आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi)

Vasudha Gudhe @vasudha_sg
आरोग्यासाठी हेल्दी आणि चटपटीत, तिखट, गोड अशी ही चटणी... 💃 💕
आवळ्याची चटणी (avlyachi chutney recipe in marathi)
आरोग्यासाठी हेल्दी आणि चटपटीत, तिखट, गोड अशी ही चटणी... 💃 💕
कुकिंग सूचना
- 1
आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यावे व त्याचे छोटे छोटे काप करून घ्यावेत
- 2
पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घालावे. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालावी. चण्याची डाळ, उडदाची डाळ, मेथी दाना, कढीपत्ता, हिंग घालून एक ते दोन मिनिटे परतून घ्यावे. त्यामध्येच आता आवळ्याचे केलेले काप घालून एक वाफ काढून घ्यावी.
- 3
आता या वाफवलेल्या आवळ्यामध्ये गूळ, लिंबाचा रस व आवश्यकतेनुसार मीठ घालावे. व थंड झाल्यावर मिक्सरच्या पॉट मध्ये याची स्मुद चटणी वाटून घ्यावी.
- 4
तयार आहे आपली आवळ्याची चटपटीत, तिखट, गोड, आंबट अशी चटणी...
तेव्हा नक्की ट्राय करा आवळ्याची चटणी.. 💃 💕 - 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अंबाडीच्या बोंडाची/ फुलांची चटणी (fulanchi chutney recipe in marathi)
#HLRअंबाडीच्या फुलांची चटकदार चटणी.. अंबाडीची चटणी आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त असलेली, आंबट-गोड चवीला असलेली अंबाडीच्या फुलांची चटणी...ही चटणी पाचक असून पोटाच्या विकारांवर गुणकारी मानली जाते. या फुला पासून सरबत देखील बनविले जाते. व या सरबताच्या सेवनाने शरीरात वाढलेली उष्णता शमविण्यासाठी उपयोग होतो.लक्षवेधक असलेली अंबाडीची फुले ही रंगाने लालचुटुक असतात.. आहारात रंग आणि चव आणणारा असा हा रानमेवा.. म्हणजेच अंबाडीच्या फुलांची चटणी...💃 💕 Vasudha Gudhe -
-
सोलापूरी शेंगदाणे चटणी (shengdane chutney recipe in marathi)
#KS2#पश्चिममहाराष्ट्र#सोलापूरसोलापूरची खंमग आणि तेवढीच हेल्दी रुचकर असलेली चटणी म्हणजेच शेंगदाण्याची चटणी..ही चटणी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता.. आयत्या वेळेला त्यात दही मिक्स करून ह्याच चटणीचा अजून एक नवीन प्रकार तुम्ही ट्राय करु शकता... एवढेच काय कधी घाईगडबडीत मसाल्याची भाजी करायची असेल तर ह्याच चटणीची वापर तूम्ही रसा दाट येण्यासाठी करू शकता.. ऐवढी बहुगुणी असलेली खास सोलापूरची शेंगदाणा चटणी करायची न....चला तर मग 💃 💕 Vasudha Gudhe -
उडदाचं घुटं (uddach ghunt recipe in marathi)
#KS4#खान्देशउडदाचं घुटं ही खान्देशची स्पेशल पारंपरिक रेसिपी.. ही मुख्यतः शिल्ट्याची उडीद डाळ यापासून बनवलेली जाते. तिखट आणि रुचकर अशा आमटीचाच एक प्रकार... पण तरीही चवीला खुपच भन्नाट लागते...उडदाची डाळ ही स्निग्ध, उष्ण गुणाची , धातुवर्धक, तृप्तीकारण, वातनाशक, बलवर्धक, स्वादिष्ट व रुचकर असते... मैत्रिणींनो कोणत्याही "परदेशी युनिव्हर्सिटीच्या" संशोधना शिवाय समृद्ध असलेली जुनी, सात्विक सकस अशी आपली खाद्य परंपरा.. या झटपट च्या जमान्यात कुठेतरी नामशेष होत चालली की काय असे सारखे वाटत राहते. परंतु किमान अशा काही सोप्या, पारंपारिक पौष्टिक पदार्थाचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करून आपण हा वारसा जपावा असे मला वाटते.. मग हाच वारसा पुढे नेण्याचा छोटासा प्रयत्न.. चला करूया खान्देश स्पेशल *उडदाचं घुटं*... 💃 💕 Vasudha Gudhe -
मुंग वडे. (moong vade recipe in marathi)
#gpकुरकुरीत खुसखुशीत असे हिरव्या मूग डाळीचे वडे प्रोटीन युक्त पोष्टिक आणि हेल्दी... खास गुढीपाडव्यासाठी केलेले हे मुंग वडे.. 💃 💕 Vasudha Gudhe -
चटपटीत कैरी पुदिना चटणी (Kairi Pudina Chutney Recipe In Marathi)
#KKRही चटणी आंबट गोड आणि चटपटीत होतेआणि अगदीं झटपट होते. उन्हाळ्यासाठी खास Mrs.Nilima Vijay Khadatkar -
आवळ्याची आंबट, गोड, तिखट, तुरट चटणी (Aawlyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी. पानात डावी बाजू सजवणारी आणि रासनेची चव वाढवणारी चटणी. पानात महत्वाची अशी ही चटणी. Shama Mangale -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN#चटणीरेसिपीजमहाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये ताटात डावीकडे विराजमान होणारे पदार्थ म्हणजे चटणी, लोणची, कोशिंबीर यांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे... कोशिंबीर, रायत्या मधून पौष्टिकता तसे जीवनसत्वे मिळतात. तर चटण्या आणि लोणची यांमुळे जेवणाला रंगत येते.. कितीतरी प्रकारच्या, कितीतरी वेगवेगळ्या चटण्या घरोघरी बनवल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे *जवसाची चटणी*...बनवायला खूप सोपी, चविष्ट आणि तेवढीच पौष्टिक असलेली....चला तर मग करुया जवसाची चटणी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
जवसाची चटणी दोन प्रकारची (javsachi chutney recipe in marathi)
#EB8#week8 (लसूणाची खमंग चटणी आणि आंबट गोड तिखट चटपटीत चटणी) Jyoti Chandratre -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#रेसिपीमॅगझिननुसत्या दुधी ची भाजी केली तर घरातील सदस्यांना खाण्याचा कंटाळा येतो.. पण याच दुधी पासून जर पराठे केले तर ते मात्र चुटकीसरशी संपतात... चवीला गोडसर असलेली दुधी ही पचायला हलकी असते ,आणि तेवढीच आरोग्यासाठी हेल्दी.. चला तर मग करुया दुधी पराठा ... 💃 💕 Vasudha Gudhe -
पुदिन्याची चटपटीत चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn चटणी ही आमच्या घरातली अत्यंत आवडीची अशी पानातली डावी बाजू...😋😋..त्यामुळे चटकदार चटण्यांची वरचेवर मेजवानीच देते मी स्वतःला..😀..ही चटण्यांची आवड आमच्या genes मध्येच आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही..माझी आजी,माझी आई,मी,आणि माझा मोठा मुलगा अशी ही चटण्यांची वंशपरंपरागत आवड एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे झिरपत आहे...आणि मग यातूनच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या केल्या जातात..चला तर मग पुदिन्याची चटपटीत चटणीची रेसिपी बघू या.. Bhagyashree Lele -
हिरव्या चिंचेची चटणी (Hirvya Chinchechi Chutney Recipe In Marathi)
#SOR #जेवणात चव वाढवणारी, आंबट, गोड तिखट अशी चटपटीत चटणी. Shama Mangale -
कैरी -शेंगदाणे चटणी (Kairi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#KKRही चटणी आंबट गोड आणि चटपटीत होते. डोसे, पॅटीस सोबत खायला एकदम मस्त. झटपट होते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
मूंग डाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
#मूंगडाळखिचडीमुग डाळ खिचडी हि पचायला हलकी... आणि आरोग्यासाठी उत्तम. लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी ही रूचकर, हलकीफुलकी मुग डाळ खिचडी... 💃 💕 Vasudha Gudhe -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी टोमॅटो चटणी ही इडली डोशा बरोबर खातात. Shama Mangale -
पनीर पकोडे (paneer pakode recipes in marathi)
# पनीर पकोडे...बाहेर छान पाऊस येत होता.. काहीतरी वेगळे चटपटीत खायची इच्छा झाली.. भजे सोडूनघरी पनीर होतेच फ्रीज मध्ये.. विचार केला आणि पनीर पकोडे करायचे ठरविले..... कारण करायला सोपे.. लवकर होणारे.. वेळ ही कमी लागतो.. आणि तेवढेच पौष्टिक देखील... 💃🏻💃🏻💕💕 Vasudha Gudhe -
कोकोनट चटणी (coconut chutney recipe in marathi)
#goldenapron3 19th week coconut ह्या की वर्ड साठी नारळाची चटणी बनाई.इडली ,डोसा सोबत नेहमी करतो तशीच.आज मी चटणीला फोडणी दिली नाही.तरी फोडणीशिवायही चटणी छान लागते. Preeti V. Salvi -
कैरीची चटकदार चटणी(kayrichi chatakdar chutney recipe in marathi)
कैरीपासुन बनणाऱ्या अनेक पदार्थांपैकी कैरीची आंबट गोड तिखट चवीची चटकदार चटणी मला प्रचंड आवडते. डोश्यासोबत मस्त लागते,पोळीला लावून पोळी गुंडाळून खाल्ली तरी मस्त लागते. Preeti V. Salvi -
पूडाची चटणी (pudachi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाड़ा _स्पेशल#पारंपरिक पूड चटणी मराठवाड्यात लग्न समारंभातील केली जाणारी पारंपरिक चटणी प्रकार आज मी बनवलाय खमंग व रूचकर ही रेसेपि चला बघूयात.(चींच जूनी असल्याने काळपट रंग आलाय चटनीला.) Jyoti Chandratre -
आवळ्याची चटणी (avdyachi chutney recipe in marathi)
#आवळाची चटणी #जेवणात चटणी म्हटले की मजाच मजा. Dilip Bele -
मुंगाचे सुप (moongache soup recipe in marathi)
#Soupsnap#cooksnap#VarshaIngoleBeleआज मी वर्षा ताईंची रेसिपी कुकसॅन्प केली आहे... थोडासा बदल केला. पण सुप अतिशय सुंदर झाले. थँक्स डियर🙏🏻 खूप हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी असून पचायला देखील हलकी. घरातील आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना रुचेल अशी रेसिपी म्हणजेच *मुगाचे सूप*...मिनरल्स, विटामिन फायबर युक्त असे हे सूप... यामध्ये आर्यन खूप प्रमाणात असल्याने, ज्यांना रक्ताची कमी आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असे हे सूप आहे. या सुपच्या नेहमी सेवनाने शरीरातील थकवा कमी होतो. डिटॉक्स करण्यासाठीदेखील याचा उपयोग होतो..तेव्हा आपल्या आहारात नक्की या सुपचा समावेश करा.. 💃 💕 Vasudha Gudhe -
रेस्टॉरंट स्टाईल दाल मखणी (dal makhani recipe in marathi)
#drदाल मखनी उत्तर भारतातील लोकप्रिय रेसिपी आहे. कॅल्शियम आणि प्रोटिन युक्त राजमा, बटर, ताजी क्रीम आणि मसाल्यापासून बनवलेली ही * रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी* चवीला स्वादिष्ट आणि तेवढीच पोष्टिक देखील... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
कच्च्या शेंगदाण्याची तिखट आंबट गोड चटणी
शेंगदाणे हे गरिबाच्या घरातले बदाम आहेत असे म्हणतात. शेंगदाणे हे रोज खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिजे, विटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.शेंगदाणे खाल्ल्याने हाडेही मजबूत होतात.लहान मुलांना रोज भाजी खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. म्हणून झटपट बनणारी अशी ही चटणी. जे साहित्य आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असते त्या साहित्यातच ही चटणी आपण बनवू शकतो.आपण हिला ब्रेड, पराठा, इडली, घावण, पोळी कशा सोबतही खाऊ शकतो.ही माझी रेसिपी #GA4 #week4 साठी आहे. Seema Salunkhe -
डोसा चटणी (dosa chutney recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No_Oil Recipes मधे मी डोसा आणि चटणी बनवली आहे.डोसा आणि चटणी बनवताना मला तेलाची अजिबात गरज पडली नाही. तसंही आमच्या कडे खूप कमी तेलाचा वापर करतो. गरमागरम मस्त कुरकुरीत डोसा, ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला खूपच छान लागतो. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 # चटणी ही चटणी उडपी पद्धतीची आहे. इडली-डोसा सोबत अप्रतिम लागते.Rutuja Tushar Ghodke
-
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मस्त गुलाबी थंडी चालू आहे .आणि मार्केटमध्ये जागोजागी हिरव्या वाटाण्याची अवाक पाहायला मिळते. या हिरव्या ताज्या मटर पासून कितीतरी पदार्थ आणि कितीतरी पदार्थांमध्ये याचा वापर आपण करत असतो. त्यापासून कितीतरी रेसिपीज तयार करत असतो.. यापैकीच एक म्हणजे *मटारची उसळ* "नाव एक चवी अनेक" या म्हणीप्रमाणे ही उसळ करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल, किंबहुना असते. पण मी आज खास माझ्या पद्धतीची *मटारची उसळ* ची रेसिपी तूमच्या सोबत शेयर करत आहे... तेव्हा चला तर मग करुया मटारची उसळ.. 💃 💕 Vasudha Gudhe -
काकडीचे धिरडे... (kakdiche dhirde recipe in marathi)
#काकडीचेधिरडेसकाळच्या गडबडीत झटपट होणारी आणि तेवढीच हेल्दी, पोष्टिक आणि करायला देखील सोपी असणारी रेसिपी म्हणजे *काकडीचे धिरडे*... 💃 💕 Vasudha Gudhe -
बाजरीच्या पिठाचे सात्विक बुळग,पिठवणी (bajarichya pithache bulag recipe in marathi)
"बाजरीच्या पिठाचे सात्विक बुळग,पिठवणी" हा पारंपरिक पदार्थ आहे. बाळंतीनीसाठी तर सर्रास हा पदार्थ बनवला जातो.याला पिठवणी किंवा बुळगं म्हणतात. सकाळी नाष्ट्याला सुंठवडा लाडू आणि हे पिठवणी दिले जाते. पण गावी हा पदार्थ बाळंतीण च नाही तर लहान मोठे आवडीने खातात.. चवीला अप्रतिम लागतो. ज्याला गोड नको असेल त्याने मीठ आणि तुप घालून खाल्ले तरी चालेल छान च चव येते.. किंवा हिरवी मिरची लसूण घालून ही बनवु शकता..पण माझ्या माहितीप्रमाणे गुळ घालून च छान लागते.कारण मी तिनही मुलांच्या वेळी खाल्ले आहे.हे खाल्ल्याने बाळाला दुधाची कमतरता भासत नाही. बाजरी गरम असते, त्यामुळे हिवाळ्यात सगळ्यांनी च खाणे हितकारक च असते. टेस्टी, हेल्दी आणि पोटभरीचा पदार्थ आहे..त्याने लवकर भुक लागत नाही.दमदमीत असते.आम्हाला आठवण झाली की आम्ही बनवतो.ही एक प्रकारची बाजरीची खीर ही म्हणू शकतो... अतिशय पौष्टिक, चविष्ट पदार्थ आहे.. चला तर मग मी रेसिपी दाखवते.. लता धानापुने
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15743703
टिप्पण्या