कुर्मा पुरी (kurma puri recipe in marathi)

Kamat Gokhale Foodz
Kamat Gokhale Foodz @KGF11

#KS8

आजची रेसिपी आहे कुर्मा पुरी. यासाठी वेगवेगळ्या भाज्या वापरल्या जातात. तसेच भाज्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.

कुर्मा पुरी (kurma puri recipe in marathi)

#KS8

आजची रेसिपी आहे कुर्मा पुरी. यासाठी वेगवेगळ्या भाज्या वापरल्या जातात. तसेच भाज्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-४० मिनिटे
२-३ लोक
  1. 1-1/2 कप गव्हाचे पीठ
  2. 1 चमचामैदा
  3. 1 चमचातांदळाचे पीठ
  4. 1 चमचाबेसन
  5. 1 चमचाबारीक रवा
  6. 2 चमचेदुधावरची साय किंवा दूध पावडर
  7. 1/2 चमचासाखर
  8. 1 कपचिरलेला फ्लॉवर
  9. 1मोठा बटाटा
  10. 1गाजर
  11. 3/4 कपहिरवे मटार
  12. 1मोठा कांदा
  13. 1टोमॅटो
  14. 2-3मिरे
  15. 1दालचिनी तुकडा
  16. 1हिरवी वेलची
  17. 1मसाला वेलची
  18. 2-3लवंग
  19. 1जावीत्री
  20. 1 चमचाचिरलेले आले
  21. 1 चमचाजीरे
  22. 1 चमचालाल तिखट
  23. 1/2 चमचाहळद
  24. 1/2 चमचाधणे पावडर
  25. 1 चमचागरम मसाला
  26. मीठ चवीनुसार
  27. ४-५ चमचे तेल
  28. फोडणी आणि वाटण बनवण्यासाठी
  29. पुरी तळण्यासाठी तेल आवश्यकतेनुसार
  30. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

३०-४० मिनिटे
  1. 1

    एका परातीत गव्हाचे पीठ,तांदूळ पीठ,मैदा,बेसन,रवा हे सगळे एकत्र करून घ्या,त्यात १/२ चमचा मीठ आणि साखर घाला. त्यात साय घाला आणि मिक्स करून घ्या. मग लागेल तसे पाण्याचा वापर करून कणीक मळून घ्या आणि १५-२० मिनिटे झाकून ठेवा. ही कणीक खूप जास्त मऊ करायची नाही. कारण ही कणीक मळून १५ मिनिटे ठेवून दिली की ती मऊ होते.इथे मी साय वापरली आहे त्यामुळे पुरीला खूप छान चव येते.

  2. 2

    आता एका कढईमध्ये २ चमचे तेल गरम करून त्यात चिरलेल्या भाज्या तेलावर २-३ मिनिटे परतून घ्या. आणि एका डिश मध्ये काढून घ्या.इथे मी हिरवे मटार आधी परतून घेत नाही आहे.कारण मी फ्रोजन वापरले आहेत. भाज्या तेलावर अशा आधी परतून घेतल्यामुळे त्या नंतर जास्त मऊ पडत नाहीत.

  3. 3

    आता त्याच कढईमध्ये १ चमचा तेल घाला. त्यात मिरी,लवंग, जावित्री,हिरवी वेलची,मसाला वेलची,दालचिनी,बारीक चिरलेले आले हे सगळे परतून घ्या. मग त्यात चिरलेला कांदा घालून परतून घ्या,कांदा लालसर होत आला की त्यात चिरलेला टोमॅटो घाला.टोमॅटो मऊ शिजला की गॅस बंद करा. ह्यामध्ये लसूण पाकळ्या घाला आणि हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घाला.

  4. 4

    ह्याचे बारीक वाटण तयार करून घ्या. आणि आता कढई मध्ये कुर्मा फोडणी करण्यासाठी २-३ चमचे तेल घाला. त्यात जीरे घाला.जीरे तडतडले की त्यात तयार वाटण घाला. २-३मिनिटे परतून घ्या.

  5. 5

    मग त्यात लाल तिखट,हळद,धने पावडर,गरम मसाला घाला आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्या. मग त्यात हिरवे मटार घाला. मी इथे फ्रोजन वापरले आहेत म्हणुन ह्या स्टेजला घातले. कारण ते शिजायला जास्त वेळ लागत नाहीत.

  6. 6

    आता त्यात गरजेनुसार गरम पाणी घाला आणि उकळी आली की त्यात आधी परतून ठेवलेले फ्लोअर,बटाटा,गाजर घाला. चवी नुसार मीठ घाला. छान उकळी येऊ द्या.कोथिंबीर घाला. कुर्मा खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असतं नाही.त्यामुळे हवा तसा रस्सा तयार झाला की गॅस बंद करा.

  7. 7

    आता पुरी करण्यासाठी झाकून ठेवलेले पीठ पुन्हा एकदा हाताने सारखे करून त्याचे समान लहान गोळे करून घ्या.

  8. 8

    तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करा. प्रत्येक गोळी थोड्याशा पिठाचा वापर करून लाटून घ्या आणि गरम तेलामध्ये दोन्ही बाजूंनी परतून तळून घ्या.

  9. 9

    आता कुर्मा पुरी खायला तयार आहे.सोबत थोडा चिरलेला कांदा,आणि लिंबू घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kamat Gokhale Foodz
रोजी
YOU TUBE - Kamat Gokhale Foodz
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes