मेथीची भाकरी (methichi bhakhri recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#ks7
मेथी पराठा नेहमीच सगळेजण करतात पण मेथीची भाकरी ही आता कोणी जास्त करत नाही पण ही मेथीची भाकरी दही चटणी लोणच्याबरोबर छान लागते शिवाय शुगर कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी ही भाकरी उत्तम पर्याय आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपचिरलेली मेथी
  2. 1 कपज्वारीचे पीठ +2 टेबलस्पून ज्वारीचे पीठ
  3. 1/2 टीस्पूनहळद
  4. 1 टीस्पूनधने पावडर
  5. 1 टीस्पूनजीरे पावडर
  6. 1 टीस्पूनतीळ
  7. 1/2 टीस्पूनओवा
  8. 1 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  9. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  10. चवीनुसारमीठ
  11. आवश्यकतेनुसार कोमट पाणी

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    1 कप ज्वारीचे पीठ मीठ हळद ओवा धने जीरे पावडर घालून एकत्र करून घ्यावे. त्यात चिरलेली कोथिंबीर मेथी घालून एकत्र करावे.

  2. 2

    आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे आणि भिजवलेला गोळा घेऊन ज्वारीचे पीठ घालून भाकरी थापून घ्या.

  3. 3

    गरम तव्यावर तयार भाकरी घालावी वरून पाणी लावून घ्या 1-2 मिनिटांनी पलटून घ्या आणि दुसर्या बाजूनी भाजून घ्या.तयार भाकरी तूप चटणी लोणचे दह्याबरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes