बीटाचा कीस (beetacha khees recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#HLR
 लालचुटुक बीटरूट निसर्गाने दिलेले वरदानच आहे.. बीट हे कोशिंबिरीत कच्चे खाल्ले जाते आणि भाजी म्हणूनही शिजवले जाते. तसेच बिटाचे लोणचेही तयार केले जाते. तर आज मी बीटा चा कीस ही एक पौष्टिक रेसिपी केली आहे.

बीटरूट हे चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट आहे. यामुळे शरीरात काही बिघाड झाला असेल तर त्याविरोधात लढायला पेशींना बळ मिळते. संशोधनातून हे समोर आले आहे की, ते दाह कमी करण्यास मदत करते. तसेच ऑस्टियोआर्थरायटिसच्या दुखण्यापासून देखील आराम मिळू शकतो.

याशिवाय बिटात सर्वोत्तम असे लोह आणि फॉलिक अ‌ॅसिड असते. त्यामुळे अ‌ॅनिमियापासून बचाव करण्यासाठी बीटरूट उपयोगी आहे. आपल्या शरीरातल्या इतर भागांत ऑक्सिजन पुरवणाऱ्या लाल पेशींची वाढ बीटरूटमुळे होते. बऱ्याचदा वाढत्या वयानुसार मेंदूचे कार्य मंदावते . पण बिटामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते. बिटामुळे मेंदूला होणारा रक्ताचा पुरवठा वाढतो आणि डिमेन्शिया होण्याची शक्यता कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी बिटाचा उपयोग होतो आणि मधुमेहावर बीटरूट गुणकारी ठरते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२ जणांसाठी
  1. 3बीट
  2. 4-5कडीपत्ता पाने
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 1 टीस्पूनहिंग
  5. 1 टीस्पूनराई
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम बिटाचे साल काढून घ्यावे

  2. 2

    नंतर ते किसून घ्यावे.

  3. 3

    एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये फोडणी करून घ्यावी.

  4. 4

    वरील फोडणीत बीट चा कीस घालावा. चवीनुसार मीठ घालावे

  5. 5

    मिश्रण एकजीव करून १० ते १५ मिनिटे शिजवून घ्यावे.

  6. 6

    तयार बीटचा कीस प्लेट मध्ये काढून सर्व्ह करा वा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

Similar Recipes