मालवणी आळू वडी (Malvani alu wadi recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#MLR
#मार्च लंच रेसिपीज
जेवणात चटणी कोशिंबीर बरोबर तळण हे हवेच. म्हणून ही नेहमीपेक्षा वेगळी अळू वडी.

मालवणी आळू वडी (Malvani alu wadi recipe in marathi)

#MLR
#मार्च लंच रेसिपीज
जेवणात चटणी कोशिंबीर बरोबर तळण हे हवेच. म्हणून ही नेहमीपेक्षा वेगळी अळू वडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५० मिनिट
  1. 8आळूची मोठी पाने
  2. 1 मेजरींग कप बेसन
  3. 1/3 मेजरींग कप तांदळाचे पिठ
  4. 3 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  5. २-२ १/२ टेबलस्पून गुळ
  6. 1 टेबलस्पूनमालवणी मसाला
  7. १ १/२ टिस्पून तिखट
  8. 1 टेबलस्पूनमिरची लसूण पेस्ट
  9. 1एक कांदा बारीक चिरलेला
  10. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेली
  11. 1 टीस्पूनधणेपूड
  12. 3/4 टीस्पूनजीरे पूड
  13. 1/2 टीस्पूनहळद
  14. 1/4 टीस्पूनहिंग
  15. १ १/२ टेबल्स्पून तीळ
  16. मीठ चवीनुसार
  17. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

५० मिनिट
  1. 1

    प्रथम अळूची पाने स्वच्छ धुऊन त्याची देठं काढून जाड शिरा थोड्या काढून घेतल्या व उलट बाजूनी लाटणे फिरवून घेतले.

  2. 2

    सर्व साहित्य संकलित करून घेतले. एका बाऊलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, धने जीरे पूड, तिखट, मीठ, हिंग, हळद, तीळ, कोथिंबीर, मिरची व लसणाची पेस्ट सर्व साहित्य घालून मिक्स केले.

  3. 3

    तसेच त्यात चिंचेचा कोळ व गूळ मिक्स करून लागेल तसे पाणी घालून घट्टसर बॅटर तयार केले.

  4. 4

    आता एक आळुचे पान पालथे ठेवून त्यावर वरील बॅटर थोडे बसरवून घेतले. मग त्यावर दुसरे पान उलट बाजूला टोक करून ठेवले व त्यावर परत बॅटर पसरवले. असे चार पाने एकावर एक ठेवून बॅटर लावून घेतले.

  5. 5

    नंतर दोन्ही साईड ने थोडे फोल्ड करून त्यावर थोडे बॅटर पसरविले. नंतर खालची व वरची बाजू थोडी फोल्ड करून त्यावर बॅटर पसरविले. असे केल्याने रोल करायला चांगला आयत तयार होतो.

  6. 6

    आता त्याचा घट्ट रोल तयार करून त्याला दोरा गुंडाळून घेतला म्हणजे रोल सुटत नाही. आणि १०-१२ मिनिट तो वाफवून घेतला.

  7. 7

    वाफवलेला रोल थंड झाल्यावर त्याचा धागा सोडून त्याचे साधारण पाव इंच जाडीचे पिसेस कट करून त्या शॅलोफ्राय करून घेतल्या. त्या आपण तळून पण घेऊ शकतो.

  8. 8

    तळून झाल्यावर अळू वड्या डीश मध्ये ठेवून गार्निश करून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes