खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#fdr

ही रेसिपी मी माझ्या Cookpad च्या सर्व सुगरण मैत्रिणींना समर्पित करते..❤️

"खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी"

खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)

#fdr

ही रेसिपी मी माझ्या Cookpad च्या सर्व सुगरण मैत्रिणींना समर्पित करते..❤️

"खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
दोन
  1. 6अळु वडी ची पाने
  2. 1 कपबेसन पीठ
  3. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1 टीस्पूनहिरवी मिरची लसूण आले पेस्ट
  6. 1/4 टीस्पूनहळद, हिंग
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1 टीस्पूनओवा
  9. 1 टीस्पूनपांढरे तीळ
  10. 1 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  11. चवीनुसारमीठ
  12. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    अळूची पानांची देठ, शिरा काढून घ्या व स्वच्छ धुवून पुसून घ्या..चिंच धुवून पाणी घालून भिजत ठेवा.. हिरवी मिरची लसूण आले पेस्ट करून घ्या..

  2. 2

    वाटी मध्ये बेसन पीठ, तांदूळ पीठ घ्या त्यात लाल तिखट, हळद, हिंग, हिरवी मिरची लसूण आले पेस्ट, जीरे, ओवा,तीळ, मीठ घालून चांगले मिक्स करा व थोडे थोडे पाणी घालून बॅटर तयार करून घ्या.. घट्ट ही नाही आणि पातळ ही नको..

  3. 3

    किचन ओटा स्वच्छ करून त्यावर किंवा परात उलट करून त्यावर एक वडी वळायला घ्या.. प्रथम एक पान घेऊन त्यावर पीठाचे मिश्रण लावून घ्या त्यावर दुसरे पान मग बॅटर,तिसरे पान असे करत सगळ्या पानांना पीठाचे मिश्रण लावून घ्या मग साइटच्या बाजूंनी फोल्ड करा पीठ लावून घ्या मग गोल,घट्ट गुंडाळी करत रोल बनवून घ्या

  4. 4
  5. 5

    कुकरच्या डब्याला तेल लावून घ्या व त्यात हा रोल ठेवून कुकरला लावुन चार शिट्या काढुन घ्या..

  6. 6

    कुकर थंड झाल्यावर वडीचा रोल काढून घ्या व थंड झाल्यावर वड्या कापून घ्या..

  7. 7

    कढईत तेल गरम करून त्यात खरपूस तळून घ्या..

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या (4)

Similar Recipes