मेथीची भाजी बाजरीची भाकरी (methichi bhaji bajarichi bhakhri recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#mfr
बाराही महिने जर मला कुठली भाजी आवडत असेल तर ती म्हणजे मेथीची भाजी.मेथीची भाजी ,बाजरीची भाकरी सोबत चटणी,ठेचा,कांदा काहीही चालेल.... माझं मन तृप्त 😋😋👍

मेथीची भाजी बाजरीची भाकरी (methichi bhaji bajarichi bhakhri recipe in marathi)

#mfr
बाराही महिने जर मला कुठली भाजी आवडत असेल तर ती म्हणजे मेथीची भाजी.मेथीची भाजी ,बाजरीची भाकरी सोबत चटणी,ठेचा,कांदा काहीही चालेल.... माझं मन तृप्त 😋😋👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१२ मिनिटे
  1. मेथीची भाजी..
  2. २ कप निवडलेली मेथी
  3. 2 कपनिवडलेली मेथी
  4. 1कांदा
  5. 2मिरच्या
  6. 5-6लसूण पाकळ्या
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. 1/2 टीस्पूनजीरे मोहरी
  9. १/८ टीस्पून हिंग
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1/4 टीस्पूनमीठ
  12. बाजरीची भाकरी.
  13. १-१/२ कप बाजरीचे पीठ
  14. 1/2 कपपाणी...आवश्यकतेनुसार
  15. 1/4 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

१०-१२ मिनिटे
  1. 1

    मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली.कांदा,मिरची,सोळलेला लसूण चिरून घेतला.

  2. 2

    कढईत तेल घालून ते तापल्यावर जीरे, मोहरी तडतल्यावर त्यात लसूण घातला.तो लाल झाल्यावर कांदा परतून घेतला.

  3. 3

    त्यात हिंग,हळद घालून त्यावर मेथीची धुतलेली भाजी घालून मिक्स केले.मंद आचेवर पाच मिनिटे वाफ काढली.नंतर मीठ घालून मिक्स केले.

  4. 4

    भाकरीसाठी बाजरीचे पीठ घेतले.त्यात मीठ घालून मिक्स केले.कोमट पाणी घालून पीठ भिजवले.

  5. 5

    पोळपाटावर भाकरी थापून किंवा लाटून घेतली.

  6. 6

    तव्यावर भाकरी घालून त्यावर पाणी लावले.ते सुकल्यावर भाकरी उलटून घेतली.शेवटी गॅसवर भाकरी भाजून घेतली.

  7. 7

    गरम गरम भाकरी,मेथीची भाजी आणि तिळाची चटणी...एकदम झकास बेत झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या (3)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
मस्त 😋मेथीची भाजी आणि तूप लावून बाजरीची भाकरी मला खूप आवडते.

Similar Recipes