भाजनीची कुरकुरीत चकली (chakali recipe in marathi)

Sangita Bhong
Sangita Bhong @cook_26212304

#GA4 #week9 #fried चकली म्हटले की तोंडाला पाणी सुटते. तोंडामध्ये टाकल्या टाकल्या विरघळली की चकली जमली रे जमली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. बऱ्याच जणींना चकली म्हटले की भीती वाटते करायची.खूप जनिंचे म्हणणे असते की आमची चकली मऊ च होते. जर तुम्ही खाली दिल्याप्रमाणे परफेक्ट माप घेतले ना तर चकली बिघडणार च नाही. मस्त कुरकुरीत होते की नाही बघाच.करून तरी पाहाच एकदा.हे माप 1 किलो चकलीचे आहे पण पीठ 2 किलो चे होते.चला तर मग आज पाहू यात चकली ची भाजणी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
10 ते 15 सर्व्हिंग्ज
  1. 3 ग्लासतांदूळ
  2. 1+1/2 ग्लास हरभर्याची डाळ
  3. 3/4 ग्लास(पाऊण) मुगाची डाळ
  4. 1 वाटीउडीद डाळ
  5. 1 वाटीपोहे
  6. 1/2 वाटीसाबुदाणा
  7. 1/2 वाटीगहू
  8. 1 वाटीधने
  9. 1/2 वाटीजीरे
  10. 2मोठे चमचे ओवा
  11. 3मोठे चमचे लाल तिखट
  12. 2 चमचेहळद
  13. 1/2 वाटीतीळ
  14. मीठ चवीनुसार
  15. 2 चमचेतेल
  16. तळण्यासाठी तेल
  17. थोडी कोथिंबीर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून एका सुती कपड्यावर सुकत ठेवावे. तोपर्यंत सर्व डाळी, पोहे,साबुदाणा, गहू, धने,जीरे मंद आचेवर छान भाजून घ्यावे.वरील सर्व जिन्नस भाजून झाल्यावर मग तांदूळ भाजून घ्यावेत. खूप जास्त करपवू पण नये.तुम्ही खाली फोटोत पाहू शकता.

  2. 2

    मग गिरणीवर थोडेसे मोठे दळून आणावी भाजणी. भाजणी थोडी मोठी दळल्यामुळे चकली छान कुरकुरीत होते. पीठ बारीक असल्यावर चिकट होते मळताना ही त्रास होतो.

  3. 3

    वरील सर्व साहित्य घेतल्यास 2 कीलोचे पीठ येते. त्यातील निम्मे म्हणजे 1 किलो पीठ घ्यावे.उरलेल्या पिठाच्या नंतर चकल्या करता येतात ताज्या ताज्या. मग 1 किलो पीठ घेवून त्यात लाल तिखट, हळद, तीळ,चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून त्यात तेलाचे कडकडीत मोहन घालावे. पातेल्यात पाणी गरम करायला ठेवावे आणि थोडे गरम (कोमट नाही) झाल्यावर आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. पीठ जेवढे घट्ट असेल तेवढे चकलीला काटे छान सुट तात.पाणी घालून मळताना चमचा वापरावा कारण पाणी गरम असल्यामुळे भाजण्याची शक्यता असते.

  4. 4

    चकलीच्या सोऱ्याला थोडेसे आतून तेल लावून त्यात मिश्रण भरावे. आणि चकल्या करून घ्याव्यात. तेलात टाकताना तेल चांगले गरम असावे आणि गॅस मोठा करावा. एका साईड ने चांगले तळल्यावर च चकल्या परताव्यात. आता गॅस कमी करून मंद आचेवर छान खरपूस तळून घ्याव्यात. कोथिंबीर ऑप्शनल आहे. पण घातल्यास खूप खमंग लागतात चकल्या.

  5. 5

    मस्त अशा खमंग कुरकुरीत चकल्या तयार आहेत खाण्यासाठी. विशेष टीप: भाजणीच्या चकल्या असल्यामुळे तेल कमी लागते आणि चकल्या तेलकट होत नाहीत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sangita Bhong
Sangita Bhong @cook_26212304
रोजी

Similar Recipes