इन्स्टंट हलवाई स्टाइल गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)

Ashwini Muthal Bhosale
Ashwini Muthal Bhosale @cook_29707977
kalyan

गुलाबजाम लहानांपासून लोकांना सर्वांनाच आवडतो कशाला मग पाहुया गुलाबजाम ची रेसिपी

इन्स्टंट हलवाई स्टाइल गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)

गुलाबजाम लहानांपासून लोकांना सर्वांनाच आवडतो कशाला मग पाहुया गुलाबजाम ची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते20 mini
5ते 6 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रामगुलाबजाम पॅकेट
  2. 1 कपदूध
  3. 1/4 कपरवा
  4. वेलची पूड
  5. बनविण्यासाठी साखर
  6. गुलाबजाम तेल

कुकिंग सूचना

15 ते20 mini
  1. 1

    एका मोठ्या भांड्यामध्ये गुलाबजामचे पीठ आणि रवा द्यायचं आहे त्यात थोडी वेलची पूड टाकायची आहे आणि थोडं थोडं करून त्यात आपल्याला दूध टाकून पीठ मळून घ्यायचा आहे

  2. 2

    पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला थोडसं हाताला तेल लावून पिठाच्या गोळ्याला तेल लावायचे आहे आणि हा जो गोळा आहे तो आपण दहा मिनिटांसाठी एका भांड्यामध्ये झाकून ठेवायचा आहे

  3. 3

    10 मिनिट झाल्यानंतर आपल्याला तो गोळा हाताने छान मळून घ्यायचा आहे आणि त्या गोळ्याचे आपल्याला समान मोठी गोळे बनवून घ्यायचे आहे आणि एक गोळा घेऊन त्याला हातावर छान 2ते 3 मिनिटे पर्यंत मळून घ्यायचा आहे जेवढे जास्त वेळ पर्यंत आपण गोळा हातावर मळून घेऊन ठेवले आपल्या गुलाबजाम छान होतील त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला स्किप करायची नाहीये

  4. 4

    गोळा छान मळून झाले की त्यातल्याच एक गोळा घेऊन तो आपल्याला एक लांबड्या आकाराचा तयार करायचा आहे आणि त्यातून छोटे-छोटे लिंबाच्या आकाराएवढे गोळे घेऊन आपल्याला त्याचे गुलाबजाम बनवायचे आहे

  5. 5

    आपण एक ताट घेऊन त्याच्या मागच्या बाजूला थोडसं तेल लावून त्यावर आपण तयार केलेले गुलाबजाम ठेवायचे आहे म्हणजे तळत असताना आपल्याला गुलाबजाम तेलामध्ये टाकायला सोपे पडेल आणि त्यांचा आकार देखील बिघडणार नाही

  6. 6

    आता पण पाक बनवणार आहोत पाक बनवण्यासाठी आपल्याला इथे 600 ग्रॅम साखर लागणार आहे जेवढ्या प्रमाणात आपण साखर घेणार आहोत त्याच्या दुप्पट म्हणजे 1200 ग्रॅम एवढा पण त्यात पाणी वापरणार आहोत म्हणजे साखरेच्या दुप्पट आपण इथे पाणी आणि पाक बनविण्यासाठी वापरणार आहोत त्यामध्येच आपण थोडीशी वेलचीपूड देखील टाकणार आहोत हा पाक आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे पाक तयार झाला कि आपण तो थोडा वेळ थंड करून घ्यायचा आहे

  7. 7

    आता पण तयार केलेले गुलाबजाम तेलामध्ये तळून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचा हे तेल गरम झालं की त्यात आपण एक एक करून गुलाबजाम टाकून घ्यायचे आहे आणि काळपट रंगावर येईपर्यंत आपल्याला ते मंद गॅस वरती छान तळून घ्यायचं आहे गुलाबजाम तळत असताना आपल्याला येथे गॅसचे आहे मी मंद ठेवायची आहे फास्ट गॅस वरती आपल्याला हे गुलाबजाम तळायचे नाही फास्ट गॅस वरती गुलाबजाम तळले तर ते आतून कच्चे राहतील आणि पाकात टाकल्यावर ते व्यवस्थित मुरणाल देखील नाही

  8. 8

    तयार तयार झालेले गुलाबजाम आपण पाका मध्ये टाकायचे आहे हा पाक जो आहे तो आपल्याला पूर्णपणे थंड करायचा नाही तो थोडासा गरम ठेवायचा आहे आहे त्याचा पण आता गुलाबजाम टाकायचे आहे आणि गॅस वर दोन ते तीन मिनिटं गरम करून घ्याय चे आहे आणि पंधरा मिनिटांसाठी हे गुलाबजाम आपल्याला झाकून ठेवायचे आहे

  9. 9

    पंधरा मिनिटानंतर तयार झालेले गुलाबजाम एका बाऊलमध्ये काढून त्यावर थोडंसं डेसिकेटेड कोकोनट आणि सुकामेवा टाकून खाण्यासाठी घ्यावेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Muthal Bhosale
Ashwini Muthal Bhosale @cook_29707977
रोजी
kalyan

Similar Recipes