मारी बिस्किट मिठाई (marie biscuit mithai recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#dfr
दिवाळीसाठी खास अशी मिठाई... जवळपास १२-१५ वर्षांपासून बनवत आहे. खूप छान चवीला आहे. १५-२० दिवस फ्रिज बाहेर, हवेशीर जागी ठेवल्यास टिकते.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

३० मि.
  1. 1/2 मारी बिस्किटाचा मोठा पुडा
  2. ४०० ग्रॅम मिल्कमेड
  3. 1/4डेसिकेटेड कोकोनट
  4. 1 टेबलस्पूनकोको पावडर
  5. 1 टेबलस्पूनतूप
  6. 6-7 टेबलस्पूनदूध
  7. 1डेअरी मिल्क प्लेन कॅडबरी (₹२०/-)

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे. बिस्किटे व कॅडबरी मिक्सर मधून बारीक करुन घेणे.

  2. 2

    चाळणीने गाळून त्यात तूप,दूध व मिल्कमेड टाकून गोळा बनवणे. जास्त घट्ट बनू नये म्हणून थोडेथोडे मिल्कमेड टाकून मळावे.

  3. 3

    मिश्रणाचे दोन गोळे बनवून घेणे. डेसिकेटेड कोकोनट मध्ये मिल्कमेड थोडेथोडे घालून गोळा करावा.

  4. 4

    प्लॅस्टिक पेपर वर मारी बिस्किटाचा गोळा ठेवून पोळी लाटावी. त्यावर डेसिकेटेड कोकोनट गोळा पसरवून हलके लाटून घेणे. त्याची गुंडाळी करावी.

  5. 5

    पाच मिनिटांनी सुरीने चिऱ्या पाडून रोल तयार करावे. मारी रोल मिठाई तयार.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

Similar Recipes