप्रथम 1 कांदा उभा चिरून त्याचे स्लाईस वेगवेगळे करून घ्यावे. कांद्याच्या स्लाईसला थोडे मीठ चोळून त्यातील प्रत्येक पाकळ्या मोकळे करून घ्यावे आणि 5 ते 10 मिनिटे बाजूला ठेवावे.

  2. 2

    आता हे कांदे हाताने घट्ट पिळून त्यातील पाणी काढून घ्यावे.(असे केल्याने कांदे तळल्यानंतर छान कुरकुरीत होईल.) एका कढईत तेल घालून कांदे छान गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावेत आणि बाजूला काढून ठेवावे.

  3. 3

    आता त्याच कढईत काजू सुद्धा थोडे लालसर होईपर्यंत तळून घ्यावेत. आता कांदे आणि काजू दोन्ही तळून तयार आहे.

  4. 4

    आता सर्वप्रथम राईस बनवून घ्यावे. त्यासाठी बासमती तांदूळ दोन ते तीनदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे आणि कोरडे करून घ्यावे. आता एका भांड्यात गरजेनुसार पाणी घालून गरम होऊ द्यावे. पाणी गरम झाल्यावर त्यात तमालपत्र, लवंग, काळीमिरी, कलमी, विलायची, तेल आणि थोडेसे मीठ घालून मिक्स करून घ्यावे. पाण्याला उकळी आली की त्यात धुतलेले बासमती तांदूळ घालून 70% ते 80% शिजवून घ्यावा.

  5. 5

    आता एका कढईत तेल आणि तूप घालून त्यात शिजवलेला भात टाकावा.

  6. 6

    आता त्यात तिखट, हळद, बिर्याणी मसाला, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडे तळलेले कांदे आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर ठेवून अर्धा कच्चा राहिलेला भात शिजवून घ्यावा. आता हा आपला राईस तयार आहे.

  7. 7

    त्यानंतर आता ग्रेव्ही बनवून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये तेल घालून त्यात जीरे टाकावे. जीरे तडतडल्यावर त्यात कांदा, लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या टाकावे.

  8. 8

    आता त्यात टमाटर घालून सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे आणि 3 ते 4 मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावे. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मध्ये ग्राईंड करून पेस्ट बनवून घ्यावी.

  9. 9

    आता कढईत तेल घालून तेल गरम झाल्यावर ही पेस्ट त्यात टाकावी. शाही पनीर मसाला आणि थोडे पाणी घालून मिक्स करून घ्यावे आणि 2 ते 3 मिनिटे शिजवून उकळी आणावी.

  10. 10

    शेवटी त्यात पनीर क्युब्स आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता ही शाही पनीर ग्रेव्ही तयार आहे.

  11. 11

    आता बिर्याणी असेंबल करूया. त्यासाठी मटक्याच्या आतमध्ये सर्वात आधी पनीर ग्रेव्ही ऍड करावी. त्यावर थोडेसे पनीर किसून घ्यावे. आता त्यावर तळलेले कांद्याचे स्लाईस पसरवून एक लेयर बनवावी आणि मग त्यावर राईस पूर्णपणे भरून टाकावा.

  12. 12

    आता त्यावर थोडे पनीर किसून घ्यावे. तळलेले कांदे आणि काजू सुद्धा वरून टाकावे. आता बारीक चिरलेली कोथिंबीरने गार्निश करून गरमागरम शाही पनीर मटका बिर्याणी सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

Similar Recipes