पोहे चकली (pohe chakli recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#dfr सध्या झटपट रेसिपीज चे दिवस आहेत . भाजणी करा दळा ,वगैर करण्यास वेळ नसतो , म्हणून चटकन होणारी चकली मी केलीय .मस्त खमंग व कुरकुरीत . एकदम यम्मी . चहा बरोबर खावून तरी पहा .
आता कृती पाहू

पोहे चकली (pohe chakli recipe in marathi)

#dfr सध्या झटपट रेसिपीज चे दिवस आहेत . भाजणी करा दळा ,वगैर करण्यास वेळ नसतो , म्हणून चटकन होणारी चकली मी केलीय .मस्त खमंग व कुरकुरीत . एकदम यम्मी . चहा बरोबर खावून तरी पहा .
आता कृती पाहू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
6 - 7 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपपोहे
  2. 1/2 कपडाळे (फुटाणे)
  3. 1 कपतांदूळ पीठ
  4. 1 टेबलस्पूनधने पूड
  5. 1 टेबलस्पूनतीळ
  6. 1/2 टीस्पूनओवा
  7. 2 टीस्पूनलाल तिखट
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. चवी पुरते मीठ
  10. 2 कपउकळलेले पाणी
  11. चिमूटभरहिंग

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    पोहे व डाळे स्वच्छ करून, मिक्सरला फिरवून घ्या. जाडसर वाटल्यास चाळुन घ्या.त्यांत तांदूळ पीठ टाका.
    गॅस वर पाण्याचे आधण ठेवा.त्यांत चकलीचे पीठ,तीळ,मीठ, लाल तिखट, हळद, धणेपूड, हिंग टाकून, हलक्या हाताने कालवा. पीठ थोडे गार झाल्यावर, छान मळून घ्या.

  2. 2

    मळलेल्या पिठाचे उभे रोल करा.सोऱ्याला तेलाचे ग्रीसिंग करा. त्यांत पिठाचा रोल घालून चकल्या पाडून घ्या.

  3. 3

    गॅस वर तळण्याकरता तेल तापवा.मिडीयम फ्लेम वर, सावकाश सोनेरी रंगाच्या चकल्या तळून काढा.
    खमंग,कुरकुरीत मस्त अशा चकल्या तयार ! चहा बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

टिप्पण्या

Similar Recipes