ब्रेडचे गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)

Pragati Pathak
Pragati Pathak @UrsPragati

ब्रेडचे गुलाबजाम (bread gulab jamun recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

६ तास
४ लोक
  1. 2 कपसाखर
  2. 2.5 कपपाणी
  3. उकळून थंड केलेलं दूध मळण्यासाठी
  4. 1मोठा पॅक ब्रेड
  5. चवीनुसारवेलची पूड
  6. तळण्यासाठी तेल
  7. सजावटीसाठी बदाम किस

कुकिंग सूचना

६ तास
  1. 1

    प्रथम साखरेचा पाक करण्यासाठी दोन कप साखर आणि अडीच कप पाणी उकळायला ठेवावे. त्यात थोडी चवीनुसार वेलची पूड घालावी. पाक हलवायची गरज नाही.

  2. 2

    पाक होईपर्यंत ब्रेडचा चुरा करून घ्यावा. ब्रेडच्या कडा काढून घ्या. आणि आठ ते दहा ब्रेडचा मिक्सरमध्ये चुरा करून घ्या. चुरा झाल्यावर त्यात उकळून थंड केलेलं दूध गरजेनुसार चमचा चमचा घालत त्याचा गोळा बनवून घ्यायचा. तयार झालेल्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावेत.

  3. 3

    आता हे छोटे छोटे गोळे गरम तेलात तळून घ्यावेत. हे गुळाबजाम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचेत. यासाठी तळताना गॅस मंद आचेवर ठेवावा.

  4. 4

    तळलेले गुळाबजाम काढून घ्यायचे आणि पुन्हा साखरेच्या पाकात घालावे. एक उकळी काढण्यासाठी साखरेच्या पाकाचा गॅस पुन्हा चालू करावा. पाकात उकळल्यामुळे गुलाबजाम आतून बाहेरून शिजतो.
    आता गुळाबजाम वाटीत काढून ते पाकात घालून पाच ते सहा तास मुरत ठेवायचेत.
    सजावटीसाठी वरून बदामाचा किस पेरावा.
    तर असे हे पाकात मुरलेले ब्रेडचे गुलाबजाम खाण्यासाठी पाच ते सहा तास संयम ठेवा. संयमाचे पोटी गुलाबजामची वाटी! 😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Pathak
Pragati Pathak @UrsPragati
रोजी

Similar Recipes